नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 19 August 2010

मुंगारु मळिये...कन्नड गाणे

गौरीने मला दिलेल्या कवितांच्या 'खो' चे हे उत्तर! :)
अतिशय मधुर अर्थपूर्ण कन्नड गाणं आहे. सोनू निगमने गायलेलं. मला खूप आवडलं. माझी मैत्रीण वंदना, हिने मला ऐकवल्यावर मी त्या अर्थाने आणि गाण्याच्या नादाने गुंगून गेले. मला आशा आहे, तुम्हांला देखील तोच आनंद मिळेल. कन्नड कवितेखाली मराठी भाषांतर आहे. (माझा एक प्रयत्न!) सर्वात शेवटी युट्युबची लिंक दिलेली आहे. गाणे बघावेसे आणि ऐकावेसे वाटले तर... :)

English-

Mungaru Maleye...
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)

1. Ninna Mugila Saale, Dhareya Korala Premada Maale
(The line you’ve made in the sky, is like the necklace of love to this earth)
Suriva Olumeya Jadimalege, Preeti Moodide
(With the flowing feeling of non-stop rain, Love has bloomed)
Yaava Chippinalli, Yaava Haniyu Muttaguvudo
(In which clamshell, you never know which drop will turn into a pearl)
Olavu Yelli Kudiyodiyuvudo, Tiliyadagide
(Where the bud of love can blossom, has gone beyond my comprehension)

Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)

2. Bhuvi Kenne Tumba, Mugilu Surida Muttina Gurutu
(The cheeks of earth are filled with marks of pearl-like raindrops the sky showered)
Nanna Yedeya Tumba, Avalu Banda Hejjeya Gurutu
(My heart is full of, the footsteps of her arrival)
Hejje Gejjeyaa Savi Saddu, Premanadavoo
(The sweet sound of her anklets, the tune of love)

Yede Mugilinalli, Rangu challi Nintalu Avalu
(In the sky of my heart, she sprinkled color and just stood there)
Baredu Hesara Kamanabillu, Yenu Modeyoo
(Her name written like a rainbow, ah what a spell)

Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)


3. Yava Hanigalinda, Yava Nelavu Hasiraguvudo
(Of which raindrops, which land may turn green)
Yaara Sparshadindaa, Yara Manavu Hasiyaguvudo..
(Of whose touch, whose soul be readied for seeds of love to be sown)
Yara Usirali Yara Hesaru Yaru Baredaro
(In whose breath, whose name is written by whom)
Yava Preeti Huvu, Yara Hrudayadallararluvudo
(Which flower of love, would blossom in whose heart)
Yaara Prema Poojege Mudipo, Yaru Balloro
(Whose love is worthy of worship, who can fathom?)

Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)

4. Olava Chandamama Naguta Banda Manadangalake
(The lovely moon came smiling to my mind’s front porch)
Preeti Belakinalli, Hrudaya Horatide Meravanige
(Lit by the light of love, my heart started off on a procession)
Avala Premadaoorina Kadege, Preeti Payanavoo
(Towards her city of love, the journey of love)
Pranayadoorinalli, Kaledu Hogo Sukhava Indu
(In this fever city of love, for now, go away happiness)

Dhanyanaade Padedukondu Hosa Janmavoo
(I’m grateful to have gotten this new birth)

Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)मराठी-


अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!

ती रेघ तू ओढली आभाळात,
हार तो धरणीच्या गळा.
ह्या अथक झरत्या पावसाने,
फुटे कोंब प्रितीला.

कुठल्या शिंपल्यात
थेंब होईल मोती?
कुठे प्रितीला धुमारे फुटती,
ना चाले माझी मती.

अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!

आकाशाने बरसली मोतीमाला,
धरणीचे गाली त्याच्या खुणा.
मज हृदय भरून गेले,
नाद तो तिचा पावलांचा.
छुमछुम तिचे पैंजण,
प्रीतीची ही धून.
माझ्या हृदय आकाशी,
स्तब्ध तिने शिंपडले रंग
तिचे नाव त्या आकाशी,
जसे हे इंद्रधनुष्य.
अरे, ही काय जादू?

अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!

कुठला थेंब,
करेल हिरवी धरती,
कुठला तो थेंब,
स्पर्शूनी पेरेल प्रिती.
कुठल्या श्वासात,
लिहिले कोणते नाव,
कुठले फूल,
फुलेल कोणत्या हृदयी?
कोणते प्रेम पूजावे हे,
कोण करे हे मोजमाप?

अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!

चंद्र तो हसे,
माझ्या हृदय अंगणी,
प्रितीने उजळे हृदय माझे,
चालू लागे ते दूर प्रवासा,
त्या प्रितीच्या गावा,
हा प्रवास माझा प्रितीचा.
ज्वरभारीत प्रेमगावी.
जा दूर जा आता तू सुखा,
हे तर भाग्य माझे,
मिळे मला हा जन्म नवा.

अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!

माझा खो भानस ला! :)

http://www.youtube.com/watch?v=pGQVSPYX6IE

17 comments:

rajiv said...

अनघा ,
काय हि शब्दांची जादू ,
कुठले उजवे कुठले डावे
कोण करू शके हे मोजमाप
सगळेच तर एकाहून एक उजवे !!

अप्रतिम ! सुंदर लिहिल्येस !
छानच उपक्रम !!

श्रीराज said...

अनघा, छान झालाय गं अनुवाद. मुळ काविता झाकली तर हा अनुवाद आहे हे कळणार देखील नाही :)

Gouri said...

झकास ... येकदम सुपरफास्ट काम हाय बघा अनघाबाय तुमचं. मुंगारु मळिये बघितलाय मी. हे गाणं मस्तच - पण किती वेळा मागे लागले, तरी नवरोबाने पूर्ण अर्थ काही सांगितला नव्हता. आज तुझ्यामुळे कळला तो.

अनघा said...

गौरी,
ही कवितांचा खो द्यायची कल्पना कोणाची? खूपच छान आहे! मला एकदम शाळेत एखाद्या कवितेचा कल्पना विस्तार लिहितेय असंच वाटलं! अगदी असंही वाटून गेलं कि का नाही मी दहावी नंतर आर्ट्सला प्रवेश घेतला! कशाला जे जे ला गेले!! तू मला एकदम आनंदच मिळवून दिलास! मला खो दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद! :)

अनघा said...

श्रीराज, किती मजा ना? तू देखील तयारीत रहा हं, मिळेल तुला पण असा अनपेक्षित खो!! :)

अनघा said...

राजीव, छान वाटला नं हा उपक्रम? कोणाची कल्पना आहे कोण जाणे! :)

rajiv said...

खो खो वरून एकदम कबड्डी वर उतरू नका नाहीतर आम्हाला `वर्षा म्यारेथोन' मध्ये भाग घ्यावा लागेल :)

अनघा said...

हो का? बरं हं राजीव बुवा! :)

Gouri said...

अनघा,अगं मागच्या महिन्यात सुरू झालाय हा खो खो. ‘संदिग्ध अर्थाचे उखाणे’वाल्या संवेदने सुरुवात केली त्याची. या खेळामुळे महिनाभरात केवढ्या तरी सुंदर कविता मराठीत वाचायला मिळाल्यात.

भानस said...

वा! अनघे, अगं अनुवाद खूपच मस्त झालायं. हे गाणे माझेही आवडते आहे. पण त्यातले शब्द नुसते कानावर पडत राहिल्याने ओळखीचे झालेले, आज तू केलेला इतका सुंदर अनुवाद वाचल्यानंतर अर्थ कळला आणि आता अजूनच आनंद मिळेल. मस्त मस्त. मी पुन्हा पुन्हा वाचतेयं. :)

बापरे! मला खो दिला आहेस... :) धन्यू गं. मला खूप आवडेल प्रयत्न करायला. अगं पण थोडे मार्गदर्शन पण कर नं... गाण्याचा अनुवाद( इंग्रजी ) कुठे व कसा मिळेल?

अनघा said...

गौरी, कुठे वाचल्यास ह्या कविता? लिंक देशील?

Raindrop said...

Arey wa :) mast mehfil jami hai :) It surely is a beautiful song.

अनघा said...

Thanks to you Vandu! You made me hear the song! :)

Gouri said...

अनघा, या खो खो ची सुरुवात http://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html इथे आहे. तिथून सुरुवात केलीस, तर एक से बढकर एक अनुवाद भेटतील तुला. प्रत्येक अनुवाद वेगळ्या शैलीतला, आणि नवे खो देऊन संपणारा.

अनघा said...

भाग्यश्री, धन्यवाद गं! :)

सुहास झेले said...

वाह..अप्रतिम
सुंदर शब्द आहेत एकदम...

इंद्रधनू said...

वॉव सहीच.....