काल रात्री झोपताना,
एक म्हातारी बजबजलेली जखम कापून काढली.
खिडकी बाहेर भिरकावून दिली.
पहाटे डोळे उघडले.
त्या क्षणी ती येऊन पुन्हा चिकटली.
घोण जशी.
रक्त शोषत.
नाही सोडणार ही.
मरेस्तोवर.
अधिकच चिघळणार.
पसरतच जाणार.
विष जसं.
मग मरणाचं निदान काय होईल?
विषबाधा?
की एक चिघळलेली जखम?
10 comments:
बयो, का घुसते आहेस नको त्या आठवणीत?
कारण नेहेमीच मी शहाणी नसते... :)
हमारेपास हर जालिम इलाजपे समस्या है!! (आईंग... उल्टा हो गया...) घोणीसाठी अँटीघोण... जी त्या घोणीलाच शोषते... reverse the things... reverse the things... it is fun... do exactly opposite of what you are suppose to...
सौरभ, बरोब्बर...आमच्या ह्या advertising विश्वात हे करायचा आमचा रोजचा प्रयत्न असतो!... in fact, आम्ही असे करावे अशीच अपेक्षा असते! म्हणजे वाईट वस्तू कशी उत्तमच आहे हे पटवून देणे!!:)
पण हे रोजच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही ना जमत! :)
Am I making any sense?!
अह्ह्म... तसं नाही. मुन्नाभाई मुव्हीमधे कसा संजुबाबा दादागिरीच्या ऐवजी गांधीगिरी करतो. reverse mentality... :D लय भारी effective प्रकार आहे. try it...
सौरभ, मला वाटतं, तू म्हणजे बिरबलाचा पुनर्जन्म आहेस!! :D
=)) बिचारा बिरबल
:D
डोक्यावरून गेली ब्वा...
hmmm... जाऊ दे संकेत....नेहेमीच आयुष्य फुलांचं नसतं ना....म्हणून मग कधीकधी असं होतं... :)
Post a Comment