डोकं एक रुबिक क्यूब...
सहा बाजू...सहा रंग.
गरगर....खटखट...
गरगर....खटखट...
एकेक रंग...आणावे एकत्र
करावे प्रयत्न...
चुकत... माकत...
वर्षानुवर्ष.
कधीतरी जमलं तर...
येईल तो ठिकाणावर...
पण मग...
एकसारखे ते रंग.
निळा तर निळाच.
पिवळा तर पिवळाच.
गरकन फिरवावा तर फक्त हिरवा.
गरगर....खटखट...
अडखळत...
ह्या कसरतीत...
कधीतरी...
एक चौकट निखळते...
एक रंग तुटतो...
एक संदर्भ तुटतो...
मग हा ठोकळा...
हळूहळू रिकामा.
एका मागोमाग...
सगळेच रंग विखुरलेला...
सगळेच संदर्भ तुटलेला...
स्मृतीभ्रंश झालेल्या माणसासारखा...
12 comments:
अनघा.. तुला माहित आहे तो कसा सोडवायचा? मला अर्ध्याअधिक जमतो... सोडवायचा जागतिक विक्रम अवघ्या ७-८ सेकन्दन्चा आहे... :) भारीच ना... :)
अनघा, तुला ही दैवी देणगी आहे...तू सतत आम्हाला अंतर्मुख करू शकतेस.
माझ्या धाकट्या बहिणी करतात ही हुशारीची कामे!!
:)
मला आज मेमरी ड्रॉइंग नाही तर अॅबस्टॅक्ट ड्रॉइंग करावेसे वाटलेय!
अनघा,
'बाबा' नंतरचे सर्व पोस्ट एका दमात वाचून काढले. सावंतवाडीत लोडशेडिंग आणि पाउस या दोघां मध्ये सध्या कोण जास्तीत जास्त वेळ वीज पळवितो याची अहमहिका लागलेली असल्या मुळे इंटरनेटची असून पंचाईत तर नसून खोळंबा अशी केविलवाणी अवस्था आहे. त्यामुळे आज मुंबईत घरून संधी साधून कमेंट्स पोस्ट करतोय. त्या अवधूत गुप्तेने तोडलंस, मोडलंस, फटाक, जिंकलस अशा व तत्सम अनेक शब्दांना लोकाश्रया सोबत वाहिनीआश्रय देखील मिळवून दिलाय. त्यातले सर्वच शब्द तुझे पोस्ट वाचतांना आठवतात. या पूर्वीचे काळजाला हात घालणारे पोस्ट वाचतांना डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. हल्लीचे पोस्ट वाचतांना मात्र काही ठिकाणी गुदगुल्या झाल्या. एव्हढेच नव्हे तर तुझ्या पोस्टला आलेल्या कमेंट्स देखील तितक्याच वाचनीय असतात. म्हणजे दुधा सोबत साय देखील मोफत. चतुरस्र वगैरे काहीतरी म्हणतात ना तसं तुझं आणि तुझ्या लिखाणाच स्वरूप हळू हळू दिसायला लागलंय. तझा ग्रुप देखील छान आहे. आयुष्यात आपण काय गमावलं त्या पेक्षा असे छान छान स्वभावाचे मित्र, मैत्रिणी व आपुलकीची माणसे जोडली, या कमाईचे समाधान काही औरच असतं नाही का ? आता मलाच जास्त पोक्त वगैरे झाल्या सारखं वाटायला लागलेय. मी सावंतवाडी च्या कॉलेजच्या प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला, तर त्यांनी मला डायरेक्टर करून माझी नाळ दुरून का होईना आणखी घट्ट केली. आता मी मुंबईत जास्त दिवस राहू शकतो आणि वेळ काढून तुझ्या ब्लॉगवर फेरफटका मारू शकतो. असो, ऐसेच लिखते रहो
सर, सर्वप्रथम अभिनंदन!! तुम्ही एकदम डायरेक्टरच झालात की!! अरे व्वा! मी आणि इरा, थोडा पाउस कमी झाला की येणारच आहोत तुमचं कॉलेज बघायला!
सर, तुम्ही इथे येता, एव्हढं सगळं वाचता.. एव्हढी सुंदर प्रतिक्रिया देता ह्याचं मला खूप अप्रूप वाटतं! म्हणजे एकदम स्केचबुक घेऊन घाबरतघाबरत तुमच्यासमोर येऊन उभं राहिल्यासारखं! कधी ओरडणारे, वैतागणारे तर कधी कौतुकाने अ+ देणारे आमचे विचारे सर! लहानपणापासून मला ओळखणारे असे तुम्ही, सगळ्या चढउतारांना साक्षीदार...त्यामुळे अधिकच छान वाटतं. आणि तुमचं खरं आहे सर, हे सगळे नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्यामुळे मला खरंच खूप हुरूप आला... आणि मग मी वाट बघत बसते आज कोण काय म्हणेल ह्याची! माझी निबंधाची वहीच आहे, नाही का ही? :)
छान आहे पण नेमकं काय आहे?
तुमच्याकडे ६ रंग असलेला क्युबिक रुब आहे!!! आमचा ठोकळा कसाही फिरवा, कायपण फरक नाय. सगळीकडून एकच रंग. आणि तो ब्युरिक क्युर उगीच सोडवायची गरज नाही... आहे तसाच रंगीबेरंगी ब्येस आहे. :D :P :)
"अनघाकडे ६ रंग असलेला क्युब आहे..."
सहा रंग जरा कमीच आहेत नाही का ?
मला ह्या ब्लॉगवर दररोज वेगळाच रंग पाहायला मिळतो ...
फारच छान लिहिलंय ...
अनघा, तुला खो दिलाय मी.
गौरी बाई, शोधते आता... अमराठी कविता...
:)
बायनरी बंड्या, धन्यवाद. कौतुक ऐकलं कि नेहेमीच हुरूप येतो. नाही का? :)
Post a Comment