नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 11 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ७

भाग १ 
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

जवळजवळ ४५ मिनिटे. फलटणकर आले त्यावेळी मी तिथेच त्याच दगडावर शांतपणे बसून होते.
"चल, वर जाऊया. बघू काय नोटीस लावली आहे."
आम्हीं वर गेलो. आमचा दरवाजा कागदांनी भरून गेलेला होता. किती हे दु:ख ? माझ्या बाबांसाठी, त्यांच्या घराचे काय हे चित्र ? लाल सील आणि पांढरे A४ आकाराचे वेगवेगळे कागद. कुठे माझे बाबा आणि कुठे ही क्षुद्र विचारांची माणसे...त्यांना कायद्याचे महत्त्व आज आता मी नाही दाखवून देणार तर कोण दाखवणार ? बाबांच्याच पद्धतीला अनुसरूनच मी हा लढा देणार. डोळ्यांनी बघितलेली काही दृश्ये...त्यांच्या बारकाव्यांसहित आपल्या पार डोक्यात घुसून रहातात. आणि मग ही दृश्ये, ह्या इमेजेस, आपल्यातील धग कायम जिवंत ठेवतात. जसे आगीत तेल. तीच दृश्ये आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देणारी ठरतात...मी नाही विसरत तो दरवाजा.३० एप्रिलला म्हाडाने आमच्या दरवाजावर लावलेली नोटीस:
'आज, दि. ३० एप्रिल रोजी, म्हाडा कलम ९५-अ अंतर्गत, पोलीस बंदोबस्तात निष्कासन (eviction) आयोजिले असता, आपली खोली कुलूपबंद होती. निष्कासनाबाबत यापूर्वी संबंधित रहिवाश्यास लेखी सूचना दिली होती. ही खोली आज पोलिसांसमक्ष सीलबंद करण्यात येत आहे. यानंतरची कारवाई २ मे रोजी स.११ वा करण्यात येईल तरी त्यावेळी हजर राहावे. अन्यथा त्यामधील सामान पोलिसांसमक्ष जप्त करून निष्कासनाची (eviction) कारवाई पूर्ण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.'
३० एप्रिल शनिवार. १ मे रविवार. 'मुद्दाम शनिवार बघायचा, म्हणजे दोन दिवस आपल्याला मिळतील...ह्या दोन दिवसांत, कोर्टात जावयास, म्हाडा विरुद्ध स्टे ऑर्डर मिळवण्यास नागरिकाला वेळ मिळू नये' हा म्हाडाचा कावा न कळण्याइतकी मी आता दुधखुळी राहिलेली नाही.

तिथून आम्हीं म्हाडाच्या ऑफिसमध्ये दाखल झालो. फक्त फलटणकर आत गेले. मी गाडीत बसून राहिले. राठोड ह्यांच्या बरोबर झालेली तप्त वादावादी ही अशी...
"आम्हीं आमच्या सोयीची जागा बघितली आहे हे कळवणारे लेखी पत्र आम्हीं तुम्हांला दिले होते...जागा १ तारखेपासून मिळणार आहे हे तुम्हांला सांगितले होते....मग हे असले उद्योग करण्याची तुम्हांला काय गरज पडली ?"
"तुम्हीं कुठे जागा बघितलीत ते आम्हांला कुठे कळवलंत ?"
"त्याच्याशी तुमचा संबंधच काय आहे ? आम्हीं आमच्या सोयीची झोपडी बघू...तुम्हांला काय त्याचं ? तुम्हीं, पर्यायी जागा न देता घरातून बाहेर काढून त्या घराचा उपभोग घेण्यापासून प्रतिबंध करीत आहात हे कायद्यात बसत नाही. आणि तुमचे म्हाडाचे अधिनियम वाचा एकदा नीट...हे वागणे बेताल आहे....कोर्टाने २५ तारखेला दिलेल्या आदेशामधील सुचनांची पायमल्ली करणारे हे वागणे आहे. अधिकारांचा गैरवापर आहे....म्हाडाच्या अधिनियमांस धरून नाही"
"तुम्हीं बिल्डरला कळवलंत का ?"
"कळवलं का ? रजिस्टर एडिने पत्र पाठवलंय...कालच. सकाळी भाडेकरार तयार करून मी त्यांना मेल केलाय. आम्ही स्वतः आमची पर्यायी जागा शोधून, त्याची माहिती तुम्हांला लेखी दिली असता, बिल्डरला त्या जागेचे भाडेकरार करण्यास न सांगता, उलट त्याचेशीच हातमिळवणी करून आम्हांला घराबाहेर काढता हे काही बरोबर नाही. तरी त्याला बोलावून घ्या व आम्ही शोधलेल्या जागेचा करार करून त्या जागेचा ताबा आम्हांस देण्यास सांगा तरच आम्हीं आमचे घर रिकामे करू...नाहीतर तुम्हीं तुमचे काम करा....व आम्हीं कोर्टाच्या निदर्शनास ही गैरवर्तणूक आणून देऊ. तुम्हांला आमचं सामान जप्तच करायचंय ना....मग घरातल्या प्रत्येक वस्तूची यादी करावी लागेल...एकेक सुई आणि एकेक बटण....!"
"थांबा, मी बोलावतो त्यांच्या माणसाला." राठोड.
दहा मिनिटांत बिल्डरचे अधिकारी, म्हाडा ऑफिसमध्ये हजर.
"तुम्हीं कधी पाठवलात आम्हांला भाडेकरार ?"
"सकाळीच मेल केलेलं  आहे...तुम्हीं मेल उघडून बघितलं नाहीत त्याला मी काय करणार ?"
"पण त्यात तुम्हीं कोणाची जागा घेत आहात, त्या जागेचा पत्ता काय हे लिहिलेलंच नाहीत !"
"ते कशाला लिहू मी ? त्याच्याशी तुमचा संबंधच काय ? तुमचा संबंध भाड्याशी आहे ना....मग तेव्ह्ढं बघा ना फक्त....मी तुम्हांला त्या मालकाचं नाव आणि पत्ता देणार....आणि मग आम्हांला त्रास देण्यासाठी, तुम्हीं जाऊन त्यांच्याबरोबर झालेला आमचा करार मोडणार....हवंय कशाला हे....तुम्हीं ते भाडं बघा फक्त...नसत्या गोष्टींत दखल देऊ नका....!"
मग फलटणकरांनी तोंडी त्यांना भाडे, डिपॉझीट , इतर अटी व शर्ती सांगितल्या. त्या बिल्डरने मान्य केल्या. त्यानंतरच फलटणकर तिथून बाहेर आले.

"अनघा, आपण त्यांना ह्या जागेच्या मालकाचे नाव दिले नाही, त्यांचा पत्ता दिला नाही म्हणून हा उद्योग केलेला आहे त्यांनी. आपण त्यांचे नाव ह्यांना दिले असते म्हणजे त्यांच्याशी झालेला आपला करार ह्यांनी मोडला असता....आणि मग आपल्याला रस्त्यावर आणायला हे मोकळे.....आणि बिल्डरने ती जी जागा बघून ठेवली आहे तिथे जबरदस्तीने त्यांनी आपल्याला घुसडले असते....हा त्यांचा डाव आहे...आज हे झालंय...ह्याची आपण गंभीर दखल घ्यायचीय...घ्यायचीय ना ?"
"घ्यायचीय ? विचारता कसलं मला...? तुम्हीं सांगा मला पुढे काय करायचं आणि कुठे जायचं....आपण सोडतो काय ह्या अशा माणसांना....? त्यांना काय वाटलं बायकाच आहेत म्हणून काय हे वाट्टेल ते करतील काय ? हे पार शेवटपर्यंत न्यायचं आपण...आत्ता घ्यायचंय का मिडीयाला बरोबर ? सांगा तुम्हीं मला !"
मला माहित असतं...माझं डोकं गरम आहे...
"नाही !...आत्ता नाही मिडीयाला घ्यायचं ह्यात...कायदा आहे...आणि तो आपल्याबरोबर आहे...त्याच्याच मदतीने करणार आहोत आपण हे सगळं...सांगतो...हे आपण काय आणि कसं करायचं..."
आम्हीं तिथून निघालो. संध्याकाळी बिल्डरचा एक माणूस माझ्या घरी आला. मी त्याच्याकडे आम्हीं बघितलेल्या जागेच्या मालकाचे नाव व पत्ता दिला. शनिवार रविवार ह्या दोन दिवसांत आम्हीं शोधलेली जागा, पर्यायी जागा म्हणून देण्याचा, पुढील ३ वर्षांसाठी, करार कागद तयार झाला.

२ मे.
सोमवार.
ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट.
मी, फलटणकर, त्या घराचे मालक, बिल्डरचे अधिकारी असे सर्व तिथे जमा झालो होतो. इथे भाडेकरार रजिस्टर केला गेला.
बिल्डरने पुढील ३ वर्षांचे आगावू भाडे चेक्स घरमालकाच्या स्वाधीन केले. माझ्या हातात किल्ली आली.
"अनघा, बिल्डरचे अधिकारी घराची किल्ली मागतायत....दे त्यांना. बघून येऊ दे त्यांना जागा."
थोड्या वेळाने फलटणकरांना फोन आला..."जागा चांगली आहे...."
फलटणकर हसले...
जबरदस्तीने त्यांना हव्या त्या जागेत आम्हांला ढकलून देण्याचा म्हाडा व बिल्डरचा एक डाव धुळीस मिळाला होता.

३ मे.
मंगळवार.
म्हाडाचे अधिकारी बाराच्या सुमारास आले. सील उघडले. आम्हीं आमच्या सोयीच्या जागी...म्हणजे आईच्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घरी, आईचे सामान हलवणे सुरू केले. कामाला वेळ लागणार होता. तेव्हढ्या वेळात मी व फलटणकरांनी कोर्ट गाठले. म्हाडाविरुद्ध व त्यांचे दोन अधिकारी, श्री. तिवारी व श्री. राठोड, ह्यांचेविरुद्ध 'कोर्टाचा अवमान' वैयक्तिक रित्या केल्याचा तक्रार अर्ज दाखल केला.

दिवस मावळला त्यावेळी एक लढाई संपली होती. आईचे सामान तिच्या नव्या जागी हलवले गेले होते. आईला तिच्या योग्य व सोयीची जागा मिळाली होती.
भारतीय कायद्याने, एका जेष्ठ नागरिकाला स्वाभिमान जपण्यास हातभार लावला होता. 'उतारवयात रहाता येण्यासारखे, घर नाही.' असे स्वाभिमानाला ठेच पोचेल असे काही आईच्या आयुष्यात घडले नाही.

मावळत्या सूर्याला साक्षीला धरून, दुसऱ्या लढाईसाठी आम्हीं रणशिंग फुंकले होते.
क्रमश:

23 comments:

सुहास said...

राजीवकाका आणि अनघा.... मला प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहीत गं... खरंच शब्द नाहीत.

http://goo.gl/Efcyh इतकंच बोलू शकतो... :) :)

हेरंब said...

मी मागच्या दोन पोस्ट्सना दिलेल्या कमेंट्स एकत्र करून देतो.

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी... !!

महान आहेस तू.


आणि


राजीवकाका रॉकस्टार आहेत !!!!!

Gouri said...

अनघा, गेले काही दिवस वाचत नाहीये ब्लॉग ... आत्ता हे सगळे भाग एकदम वाचले. बरं झालं इतके दिवस वाचत नव्हते ते ... क्रमशः चा सस्पेन्स वाचला. पण राजीव काका आणि तू दोघांना दंडवत. मानलं तुम्हाला. हे सगळं आपण करणं गरजेचं आहे, हे माहित असून सुद्धा, कुठे यांच्या नादी लागायचं म्हणून shortcut शोधावासा वाटला असता मला. पुढच्या वेळी बद्दड सिस्टीमसमोर डोकेफोड करायची वेळ आली, म्हणजे तुझं नाव घेणार मी!

alhadmahabal said...

hats off!
माजोरड्यांवर तत्वांनी आणि कायद्यानं, सत्यातही विजय मिळवता येतो... दुसरी लढाई कशी जिंकलीत ते ही जाणून घ्यायची उत्सुकता आहे आता...

!

अनघा said...

सुहास, :)

अनघा said...

सगळ्याच गोष्टीच्या शोर्ट कट्स ची सवय लागलीय ना गं गौरी आपल्याला....पण मग हे आपण नाही करणार तर कोण करणार ? नाहीतर, आपण आपल्याच पोराबाळांसाठी हे अधिक कठीण करून ठेवणार ! त्यापेक्षा जो काय त्रास घ्यायचाय तो आपणच घेतलेला बरं ना ? मग कदाचित थोडेतरी सुकर होतील त्यांचे दिवस ? :)

अनघा said...

आल्हाद, आभार रे :)
...लिहितेय लिहितेय... :)

श्रीराज said...

हे वाचता वाचता कसं कुणास ठाऊक पण मला एकदम तुझ्या डोक्यावर मुकुट आणि हातात त्रिशूल असल्याचा भास झाला

अनघा said...

हेरंबा, तुझी कमेंट कुठेतरी लपून बसली होती ! नशीब आत्ता दिसली ! :) :)

Yashwant Palkar said...

काय प्रतिक्रिया देऊ समझत नव्हत पण अन्याय होतानाची हतबलता खूप छान मांडलीस ताई..
पण त्याच अन्यायविरुद्ध खूप त्वेषाने प्रतिकार केलास....
बाबांची छाती आभाळातून आभाळाएवढी भरून आली असेल तुला पाहून..

वाट पाहत आहे ...
आणि हो त्या चोर अधिकाऱ्यांचे पराभूत चेहऱ्याच छायाचित्र टाकता आल तर बर होईल :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा, त्या चोरांचे दुर्दैव हेच कि, तुझे नाव अनघा आहे आणि तू सच्चा आणि चारित्र्यवान विश्वास पाटीलांची मुलगी आहेस.... हा...हा...हा....

ARUN SABNIS said...

You are Great, Keep it Up. Our wishes are with you,

Arun Sabnis

BinaryBandya™ said...

hats off to u :)

मला एक incometax ची नोटीस आली तरी माझे धाबे दणाणतात :(

अपर्णा said...

Anagha,

Whenever we meet I am going to SALUTE you .....I dont have words for your fight...and yes Rajivkaka is great supporter and fighter...


Take care,
Aparna

अनघा said...

यशवंत, फोटो मिळवणे कठीणच....ह्या युद्धाचे छायाचित्रण नव्हते ना केलेले ! :)
प्रतिक्रियेबद्दल तुझे मनापासून आभार.... :)

अनघा said...

सर ! :) :)

अनघा said...

अरुण, धन्यवाद. :)

अनघा said...

बंड्या, आपण भितो, आपल्याला वेळ नसतो...हे ह्या लोकांना बरोब्बर माहित असतं....शेवटी, आपलीच पिल्लं आहेत ही ! आपणच मारायला हवी. हो ना ?

अनघा said...

अपर्णा, भेट ना मग लवकर ! सलामाच्या कारणाने का होईना ! :) :)

Yogesh said...

अनघा ताई अन राजीव काका....तुम्हाला शि.सा.दंडवत.स्पीचलेस....कोर्ट प्रकरणाचा होणारा मानसिक त्रास अन तो पण आपली काही चुक नसताना...हे सहन करण खुप क्ठीण आहे.

हेरंब said...

मी तेच म्हंटलं माझी कमेंट दिसत का नाहीये !! :)

>>मला एक incometax ची नोटीस आली तरी माझे धाबे दणाणतात :(

Blogger BinaryBandya™, लोळालोळी :DDD

अनघा said...

योगेश, होतो खरा त्रास...पण असंच सोडून दिलं ना आपण न लढता...तर अधिकच त्रास होईल...नाही का ?

अनघा said...

हेरंब, :)