मी देव मानते का ? देव आहे कुठेतरी आणि तो माझ्याकडे लक्ष ठेवून आहे अशी
माझी समजूत वा श्रद्धा आहे. आयुष्यातून उठता उठता वाचल्याने त्याचे पुरावे
देखील माझ्याकडे बरेच आहेत. फक्त देवाचे दिवस म्हणून उपवास बिपवास मी पाळत
नाही. आणि त्याहीपुढे जाऊन त्याचे दिवस म्हणून त्यात्या दिवशी फक्त शाकाहार
बिकाहार करणे असे मी आजतागायत कधीही केले नाही.
ही स्वत:बद्दलची माहिती जागतिक स्तरावर जाऊन देण्याइतके काय घडले ?
परवा घरी जाताजाता, रस्त्यात कानठळ्या बसणारा आवाज कानी आला. गाडीच्या बंद खिडकीतून अगदी आरपार. एक मिरवणूक चालली होती. प्रभादेवीच्या मुख्य रस्त्यावरून. मी गाडी पुढे काढली तर उजव्या हाताला काही माणसे, एक पालखी खांद्यावर धरून चालत होते. व त्यापुढे तरुण मंडळी नाचत होती. लाऊडस्पीकरवर आयटम सॉंग कर्कश वाजत होतं. तरुण तरुणी कंबर हलवत, छाती पुढे काढीत, एकमेकांच्या अंगाला अंग लढवत नृत्य करीत होते. ह्या गर्दीमुळे रस्त्यावरील कुठल्याही गाडीला वेग असा काही नव्हताच. मी खिडकीची काच खाली केली आणि एका चाळीशीच्या माणसाला शुक शुक केलं.
"अहो...ओ साहेब..."
साहेब खिडकीपाशी आले आणि थोडे खाली वाकले. "काय ?"
"पालखी चाललीय काय ?"
"हो हो....पालखी चाललीय..."
"कोणाची ?"
"साईबाबांची !" इतकं सुद्धा ह्या बाईला माहित असू नये ?
देवांच्या खास दिवसांबद्दलची माझी माहिती शून्य असल्याकारणाने माझे अज्ञान त्या गृहस्थांपुढे साफ उघडे पडले होते.
"हो काय ? छान छान. पण मग साईबाबांसाठी आयटमसॉंग ? त्यांना आवडतं काय ?"
हॅ हॅ हॅ...करून दुर्दैवी साईबाबांचा तो भक्त फिदीफिदी हसला. आणि मी पुढे गेले.
पापाचा घडा नक्की कधी भरतो ?
तो घडा नक्की असतो तरी किती मोठा ? त्याचा आवाका किती असतो ?
कलियुगात त्या घड्याला खाली मोठे छिद्र पडले आहे काय ?
त्यामुळे आता कधीही तो भरण्याची सुतराम शक्यता उरलेली नाही....
आणि त्यामुळे ह्या मूर्ख भक्तांच्या पापाचे घडे कधीही भरणार नाहीत.
आणि आमचे साईबाबा, गणपती आणि दुर्गा...हे असेच आयटम सॉंगवर गल्लीगल्ली फिरत रहाणार !

28 comments:
पापाचा घडा फार मोठा असतो अहो !
पण कलियुगात देवाला (बाकीच्यांची) लवकर दया येते म्हणे.. :)
या असल्या एकजात सगळ्या निर्लज्ज भक्तांना त्या घड्यात कोंबून टाकलं पाहिजे !!!!
पाप्यांनी भरलेला पापाचा घडा :)
>>>>या असल्या एकजात सगळ्या निर्लज्ज भक्तांना त्या घड्यात कोंबून टाकलं पाहिजे !!!!
पाप्यांनी भरलेला पापाचा घडा :)
+१ ....फार फार अनूभव घेतलेत गं या ’भक्तांचे’ आणि त्यांच्या भक्तीचे :(
kharach ekada kadhi tari kalayala havay ya ghadyacha vyas....
Shradha
हेरंब,
+१
या असल्या एकजात सगळ्या निर्लज्ज भक्तांना त्या घड्यात कोंबून टाकलं पाहिजे !!!!
पाप्यांनी भरलेला पापाचा घडा :)
नशीब अजून पंढरीच्या वारीत असं काही होत नाही.
मला वाटतं, तुमचा देव हा अगदी खास दोस्त असतो. त्याच्याबरोबर ज्या गप्पा मारायच्यात, त्या उगाच जगजाहीर करू नयेत, आपापसातच ठेवाव्यात. मिरवणुका काढून शक्तीचं प्रदर्शन होतं, भक्तीचं नाही. हे करणार्यांना भक्त तरी कसं म्हणावं?
अनघा, मला काय वाटतं सांगू... जग देव नाही चालवत. जग हे नियमांवर चालतं; म्हणजे मी लोकांना त्रास होईल असं काही वागलो तर मला त्याचा त्रास होणारच आणि मला तो तोपर्यंत भोगावा लागेल जोपर्यंत मी माझी ती वाईट कामं थांबवत नाही; पण समोरच्याला माझे ते भोग कळण्याचा काहीच मार्ग नसतो. ते फक्त माझे मलाच भोगायचे असतात. इलेक्ट्रॉनला जसे अणु केंद्रका भोवती फिरावेच लागते तेवढेच नैसर्गिक नियम वाटतात मला हे.
:)
:D :D
त्या आयटम साँग च्या कर्णकर्कश आवाजामुळेच देव बहिरे झाले असावेत...म्हणून खऱ्या भक्ताची आर्जवं त्याला एकूण येत नसावीत,...
नाहीतर बडव्यांनी त्याला इतकं घेरल्यामुळे त्या देवाचाही श्वास गुदमरून तो तिथून नाहीसाही झाला असावा...
सगळंच धन्य आहे ग ताई .....
गोपींचे घडे फोडणारा कृष्ण आठवला मला !
धन्यवाद शार्दूल. :)
'पाप्यांनी भरलेला पापाचा घडा !'
हेरंब, अवाढव्य घड्याची गरज आहे !
वीट आलाय तन्वे ह्या लोकांच्या खोट्या भक्तीचा !
श्रद्धा, :)
महेंद्र, लोकं शिकली म्हणायची तर हे प्रकार देखील वाढलेच ! :(
पंकज, काय देव त्याची वाट बघतोय ?
किती सुंदर कल्पना आहे गौरे ! सुंदर ! :)
खरंय श्रीराज, हां असा विचार प्रत्येकाने करायला हवा. इथे मात्र त्रास देण्याच्या प्रकारात एकमेकांबरोबर चढाओढच लागलेली दिसतेय !
तृप्ती, :)
हसताय का तुम्ही बोंगाळे महाराज ? :)
सुप्रिया, देव उठून निघून गेला असावा असं मलाही बऱ्याचदा वाटतं...
जगदंब.. जगदंब... :)
सुप्रिया, देव उठून निघून गेला असावा असं मलाही बऱ्याचदा वाटतं...
>>> ब्लड डायमंड चित्रपटात असे एक वाक्य आहे... त्यात लिओनार्डो म्हणतो,"God has left this continent (Africa) a long time ago."
तसेच काहीसे झाले असेलही.. :)
मला रोहनचे नवल वाटतेय; म्हणजे आपण वाचत असलेल्या लेखाला तात्पर्य शोभेल असे एखादे वाक्य नेमक्या वेळी आठवणे हे तसे सोपे नाही. माझ्याकडून रोहनला hats off !
अगं आजचं बघ...
प्यार की पुंगी, ४ बज गये लेकिन पार्टी अब भी बाकी हैं, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये, अपनी तो जैसे तैसे, दम मारो दम, जानू मेरी जान मैं तुझ पें कुर्बान, लैला ओ लैला आणि सोबत बाबासाहेबांचा जयजयकार... :( :(
रोहणा, म्हणजे बरंच झालं म्हणायचं...आपण देवाच्या नावाखाली पापं करायला अजूनच मोकळे !
अगदी अगदी श्रीराज ! :)
शिक्षणाने काही फरक पडतो की नाही शंकाच आहे सुहास !
Post a Comment