नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 8 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ५


२१ एप्रिल
ऑफिसचे कामकाज आटोपून घरी आले तेंव्हा आजही म्हाडाची नोटीस माझी वाट बघत होती. म्हाडाच्या नियम क्रमांक ९५ अ अंतर्गत सात दिवसांची नोटीस दिली होती. ७ दिवसांत घर रिकामे करा अन्यथा जबरदस्तीने घर रिकामे करून दुसऱ्या जागेत हलवले जाईल अशी ही तंबी.
"९५ अ ?"
"९५ अ ह्या नियमाखाली 'ज्या इमारतीमधील ७०% भाडेकरूंनी विकासासाठी संमती दिलेली आहे व म्हाडाने 'ना हरकत पत्र' दिले आहे, अशा इमारतीमधील ताबा न सोडणाऱ्या ताबेदारांना, पूर्व सुचना देऊन, सामानासहित, पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याचे अधिकार म्हाडाकडे आहेत." मी विचारलेल्या प्रश्र्नाला फलटणकर उत्तर देतात.

बिल्डरचा ब्रोकर हा शेवटी बिल्डरचा ब्रोकर. तो बिल्डर जे सांगेल तेच ऐकणार. त्यामुळे मी आधीच आमच्या परिसरात काम करणारे व माझ्या ओळखीतील दोन ब्रोकर्सना सांगून ठेवले होते. त्यातील एकाने दाखवलेली जागा सोयीची होती, शेजार चांगला होता, फक्त ती जागा जुलै महिन्यात रिकामी होणार होती.
"अनघा, तुझ्या त्या ब्रोकर्सना सांग...तातडीने आईच्या योग्य जागा शोधायला." फलटणकर मला फोनवर म्हणाले.
"अहो, पण मी शोधतेच आहे ! रोज उठून इथे फिरतेय मी आमच्या गल्ल्यांत ! काय करू आता आणखी ?"
"घाई कर अनघा....बस इतकंच !"
"बरं." बिल्डर्सच्या ब्रोकरबरोबर पार तासाच्या अंतरावर व आमच्या ब्रोकर्सबरोबर आसपासच्या गल्ल्यांत मी फिरत होते. कुठे चौथ्या मजल्यावर घर...लिफ्ट नाही...तर कुठे दूर कोसावर. शेवटी एक शोध लागला. आईच्या घरापासून दहा मिनिटांवर, चवथा मजला, लिफ्ट व मदतशील वॉचमन. ऐशी वर्षाची आई. संधिवात.
"एक चांगली जागा मिळतेय. पण मग ते गृहस्थ लगेच पैसे मागतायत. काय करू ? " मी फलटणकरांना फोन लावला.
"आगावू भाडे दे आणि जागा निश्चित कर." फलटणकर म्हणाले. मी रोख दहा हजार त्या घरमालकाला दिले. 

२५ एप्रिल.
मी. अॅडव्होकेट फलटणकर. आणि वकील नारायण. कोर्टात हजर होतो. कोर्टास आम्ही म्हाडाच्या सदर नोटीसची आणि १८ एप्रिलच्या म्हाडाच्या निर्णयाची माहिती देत होतो. म्हाडातर्फे त्यांच्या जेष्ठ वकिलबाई व बिल्डरचे वकील दस्तुरखुद्द वर्मा हजर होते.
बाई बोलू लागल्या. उजळ रंगाच्या वकिलबाई.
"जज्जसाहेब, इतर सर्व भाडेकरू जागा सोडून कधीच गेले आहेत. बिल्डरने त्यांना जागा दिल्या आहेत. बिल्डर त्या त्या घरांचे भाडे भरतोय. ह्या एका भाडेकरूमुळे सर्व काम थोपले आहे. आम्हांला बिल्डरने विनंती केली म्हणून आम्ही इतर भाडेकरूंच्या हितासाठी म्हणून प्रयत्न करीत आहोत......"
"आम्ही कधीही म्हटले नाही की आम्हांला तेथून हलायचेच नाही. आमचे फक्त इतकेच म्हणणे आहे की इथे ऐशी वर्षाच्या जेष्ठ नागरिकाचा प्रश्र्न आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीची योग्य जागा देण्यात यावी...." आमचे वकील नारायण.
वादविवाद सुरु झाला होता. म्हाडाच्या बाई म्हाडाची बाजू आवेशाने मांडीत होत्या. वकील वर्मा, पुढे सरसावले होते. दालनाच्या उजव्या हाताला मोठ्या खिडक्या. त्यातून येणारा प्रकाश. जुन्या पिवळ्या भिंती. वर उंचावर छत. काही लाकडी बाकडी. काही खुर्च्या. समोर जज्जसाहेबांच्या डाव्या हाताला बसलेल्या टायपिस्ट बाई. सतत टायपिंगचा कानी पडणारा आवाज. खर्रकन त्यांनी मशीनची पाटी सरकावी व त्याचा आवाज न्यायदालनात घुमून जावा. कोर्ट भरून गेलेलं आहे. काळ्या कपड्यांतील वकील...व माझ्यासारखे अनेक सामान्य नागरिक. मी आता अजून नाही एका जागी बसू शकत. मी पुढे येते. पुढे. अजून पुढे. माझ्या डाव्या हाताला साक्षीदाराला उभे रहाण्यासाठी लाकडी चौकट. मी त्याच्याच अलीकडे आता जाऊन उभी रहाते.
"आम्ही ह्यांना चिक्कार जागा दाखवल्या. हे मुद्दाम आमची अडवणूक करण्यासाठी हे करत आहेत. फक्त त्रास देण्यासाठी हे सर्व चालले आहे." वर्मा.
"आमच्या सोयीची जागा आम्ही शोधली आहे. तिथे आम्ही बयाणा देऊन ती जागा निश्चित देखील केलेली आहे. फक्त ती जागा आम्हांला एका आठवड्याने म्हणजे एक मे पासून मिळू शकत आहे." नारायण.
"आम्हीं पूर्वीच ह्यांच्यासाठी जागा बुक केली आहे...आणि डिसेंबरपासून वर्षभराचे भाडे देखील भरले आहे...आता आम्हीं का दुसऱ्या जागेचे पैसे भरायचे ? व का आम्ही आमचे नुकसान करून घ्यायचे ? अजिबात करणार नाही आम्ही असे..." वर्मांचा आवाज चढत होता.
"साहेब, आम्हांला या जागेविषयी फेब्रुवारीमध्ये सांगितले...मग ते डिसेंबरपासून कशासाठी व कोणासाठी त्या जागेचे पैसे भरतायत ? ती जागा बिल्डरने दुसऱ्या कोणासाठी तरी भाड्याने घेतली असावी व आता तो माणूस तयार नाही  म्हणून आम्हांला तिथे शिफ्ट होण्याची जबरदस्ती करत आहेत." शांत स्वरात नारायण.
मला आता हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे गेलेले आहे. माझ्या आईचा तिथे होत असलेला उल्लेख...वर्मांचा चढा आवाज...सगळंच...मी पुन्हापुन्हा फलटणकरांकडे नजर टाकते. ते एकाग्र चित्ताने सर्व ऐकत आहेत. आमची नजरानजर होते...ते फक्त मला मान डोलावतात...
मी जज्जसाहेबांकडे नजर लावते...थोडं वाकून त्यांना विनंती करते...मला बोलू देण्याची विनंती...जज्जसाहेब मान डोलावून परवानगी देतात. मी एक निमुळती पायरी चढून चौकटीत शिरते. हातात बाबांचा फोटो दडवून ठेवलेला आहे. बाबा माझ्याबरोबर आहेत.
"साहेब, ज्या बाईबद्दल ही सर्व बोलणी चालली आहेत ती माझी आई आहे. ऐशी वर्षाची आहे ती. तिला संधिवात आहे. ती ठीकपणे नीट नाही चालू शकत. जिने नाही चढू शकणार. गेली पन्नास वर्षे ती ज्या परिसरात राहिली आहे तिथे त्याच परिसरात तिला जागा दिली जावी इतकीच फक्त आम्हीं मागणी करत आहोत. " मी स्पष्ट स्वरात माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करते.
"म्हणजे कुठे द्यावी आम्ही जागा ? नरीमन पॉइंट ? की ब्रिज कॅन्डी ? ह्यांच्या मागण्याच अफाट आहेत !" संतापलेले वर्मा आता तीव्र स्वरात.
"चालता येत नाही म्हणजे काय ? आता जी जागा बिल्डरने बघितली आहे तिला लिफ्ट आहे....मग काय प्रॉब्लेम काय आहे ह्यांना ? फक्त त्रास देण्यासाठी चालू आहेत हे ह्यांचे प्रकार !" तावातावाने वकीलबाई.
"माझ्या आईचा हात संधिवातामुळे थोडा वाकडा झाला आहे. तिला एकटीला नाही तो दरवाजा उघडता येणार...जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत..." माझा संताप संताप होतो...आजारपण चव्हाट्यावर...एखाद्या दु:खद गोष्टीचं भांडवल केल्यागत...ही बाई मला हे भाग पाडतेय....माझे डोळे आता पाण्याने भरू लागतात....मला नाही कळत...मला ह्या वकिलबाईंचा संताप आलाय की माझी अगतिकता सहन होत नाहीये...
नारायण, जज्जसाहेबांकडे फक्त नजर टाकतात.
जज्जसाहेब निर्णय ऐकवू लागतात.
मला काहीही ऐकू येत नसते. मी फलटणकरांकडे नजर टाकते. ते फक्त मला खुणेने सांगतात...तिथून बाहेर ये. मी बाहेर येते. ते फक्त मला सांगतात...शांत हो...मी बाकावर ठेवलेली माझी बॅग उचलते व दालनाबाहेर पडू लागते....वाकून जज्जसाहेबांना मानवंदना देण्याची न विसरता.
बाहेर बाकावर जाऊन बसते. अजून डोळ्यातून पाणी येतच आहे...अजून मला कळत नाही...हे पाणी का येतंय...अजून मला कळलेलं नाही...जज्जसाहेब नक्की काय बोलले आहेत....त्यांनी काय निकाल दिला आहे...ते जे बोलले त्याचा अर्थ काय आहे...
अचानक माझ्या बाजूला कोणी एक मध्यमवयीन माणूस उभा रहातो...."आता कशाला रडताय...तुम्हीं जिंकला आहात...जज्जसाहेबांनी तुमचं ऐकलंय..."
"हो का ?' मी त्यांना विचारते. 
दहा मिनिटे अशीच जातात. फलटणकर व नारायण बाहेर येतात. मी बाबांचा फोटो माझ्या पर्समध्ये पुन्हां ठेवून देते. नारायण माझ्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य करतात.
आम्हीं तिथून निघतो...
खाली रस्त्याला लागल्यावर मी फलटणकरांना विचारते..."काय झालं नक्की ? काय म्हणाले जज्जसाहेब ?"
"काही नाही...न्यायाधीशांना आपलं म्हणणं पटलेलं आहे. त्यांनी बिल्डरला सुचना दिल्या आहेत...की ह्या वृद्ध बाईंच्या सोयीची जागा त्यांना देण्यात यावी."
"पण म्हणजे ते काय म्हणाले ?"
"भाडेकरूचे कुटुंबात एक वृद्ध स्त्री असल्याने व ही गोष्ट म्हाडा व बिल्डर यांस मान्य असल्याने, बिल्डरने भाडेकरूच्या सोयीची जागा, केवळ बिल्डरने आगाऊ पैसे भरले आहेत, या मुद्द्यावर नाकारणे हे अयोग्य आहे. बांधकामाची परवानगी मिळूनदेखील ४ वर्षे कोणतीही हालचाल न करणाऱ्या बिल्डरने, ही बाब केवळ 'प्रेस्टीज इश्यू' करता कामा नये. कोर्टाच्या मतांचे व सूचनांचे बिल्डरने पालन करावे व योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय घराचा ताबा काढून घेऊ नये "
"म्हणजे हे आपल्या बाजूने झालं न ? मग आता आपण तर जागा बघितलीय ना ? तिथे राहू शकेल ना आई आता ?"
"हो...बघू आता पुढे काय होतं ते..."
...मी गप्प बसते.

माझा आजचा दिवस अजूनही संपलेला नसतो....ऑफिसमध्ये काम अर्ध्यावर टाकून मी हळूच बाहेर निसटलेले असते...पुन्हां जाऊन अर्धवट ठेवलेले काम पुरे करणे गरजेचे असते.
नोकरी सांभाळणे महत्त्वाचे.

क्रमश:

22 comments:

Anonymous said...

प्रचंड शूर आहात तुम्ही... :)

हेरंब said...

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी !!!

महान आहेस तू !

अपर्णा said...

अनघा, आज इथपर्यंतच सर्व एकदम वाचलं...पाणी आलं ग मला पण....आपल्याला नसत करायचं भांडवल ज्या परिस्थितीचं नेमक तेच होतय अस जाणवलं तर काय होईल समजू शकते मी.....
आणि तुझ्या मुलीची पिढी पाहता तिला पण हे सर्व त्रासदायकच होणार म्हणजे इथून तिथून सगळीकडे मानसिक कुचंबणा ...कायद्याने कदाचित घराचा न्याय होईल पण हा सगळा मानसिक त्रास, त्रागा, कामावर परिणाम...या सर्वांचा न्याय कुठल्या न्यायालयात होईल...
काळजी घे...आणि हो तू खूप strong आहेस...अशी बाकीची लोक असती तर आपली मुंबई अशी विकली गेली नसती न??

raghav said...

aushaya tech aahe pan hach peach aahe .....hi bhim rao pancaleni gaileli gzal atavali.pan tu ladlis he khup bar kelas.sevatacha shan hi khup mahatwacha asato.stri shaktich ru aahe.strong anagha .

Mandar Kulkarni said...

Tai, salam aahe tuzya himmatila.Shabdch nahit bolyala. khup diwasapasun wachtoy blog tuza.Pan aaj nahi rahil comment dilyashiway

सुप्रिया.... said...

vaachata vaachata majhyahi dolyat paani aal....kas manage kel asashil tu itak sagal?kharach khup himmatvali aahes....hats off dear.....

aativas said...

ही परिस्थिती आपल्यापैकी कोणाच्याही वाट्याला कधीही येऊ शकते. तुम्ही खूप विचारपूर्वक आणि शांतपणे याचा सामना केलात - हे सोप नसत - तुमच्या लढ्याचा इतरांनाही उपयोग नक्कीच होईल.

vaishali said...

मी खूप दिवस झाले तुझा blog वाचत आहे,
आणि सुरुवाती पासून सगळे लेख वाचले आहेत मी पण first time comment करत आहे, खूप खूप खूप daring आहे बाबा तुह्यात seriously

Prof. Narendra Vichare said...

अनघा, मला सगळ माहित असूनही वाचतांना डोळे भरून आले. विशेषत: तू तुझ्या बाबांच्या फोटोचा उल्लेख केलास तेंव्हा... सतत पुस्तकात रमलेले आणि सात्विक चेहऱ्याचे... तुझे बाबा डोळ्यासमोर उभे राहिले आणि मनात विचार आला कि, आज ते हयात असते तर कसलाही वाद न घालता पुस्तकां सहित आपला बाड बिस्तरा गुंडाळून मुकाट्याने चालते झाले असते.. "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" सारखे..... काय वाटते तुला..?

Shriraj said...

मला ययाती मधला एक प्रसंग आठवला.. जेव्हा अमात्य ययातीला समजावून सांगत असतात की "..त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे"

Anagha said...

आल्हाद, माहित नाही मी शूर असणं हे किती खरं आहे. :)

Anagha said...

हेरंबा, :)

Anagha said...

अन्यायाविरुद्ध लढा द्यायची इच्छा मला वाटतं प्रत्येकालाच होत असेल, हो ना अपर्णा ? कोणाला अन्याय सहन करायला आवडेल ? पण नक्की तो कसा आणि कुठे द्यायचा हे नाही कळत. ते नीट सांगणारं कोणी भेटलं ना तरी मग हा लढा बरोबर हुशारीने लढता येतो. वेळ खाणारं, आणि आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेणारं हे सगळं आहे हे मात्र नक्की. बाबा होते तेव्हा बाबा आम्हांला बरोबर मार्ग दाखवत असत. :)

Anagha said...

राघव, आभार. :)

Anagha said...

मंदार, तुम्हीं सर्वजण बरोबर आहात हे मला प्रत्येक क्षणी माहित असतं...आणि त्यातून हिंमत मिळत असते.
आभार रे प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

सुप्रिया, हिंमतीचं माहित नाही...पण 'fight back' करत असते हे मात्र खरं. :)
धन्यवाद गं. :) माहित नाही

Anagha said...

खरं आहे सविता तुमचं...सध्याच्या मुंबईतील परिस्थितीत हे कधीही व कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं.
कोणी बिल्डर दारात उभा राहिला, तर व्यवस्थित डोळे उघडे ठेऊन 'पेपरवर्क' करावयास हवे. त्यासाठी कायद्यातील खाचाखोचा जाणणारा तज्ञ मिळावयास हवा. बिल्डर व म्हाडा आपल्याला फसवायलाच आले आहेत असे गृहीत धरून चाललेले एकवेळ परवडेल.

Anagha said...

वैशाली, :)
आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

'जीवन हे रणांगण आहे...." किती खरं आहे हे श्रीराज...मात्र लढण्यातच राम आहे.

Anagha said...

पुस्तकांत रमलेले...सात्विक व मुलायम चेहेऱ्याचे बाबा. खरं आहे तुमचं सर...
मात्र अन्याय त्यांनी सहन केला असता असं नाही वाटत. कोणाकोणासाठी भांडायला जात असत. एशियाटिक लायब्ररीच्या कर्मचारी व कामगारांच्या पाठी खंबीरपणे उभे रहाणारे बाबाच होते. :)

Anonymous said...

अनघा आईसाठी लढतीयेस तू... पण बाबांचा फोटो जो हातात ठेवतेस नं, तिथे तूझ्याजागी मला मी उभी दिसते.... बाबा ही ताकद आहे माझीही... अख्ख्या जगाशी उभा दावा मांडू शकते मी ते सोबत आहेत तर!!!

हेरंब म्हणतोय तसं महान आहेस तू!!!

Anagha said...

तन्वे, बोडक्याची महान ! दिवसागणिक एकेक येऊन गळ्यातच पडत असतं माझ्या ! म्हणजे असं मला बरेच वेळा वाटतं ! :) :)