नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 29 September 2011

शहाणी बाहुली

[चाल - ला बाइ ला]

या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया. १

ऐकू न येते,
हळूहळू अशि माझि छबी बोलते. २

डोळे फिरविते,
टुलु टुलु कशि माझि सोनी बघते. ३

बघा बघा तें,
गुलुगुलु गालातच कशि हंसते. ४

मला वाटतें,
इला बाई सारें काहिं सारें कळतें. ५

सदा खेळते,
कधिं हट्ट धरुनि न मागे भलतें. ६

शहाणी कशि !
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी. ७

दत्तात्रय कोंडो घाटे.

आठवणीतल्या कविता (भाग दुसरा)

ऱ्हस्वदीर्घ, कानामात्रा, अनुस्वार मी जसेच्या तसे टाकले आहेत ! अगदी वेगळे वाटले तरी. खूप जुनी कविता असल्याकारणाने व्याकरण वेगळे असावे.

तसेच, ह्या कविता संग्रहांवर कीर्ती कॉलेजचे ग्रंथपाल श्री. बर्वे, कवी व प्राध्यापक रमेश तेंडुलकर ह्या व अश्या अनेक अभ्यासू व मान्यवरांनी अविरत मेहेनत घेतलेली आहे. त्यामुळे हे व्याकरण त्यांच्या नजरेखालून गेलेले आहे व ते तसेच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मग मी कोण त्यावर जाऊन ते बदलणारी ? कारण त्यात मराठीतील व्याकरण प्रवास देखील दिसून येतो. नाही का ? 

सहज पुस्तक चाळत होते. आणि ही कविता समोर आली. कालौघात झिपरी झालेली माझी परदेशी बाहुली आठवली...
तिच्या आठवणींना हे पुष्प...सप्रेम.
:)

11 comments:

rajiv said...

छान आहे हि कविता ! एक गोड आठवण या कवितेबद्दल ...
माझ्या लेकीने मोठ्या शिशु वर्गात, या कवितेवर एक २० मिनिटाचे नाटुकले केले होते.
आणि त्याला सुमारे ३ आंतर शालेय स्पर्धात १ली बक्षिसे ही मिळालीत !!
आभार !! त्या सर्व गोड आठवणी सक्काळी सक्काळी आठवून देऊन !!

Gouri said...

:)

हेरंब said...

ही (किंवा अशीच काहीशी) कविता मला पहिलीला होती बहुतेक.. :)

Shriraj said...

मला ही अगोदर असं वाटलंच... हिने असं का लिहिलंय... खूप घाईत होती वाटतं :P
खालच्या ओळीत सगळं स्पष्ट झालं...

कविता सुंदरच आहे... मी पामर काय बोलणार त्यावर ?!

Anagha said...

तृप्ती, तुला आठवली का तुझी अशीच एखादी बाहुली ? :) :)

Anagha said...

अरे वा ! राजीव...अभिनंदन अभिनंदन ! :)

Anagha said...

गौरी बाई... आभार...:)

Anagha said...

मलाही होती ही कविता हेरंबा... :)

Anagha said...

मला कळलंच ते श्रीराज ! म्हणून ते लिहिलं बाबा ! ...कारण हे असं टाईप करायला मला जाम विचित्र वाटत होतं ! :)

सौरभ said...

हि नक्की लहान/मोठा शिशु मधली कविता असेल!!!

Anagha said...

तुला पण होती वाटतं ही कविता सौरभ ? :)