नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 7 August 2010

टाळ्या आणि डोकं.

ता थई तक तक थई ...
नऊ दगडांचा रचलेला विषमतोल लगोरीचा डोंगर. एक डोळा बारीक करून नेम धरावा आणि हे स्वर कानावर पडावे. तळमजल्यावर उघड्या दारातून डोकावलं तर एक हाडकुळे गुरुजी डाव्या हातावर उजव्या हाताच्या टाळ्या वाजवत हे असे स्वर फेकत होते. आणि त्यांच्यासमोर माझी मैत्रीण पाय आपटत होती. तीही माझ्याच एव्हढी. दहा बारा वर्षांची.
हे काय आता नवीनच?
"ते माझे डान्सचे गुरुजी आहेत. रोज संध्याकाळी शिकवायला येणार आहेत."
"हो?" माझी चक्र चालू झाली.
" बाबा, माझ्या मैत्रिणीला न डान्स शिकवायला रोज गुरुजी येणार आहेत."
"मग?"
"मग, मी पण जाऊ का बाबा?"
पुस्तकातून डोकं वर काढत बाबा,"म्हणजे काय होईल?"
" मला पण डान्स येईल न बाबा!"
डोकं परत पुस्तकात.
"हो, पण मग पुढे काय होईल?"
एव्हढा पुढचा विचार मी नव्हता केला!
"काही गरज नाही."
"पण का बाबा?"
शांतता.
"बाबा, सांगा ना." मी पण तिच्यासारखा जमिनीवर पाय आपटला.
"मग तू कार्यक्रम करायला निघशील."
?
"आणि मग टाळ्या डोक्यात शिरतात!"
पुस्तकात शिरलेल्या डोक्याकडून पुढे उत्तर मिळायची काहीही सोय नव्हती.

'टाळ्या डोक्यात शिरतात' म्हणजे काय होतं हे काही माझ्या डोक्यात शिरलं नाही.

परंतु नंतर ते 'ता थई तक तक थई' कडे दुर्लक्ष करून, नेम धरून लगोरी फोडणं बरेच दिवस कठीण गेलं खरं!

10 comments:

Raindrop said...

reminds me of the 'hum dil de chuke' ashs intro scene.

'kaay garaz aahe' that phrase has drowned many a boeats that would have otherwise sailed on and touched the stars.

अनघा said...

काय माहिती वंदू, नाचत बसले असते...आणि डोकं फिरवून घेतलं असतं! बाबांची दूरदृष्टी असावी बहुतेक! :)

Raindrop said...

true. what 'could' have been, 'should' have been and 'would' have been are possibilities which no one can answer.

rajiv said...

कदाचित बाबांना त्यांची लेकीचा `perfectionist ' असण्याचा गुण माहित असल्यामुळे , आपली मुलगी नक्की पुढे किती उच्च स्थानापर्यंत पोचू शकेल याची खात्री असणार !
पण ते स्वतः अभ्यासू विद्वान असल्याने, कलेतील प्रगतीमुळे पुस्तकी शिक्षण मागे पडण्याची भीती त्यांना जास्त वाटली असावी :(

Saurabh said...

तुम्ही डान्स शिकून त्यानंतरपण हा ब्लॉग लिहला असता का??? लिहला असता तर आपली काय हरकत नाही. नसता लिहला तर मग शिकला नाहीत तेच बरं झालं. :)
(आणि आता मी आनंदाने नं शिकलेला डान्स डान्सतोय. :P :D खिखिखि)

Sando said...

Parenting is such a difficult job - especially when one imagines oneself in such situations. I dont remember saying 'kaay garaj aahe', but definitely do not have enough time, or energy to motivate my girls to take up something!

रोहन चौधरी ... said...

पुन्हा एकदा बालपणात..............

हातात चेंडू घेऊन मी हा असा उभा... मी लगोरी उडवणारच ह्या विश्वासाने दादा शेजारी खडा... :) उडाली रे... ही पळापळ.... आम्ही चेंडू मारतोय पुन्हा पुन्हा... .. ते पुन्हा लावत आहेत... :D धमाल...

अनघा said...

Sando, I understand what you are saying....thanks for visiting my blog...and am very sorry for not replying back earlier....hope to see you again.. :)

अनघा said...

रोहन, तू दिसलाच हं मला तुझ्या मी न बघितलेल्या दादाबरोबर खेळताना!! :D

अनघा said...

अरे सौरभ, काय माहीत मी एकदम नृत्यकलेवर ब्लॉग लिहिला असता!! hehe!! :D