नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 1 June 2010

अधांतरी

परवा मी आणि माझा कॉपीरायटर मित्र मिटिंगसाठी जात होतो. सारथी मी होते. इच्छित स्थळी पोचायला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागणार होती. आमच्या गप्पा चालू होत्या. 'मुंबईतले गगनचुंबी बांधकाम आणि सुसाट वेगाने गगनाला भिडणारे 'मनीग्राफ', हा विषय.
मी म्हटले," कसे काय आपण ह्या सगळ्यात तग धरू शकणार? इतकी वर्ष आपण मुंबईत रहातोय, पण आता ह्या उभ्या राक्षसांच्या वजनाखाली आपण उच्च मध्यमवर्गीय तर मरूनच जाणार!"
आमचे श्रेष्ठ मित्रवर्य म्हणाले," आधी सर्व प्रथम तू स्वतःच्या डोळ्यांवरची ती पट्टी काढ. भ्रामक समज आधी दूर कर."
समोरच्या रस्त्यावरची नजर शक्यतो न हलवता मी त्याच्याकडे बघून भुवया उंचावल्या.
"तुला कोणी सांगितलं की आपण उच्च मध्यमवर्गीय आहोत म्हणून?"
"म्हणजे? अरे, आम्ही नेहेमीच उच्च मध्यमवर्गीय राहिलो आहोत!" त्याने लावलेल्या चाळणीतून स्वतःला वाचवायचा मी एक प्रयत्न केला.
"ते कुठच्या तरी गावात असेल! काही वर्षांपूर्वी असेल. पण ह्या शहरात नाही! ह्यापुढे नाही!"
"काय बोलतोयस काय तू?"
"अर्थात! विचार कर जरा! परवडतंय का तुला इथे घर घेणं?"

सिग्नल लागला ते बरं झालं. चाळणीतून माझी झालेली घसरण रोखून धरायला मला क्षणभर ब्रेकचीच आवश्यकता होती.
माझ्या लाडक्या मुंबईने माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली होती!

'जाहिरातक्षेत्रात भरपूर पगार मिळतो' कोण बोललं रे हे तिकडे? कोणाचा हा आवाज? काय वाट्टेल ते बोलतात ही लोकं!

6 comments:

Guru Thakur said...

अतिशय कटू सत्य !!!!!!!

Anagha said...

आभार गुरु.
तुझ्या प्रतिक्रियांची मी नेहेमीच वाट बघत असते.

Gouri said...

आज प्रथमच हा ब्लॉग बघितला, आणि एक एक करत सगळ्या पोस्ट वाचून काढल्या ... मस्तच लिहिलंय!

रोहन चौधरी ... said...

There are things that money cant buy ... For everything else ......
"My Salary is Insufficient"

:D :D :D

संकेत आपटे said...

खरं आहे. चार वर्षांपूर्वी २५ लाखांना मिळणार्‍या घरासाठी आजकाल ८० लाख द्यावे लागतात...

अनघा said...

hmmm..संकेत, म्हणजे आमची रवानगी मुंबईबाहेर! :(