आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवीच्या समुद्राजवळ जाण्याचा योग होता. समुद्राला ओहोटी होती. कचऱ्याला भरती होती. माणसे समुद्रावर प्रातर्विधि आटोपत होती.
परतताना बघितले फुटपाथांवर अंघोळी चालू होत्या. रस्त्यात कचऱ्याचे डबे ओसंडत होते.
सव्वा नऊच्या दरम्यान घराबाहेर पडले. ऑफिसला जाण्यासाठी. शिवाजी पार्क ते फिनिक्स मिल. इतकाच रस्ता. शहरातील कचरा अजून काढून झालेला नव्हता. प्रभादेवीला लागले. नजरेस सदा सरवणकर ह्या पुढाऱ्याच्या लेकाचा वाढदिवस माझे शहर साजरा करताना दिसले. शुभेच्छांचे रंगीबेरंगी फलक लटकलेले नजरेस पडले.मनात शुभेच्छा नाही उमटल्या. शाप मात्र तीव्रतेने डोक्यात उसळला.
आठवण झाली...लहानपणीची. रस्ते सकाळी सातच्या आत स्वच्छ होत. महिन्यातून एकदा पाण्याने धुतले जात.
माझे बेवारशी शहर.
ना माय ना बाप.
फक्त एक भला मोठा कचऱ्याचा डबा.
आणि मग आम्हीं ? आम्ही कोण ?
आम्हीं कोण म्हणुनी काय पुसता ?
आम्हीं त्या कचऱ्यात इथेतिथे फिरणारे उंदीर आणि घुशी.
उकिरड्यावर ऐषोआरामात जगणारे.
कदाचित आंधळे.
मात्र ठार बहिरे. आप्पलपोटी.
आपमतलबी.
मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आम्हीं.
कुत्रं पण फिरकत नाही आमच्याकडे !
आणि मग आमचे पुढारी ?
ती गिधाडे !
लचके तोडणारी...
पुरवून पुरवून मारणारी.
टोचे मारून मांस खाणारी...
जसे आम्हीं तसेच तर आमचे पुढारी.
माझे बेवारशी शहर.
ना माय ना बाप.
माझ्या शहराची अंतिम प्रेतयात्रा चालू आहे !
या सामील व्हा...
माझ्या शहराची अंतिम प्रेतयात्रा चालू आहे !
17 comments:
:(
:(
अनघा, कासच्या स्वप्नातून एकदम जमिनीवर आणलंस बघ या पोस्टने.
कळत होता ते मला गौरी...पण काही इलाज नाही...सत्य हेच आहे. आपण हरलो आहोत ह्या पुढाऱ्यांपुढे...त्यांच्यासाठी शापच येतात रोज तोंडी. आणि हे असे असंख्य लोकांचे शाप घेऊन नक्की कसले मरण ते अंगावर घेतायत तेच जाणोत.
असंख्य कावळ्यांचे शाप...ही ढोरं नक्कीच मारून जातील !
आनंद... :|
खरंय :( :(
अगदी खरंय अनघा! ज्याम चीड येते! पुढच्या पिढ्यांना काय काय भोगावं लागणार असंही वाटतं! आणि हे ***** निघालेत मुंबईचं शांघाय करायला! :(
काय करायला हवंय तेच कळत नाहीये सुहास !
काय माहित विनायक ! आपल्या कर्माची फळं शेवटी आपली पुढील पिढीच भोगणार !
शिवाजी कसा काय घडवता येतो ते त्या जिजामातेलाच ठाऊक !
हेरंब, रडण्यापलीकडे काय हाती आपल्या ? मत द्यायला अगदी जाते मी मोठी...पण एक साधा धड उमेदवार नाही आमच्या वॉर्डात ! सगळे एकजात हरामखोर आहेत ! आणि त्या सगळ्यांचे ते घाणेरडे थोबडे रोज बॅनरवर बघून आता इतका संताप झालाय की माझ्या जन्मात मी त्यांना कधी मत देणार नाही !
अनघा खूप वाईट वाटलं वाचताना...तोंड कडू झालं... पण ते होणारच... सत्य हे बऱ्याच वेळी असंच कारल्यासारखे असते बाहेरून खडबडीत आणि आतून कडू. आशा करूयात की पुढल्या पिढीसाठी ही कारली उरू नयेत.
:(( Naailaaz jagan....Naalayak Pudharyanmule :((
ऑ.. काय राव!!! एक कचरापेटी बघून एवढं वाटतय तुम्हाला!!! सकाळी सकाळी कारशेडची लोकल रेल्वे रुळावरचे माईन्स चुकवत पकडून बघा!!!
the soul of the shahar has gone into hiding...it is time to go and look for it in the jungles...for a long time i used to fight with people who said 'the city is dying'....but now I don't. It's dead n gone...only beelines of people who either cry or rejoice in it :(
कोण जाणे पुढे काय होणार आहे श्रीराज....
सौरभा, एकूण काय...तुला मला रोजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात जी काही आपल्या शहराची झलक दिसते...ती सुखकारक नसतेच...
वंदू...आता निवडणुका येतायत ना जवळ...बघ कसे दारात एकेक करून उभे रहातील....भांडं धरून हातात...!
हताश व्ह्यायला होतं हे सगळं बघून सुप्रिया....आजही गेले तीन दिवस आमच्या गल्लीतील कचरा काढला गेलेला नाही ! दसऱ्याच्या दिवशी देवीच्या विसर्जनासाठी जाणाऱ्या माणसांनी पेपर प्लेट्स खाली रस्त्यावर टाकून दिलेल्या..त्या आजही जश्याच्या तश्या आहेत !
Post a Comment