तुम्ही शब्दांच्या शोधात येत असाल आणि तुम्हाला सध्या इथे रंग सापडत असतील. तुम्ही मग चित्रावर एक नजर टाकता आणि निघून जाता. तुम्ही भेट देण्यात मात्र खंड पडत नाही, ह्याची मला जाणीव आहे. परंतु का कोण जाणे सध्या शब्दांनी नव्हे तर रंगांनी मला आधार दिला आहे. कॉलेजचे दिवस सरले आणि रंग, कुंचला ह्यांच्याशी असलेले नाते हळूहळू धुसर होत गेले. ऑफिसमध्ये कुठल्या कामासाठी एखाद्या चित्राची गरज पडली, एखाद्या स्क्रिप्टसाठी स्टोरीबोर्ड करावयाचा असला तर एखाद्या चित्रकाराला स्क्रिप्ट समजावून देऊन त्याच्याकडून मनासारखे काम करून घेणे चालू झाले. कारण अंगावर तीच जबाबदारी आहे. मी बसून चित्र काढणे गृहीत नाही. परंतु, काही दिवसांपासून मन सारखं ओढ घेत होतं ते कागद, रंग आणि कुंचला ह्यांच्याचकडे. जुने सवंगडी दारावर थाप मारत होते जणू. तेव्हा सध्या मी त्यांच्या स्वागतात गुंतलेली आहे. रोज ऑफिसमधून परत आले की त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसते. कधी गप्पा रंगतात तर कधी फसतात. पण हरकत नाही.
मैत्री जेव्हा सगळेच बांध, ओलांडून पुढे जाते तेव्हाच तर ती रंगते.
हो ना ?
मैत्री जेव्हा सगळेच बांध, ओलांडून पुढे जाते तेव्हाच तर ती रंगते.
हो ना ?
8 comments:
सुंदर!
Khup Sundar!
loully :D
फारच उत्तम कौशल्य आहे!
बोलकी चित्रे!
भाग्यश्री, आभार ! :)
लीना, बऱ्याच वर्षांनी पुन्हा सुरवात केली आहे. आभार गं ! :)
सौरभ आभार ! :)
अभिषेक, प्रयत्न चालू आहेत ! :) :)
Post a Comment