नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 16 August 2010

देशभक्ती

काल कुठल्याश्या रेडिओ स्टेशनवर एक प्रश्र्न टाकण्यात आला होता.
तुमच्यासाठी देशभक्ती काय आहे?
अपूर्णावस्थेतील हे माझे त्यावरचे विचार....

मी, माझे काम लवकर व्हावे ह्यासाठी एक छदाम देखील लाच देणार नाही.
मी, माझ्या कामासाठी कधीही वशिला लावणार नाही.
मी, गाडी चालवत असेन तर कधीही सिग्नल तोडणार नाही.
मी, चुकून नियम मोडला गेलाच तर लवकर सुटका व्हावी ह्यासाठी पोलिसाला लाच देणार नाही.
मी, हातात आहे म्हणून कर्कश भोंगा वाजवणार नाही.
मी, माझे वाहन घेऊन उन्मत्त होऊन झेब्रा क्रोसिंग वर जाऊन उभी रहाणार नाही.
मी, कधी पायी चालत असेन तर मी माझ्यासाठी गाड्या थांबवून रस्ता पार करणार नाही.
मी, हिरवा आणि लाल दिवा माझ्याच भल्यासाठी आहेत हे मी लक्षात घेईन.
मी, रस्त्यात एक कणभरही कचरा करणार नाही.
मी, रस्त्यात थूंकणार नाही.
मी, फेरीवाल्यांकडून खरेदी करणार नाही.
मी, निर्माल्य समुद्रात, नदीत टाकणार नाही.
मी, देवभक्तीच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणार नाही.
मी, माझ्या राष्ट्रगीताला पूर्ण मान देऊन ते चालू असता, सूतभर देखील हलणार नाही.
मी, हे कायम लक्षात ठेवीन की देशभक्ती आणि पृथ्वीभक्ती ह्या हातात हात घेऊन नांदतात.
मी, हे कायम लक्षात ठेवीन की माझा देश ही माझी जबाबदारी आहे, दुसऱ्या कोणाची नाही.
मी, हे कायम लक्षात ठेवीन की माझा देश हे माझे प्रेम आहे, दुसऱ्या कोणाचे नाही.
मी, .......................

12 comments:

Shriraj said...

Anagha, tuzya ya post-che print-out kadhun mi mazya desk samor lavle aahe. Khup khup aabhaar!!!

रोहन... said...

अगदी माझ्या मनासारखे ... :) खूप सोपे वाटतंय ना.. पण पाळायला गेले की लोकांना हे खूपच कठीण वाटते ... :)

Anagha said...

कारण नेहेमीच आपलं काम आपल्याला दुसऱ्या कुणीतरी करून हवं असतं! :)

सौरभ said...

हे अगदीच मस्त लिहलय. देशभक्ती म्हणजे लगेच तलवार उपसून घोड्यावर स्वार होणे नव्हे, साध्या साध्या गोष्टीतुनदेखिल ती व्यक्त होते हे मोजक्या शब्दात छानच सांगितलय. :)

Raindrop said...

agdi 'original post' aahe :)
i will share with you my independence day celebration experience I had here in Mahasamund. Simple, original and totally overwhelming time I am having here. Just like ur post made me feel right now.

rajiv said...

" मी चुकार देशद्रोह्याना त्यापासून परावृत्त करण्यासाठी, माझी देशभक्ती पणाला लावीन ....!

Deepak said...

खूपच छान...आवडले ! पण.......................

Anagha said...

दीपक, ह्या 'पण' लाच आपण मार खातो ना? मनाशी पक्क ठरवलं की सगळं बरोबर होतं... रोज देवाची भक्ती करायला कसे विसरत नाही आपण? ही एका परीने देवभक्तीच नाहीये का?

Deepak said...

अगदी बरोबर ! पण देवभक्ती मध्ये अडथळे येत नाहीत आणि देशभक्ती मध्ये अडथल्याचे डोंगर पार करावे लागतात म्हणून केव्हा केव्हा ते डोंगर पार करताना Ropeway चा मार्ग स्विकारावा लागतो.......

Anagha said...

म्हणजे देवभक्ती सोप्पी म्हणून करता वाटतं तुम्ही दिपक बुवा!! आणि मग एव्हढी ढोर मेहेनत करून, रात्रंदिवस एक करून, कठीण कठीण इमेजेस फोटोशॉपवर करत असता त्याचं काय??
कठीण कामांची तुला सवय नक्की आहे दिपक! काय?
:D

Deepak said...

अनघा...बाई! हातामधल्या कामाचे डोंगर कितीही कठीण असले तरी आपण पार करू शकतो परंतु हाता बाहेरचे अडथळ्यांचे डोंगर (नाईलाजाने करावी लागणारी सरकारी कामे) या विषयी बोलतोय मी...लाच च च च च च... कारण ती दिल्याशिवाय कामे होतच नाहीत हा अनुभव मला तसेच तुझ्या सकट सगळ्याच जणांना कधीना कधी आलेला असणारच....काय पटलं ना?????????

Anagha said...

दिपक, काय बोलू? पुढच्या वेळी असं कधी झालं, तर मला हाक मारा, निदान दोघे मिळून आपण प्रयत्न तर करू.