नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 5 December 2011

संन्यासी

रिकामं आकाश.
ऐसपैस आकाश.
दूरवर कोणी नेम धरतं. धनुष्याला बाण लावतं. बाण सुटतो. सूर मारत पुढे पुढे येऊ लागतो. येण्याची काही बातमी नाही. काहीही चाहूल नाही. घुसतो बाण. आकाशात. खोल खोल. त्यावर ते आकाश मात्र निशब्दच रहातं. ते भीष्म. एकही शब्द नाही. बाण कधी एकटे. कधी दुकटे. वेडेवाकडे. आरपार. मारा. चहूदिशांनी. अहोरात्र. शरजाल. आकाशाच्या हृदयात घुसून पार आरपार. मग आकाश ? काय आकाश फाटतं ? काय त्याची लक्तरे लोंबू लागतात ? काय चिंधड्या होतात ? शरपंजर अवस्था ? 
आकाश विशाल. पोलादी. त्यावर ह्या अशक्त बाणांचा काय पाड ? येतात. जातात. आल्यासारसे जातात. फक्त काही क्षण. आणि त्यांच्या पाऊलखुणा देखील नाहीश्या होतात.
स्तब्ध आकाश.
स्तब्धतेतून गीता सांगून जाणारे आकाश.
जमिनीवर उभी मी. 
नजर वर जात रहाते.
खोल निळ्या रंगात मी शिरत रहाते.
कुठून तरी आसमंतात ओम घुमू लागतो.
संन्यासी आकाश अजून एक बाण झेलू लागते.

मौनातून माझ्याशी बोलणारे, स्पेनचे आकाश...










१०

११
१२
१३
१४

5 comments:

Aakash said...

Thank You!!

Aakash said...

स्पेनच्या आकाशाखाली, मनात विचारांची पेरणी फारंच सुरेख होते!

आणि स्पेशल Monday Blues वाल्यांना एक खास treat > Blue Skies!!

सौरभ said...

आकाश... तुम इतने byutiphool हो सकते हो ये मैने कभी सोचाही नही था! ;P

हेरंब said...

बेस्टच आहेत फोटो.. १३ आणि १४ खुपच आवडले. (बरं झालं नंबर घातलेस ते :) )

फूल्टू स्पेनमय झालीयेस एकदम सध्या :)

Shriraj said...

सुंदर! :)