नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 19 October 2010

शोध

आज तरुण मुलींना भेटून त्यांचे मन जाणून घ्यायचे होते. आयुष्याचा जोडीदार शोधताना त्या काय विचार करतात ह्याबद्दल तो शोध होता. त्या शोधाच्या निष्पन्नावर पुढील वर्षाचे क्लायंटचे जाहिरातीचे कॅम्पेन अवलंबून असणार होते. सुरभीने रात्रभर बसून सर्व प्रश्नमंजुषा तयार केली होती. मुली तरुण असणार होत्या, वयोगट २० ते २५. म्हणजे तिच्याहून जवळजवळ दहा वर्षांनी लहान.

सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. जुहूतील एका घरात. हे घर नेहेमीच अश्या प्रकारच्या शोधांसाठी वापरले जात असते.

सुरभीने प्रश्र्नांचा कागद स्वतः समोर ठेवला आणि मुलींशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्या मनाचा तळ गाठण्यासाठी सुरुभीला त्यांची एक सखी बनणे गरजेचे होते. पंधरा सुंदरींचा तो गट होता. सगळ्यांची नावे जाणून झाली. कोणी नोकरी करत होते तर कोणाचे कॉलेजचे दिवस अजून संपायचे होते.

सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा रंगलेला संवाद संध्याकाळी साडेपाच वाजता चहापानाबरोबर संपला.
आपले सर्व कागद गोळा करून सुरभी धावत धावत रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. गर्दी सुरु व्हायच्या आत तिला बोरिवलीची लोकल पकडायची होती. नशिबाने लोकल मिळाली आणि दारात उभा रहायला हवेशीर जागाही मिळाली. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर, तिला आठवले आज सकाळपासून ओळख झालेले चेहेरे. मनात एक उजळणी सुरु झाली. उडणारे केस कानामागे सारले. आणि तिला हसू फुटले. आता काय लिहून देणार होती ती तिच्या बॉसला?
सुरभीच्या नव्या तरुण मैत्रिणींनी तिला असे काय सांगितले होते?

"सुरभी, मी जेव्हा नवीन मोबाईल घ्यायला बाजारात जाते, त्यावेळी मी आधीच भरपूर माहिती मिळवून ठेवलेली असते. बाजारात कुठले मॉडेल मिळत आहे, त्याची किंमत काय आहे आणि त्यात कायकाय गोष्टी आहेत. बरोबर?" तरतरीत दिसणारी श्रीया तिला म्हणाली.
"हो. बरोबर."
"त्याचप्रमाणे, जेव्हा मी माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधायला निघते, त्यावेळी बाजारात कायकाय मिळते आहे ह्याची मी अर्थातच आधी माहिती करून घेतलेली असते."
"आणि मग?"
"मग, मला हव्या त्या गोष्टी ज्यात आहेत असा नवरा मी ठरवेन."
"हो, पण मग बऱ्याचदा आपण आपल्याला आवडेल असा सेल घेऊन तर बसतो. आणि मग काही दिवसांनी आपल्या लक्षात येतं, आपल्या गरजेच्या बऱ्याच गोष्टी त्यात नाहीयेत!"
"अगदी बरोब्बर! मला माहितेय तसंच काही हे ह्या जोडीदार ठरवण्याच्या प्रकारात असणारेय. कितीही काहीही केलं, तरीही मला थोड्याच दिवसात कळणार आहे की मी सिलेक्ट केलेल्या मॉडेलमध्ये खुपश्या गोष्टी नाहीचेत! आणि बाजारात सतत अपग्रेडेशन तर चाललेलेच असते!"
"अगं, मग? मग तू काय अशी नवनवीन मॉडेल्सच्या मागे लागणार आहेस का आयुष्यभर?"
"छे गं! आताही नाही का कितीही झालं तरी हा जुना आउटडेटेड मोबाईल मी गेली चार वर्ष वापरतेय? तसंच! बाजारात त्या चार वर्षांत कित्ती मोबाईल येऊन जुने झालेत!" श्रीया रेशमी केस मागे टाकत उद्गारली.
"नशीब! शेवटी पदरी पडलं पवित्र झालं असंच म्हणायचं मग नाही का?"
"हो. म्हणजे जेव्हढा चालवता येतो तेव्हढा चालवेन मी त्याला!"

"किती वाजतील रे आज घरी पोचायला?" सुरभीने तिच्या नव्याकोऱ्या फोनवरून सात वर्ष जुन्या नवऱ्याला फोन लावला.

19 comments:

Raindrop said...

jab tak chalta hai chalao...nahi to doosra le lo....wah I like this thought :)

any reason why Surabhi's marriage is 7 years old in this story?? is it a premonition of the oncoming 7 year itch to get a new model :)

rajiv said...

yesss vandana, i agree with u. its said that chemical compositions lasts only for 7 years : )

अनघा said...

बघ रे बाबा श्रीराज, हे असे विचार बदललेत हल्ली मुलींचे! ;)

अनघा said...

वंदू, अगं पाच वर्षांच्यापुढे आकडा गेला कि मला आपलं वाटतं, लोणचं अगदी मुरलंय! :)

अनघा said...

राजीव, हे काही नव्हतं हं मला माहित! माझ्या सामान्यज्ञानात आज तुम्ही भर घातलीयत. धन्यवाद! :)

THE PROPHET said...

शेवट अतिभारी!
पण वरची कथा वाचून मला काळजी वाटू लागली आहे!!
.
.
.
.
स्वतःची! :P

सौरभ said...

देवा... काय होणार आजच्या पिढीच्या पोरींचं??? आमच्यावेळी नव्हतं हे असं. साती जन्मी एकच (एकच म्हणजे जो ह्या जन्मी आहे तोच) पती मिळावा म्हणुन देवाची करुणा भाकायच्या... काही संस्कार राहिले नाहीत. मोबाईलशी लग्न करा म्हणाव. [:P][:)][:D][;)]

श्रीराज said...

कालचा विषय थोडा आणखी गहिरा झाला या कथेत. छानंच!!!

ब्लॉगर्समध्ये (मी वाचलेल्या) तू सचिन वाटतेस मला... सातत्य आणि दर्जा दोन्ही ही राखण्यात यशस्वी अशी.

(आणि सौरभ - मुरलीधरन... त्याचे बॉल कसे येतील आणि कुठे वळतील देवालाही सांगता नाही येणार ;)

BinaryBandya™ said...

मनात कितीही आले की जुना mobile बदलायचा आहे तरीही नवा mobile खिशाला परवडायला नको का ?
जे mobile चे , तेच बायकोचे ..
नवी बायको - तिचा खर्च परवडायला नको का :( :(

अनघा said...

hehe सौरभ, आणि मी ही पोस्ट लिहिली तीच मुळी तुम्हां सगळ्यांच्या भल्यासाठी! कळायला नकोत का माझ्या मित्रांना नव्या मुलींचे विचार!! :D

अनघा said...

विद्याधर, सगळेच काळजीत पडले की!! हेहे!! :D

Raindrop said...

kitna acchha hota ke purana bhi rakho aur naya bhi le lo. purana will have antique value and new will have uuuhhmmmm value ;)

अनघा said...

बायनरी बंड्या, अरे, दोन बायकांचा (जुनी आणि नवी!) भारीच पडेल बाबा खर्च! नाही का? :)

अनघा said...

हो...म्हणजे नवा बिघडला कि जुना आहेच का हाताशी?! वा वा वंदू! :)

BinaryBandya™ said...

दोन बायका - नॉट परवडेबल :(

Deep said...

दोन बायका - नॉट परवडेबल>>> yess that's the reason ppl have two mobiles! :D

Sahi lihily pan Surabhi chya lagnalaa 7 yrs. ka he kale naahee :D

अनघा said...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दीपक....खरं तर ७ आकडा का मनात आला माहित नाही! असाच आला आणि मग तोच स्क्रीनवर जाऊन बसला!! :)

संकेत आपटे said...

मी विचार करतोय... लग्न करू का नको? तशीही एका मोबाईलची किंमत जर माझ्यापेक्षा असेल तर काय प्वाइंट लग्न करण्यात? ;-)

अनघा said...

:) तरी लग्न करून बघावंच संकेत बुवा!