नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 8 September 2011

चिंब !



हे गाणं मला खूप आवडतं....पण तरीही...

ना धड इथलं ना धड तिथलं असं एक वय असतं...आणि त्या वयातून आपण सगळेच जातो...मीही गेले.
...तर असाच पाऊस लागला होता. कुठल्याशा क्लासवरून मी परतत होते. एकटीच होते...सोबत छत्री नव्हती. आणि मस्त पावसाची सर आली. मला चिंब भिजवून गेली. कसली मज्जा आली !
घरी पोचले तर आई वरच्यांकडे गेलेली होती. मी तशीच जिन्यांवरून उड्या मारत तिथे गेले...आणि अगदी जाहीर आरडाओरडा केला..."आई काय मज्जा झाली माहितेय ! मी येत होते ना परत तर ना पाऊस आला...आणि मी ना मस्त भिजले !"
"खाली जा आधी !" आईचा आवाज चढला...पुढल्या क्षणी पाठीत एक धपाटा बसेल असे वाटले...मी तशीच धावत खाली आले...आणि कपडे बदलले. आई खाली आली. "काय गरज काय होती मला वर येऊन तू किती भिजलेयस ते सांगायची ?! तुला माहितेय वरती सगळे दादा असतात ! सगळी मुलं आहेत त्यांच्याकडे ! एव्हढं साधं कळत नाही तुला ?! तिथेच एक ठेऊन देणार होते !"

ह्म्म्म...
ह्या श्रीदेवीला कुणी एक ठेवून दिली नाही वाटतं !
एव्हढी मोठी झाली तरी कळत नाही...एव्हढा मोठा माणूस बघतोय...आणि पिवळी तलम साडी नेसून करतेय हातवारे...भर पावसात ! बिच्चारा आमचा हॅन्डसम विनोद खन्ना किती त्रासलाय !
:)

26 comments:

Raindrop said...

nahi ase bhizlo....ani nahi ashi talam sadi nesun bhizlo tar pudhchi pidi kashi yenar existence madhe ;)

इंद्रधनु said...

हे हे हे

हेरंब said...

हाहाहाहा :))

@Raindrop : Jabari..

सौरभ said...

अरे माझ्या देवा!!! हे गाणं लय पकाऊ आहे बरं का.. विनोद खन्नाला पोटात शूळ झालाय त्याला कोणी कडवट काढा प्यायला दिलाय असं एक्स्प्रेशन. गाणंच टाकायचं होतं, तेपण श्रीदेवीचंच, आणि तेपण पावसातलं तर मि. इंडिया मधलं "काटे नही कटते" ला जास्त मार्क देईन मी.

अपर्णा said...

raindrop ने हसवलं आणि तू भिजवलं...
नारदाच्या वाक्याला बाबांनी टाळी सारखं..

Anagha said...

:D कळलं हा मला इथे बसून वंदू...तू दिल्लीतल्या पावसात सध्या काय करतेयस ते !!!! आना देव... पुढची पिढी ! :D

Anagha said...

इंद्रधनू... :D

Anagha said...

हेरंबा....पाउस आहे का तिथे ???? एखादी सर तरी ??? :D

Anagha said...

ए ! गप्प रे ! विनोद खन्ना मला कुठल्या कुठे आवडतो ! उगाच बोलू नकोस त्याला ! फटके मिळतील हा सौरभा ! तू श्रीदेवीकडे बघ...विनोद खन्नाकडे नको....:D

Anagha said...

अपर्णा...मग...कुठल्या रंगाची साडी ? ;)

हेरंब said...

एखादी सर??? अग आयरीनपासून नॉनस्टॉप चालू आहे पाउस. आठ दिवस झाले आता. गेले चार दिवस तर प्रचंड मुसळधार. इतका की श्रीदेवी नुसती भिजणारच नाही तर वाहूनही जाईल ;)

रच्याक, सौरभशी सहमत ! श्रीदेवी म्हटल्यावर माझ्याही डोक्यात सगळ्यात आधी "काटे नही कटते" च आलं होतं. माझंही फेव्ह आहे ते.

Anagha said...

पण हेरंबा, माझ्यासाठी इथे प्रश्र्न विनोद खन्नाचा देखील आहे ! विनोद खन्ना ! तेच गुण त्या गाण्यात अनिल कपूरमध्ये दिसत नाहीत ना ! ;)
आणि हो ! श्रीदेवीच्या नादात मी 'आयरिन'ला विसरलेच ! :(

भानस said...

हा हा... वंदू जबरी त्यावर कडी सौरभने केलीये... पण विनोद खन्नाच्या चेहर्‍यावर तसेच भाव आहेत... :D:D

Anagha said...

भाग्यश्री, कोणी काही चांगलं बोलतंच नाहीये विनोद खन्नाबद्दल ! :(
कशा ग तुम्ही बायका ?! :D :)

BinaryBandya™ said...

हाहा ..

टिप-टिप बरसा पानी बद्दल काय मत आहे ?

(हे जरा लेटेस्ट आहे .. )

Gouri said...

चिंब पावसाचं गाणं म्हणजे पहिलं डोक्यात येतं ते "रूप तेरा मस्ताना"च. तेंव्हा वंदूशी सहमत ;)

Anagha said...

हे हे गौरी ! तुमच्या गावात पण पडतोय ना मस्त पाऊस ?! ;)

विनायक पंडित said...

अनघा, माझ्या पीसीवर गाणं का हो दिसत नाहिए? शी बाबा!:( बाकी विनोद खन्ना ज्याम आवडतो मला पण! :) तेव्हा अमिताभ की विनोदमधे आम्ही विनोद खन्नाचं पारडं चांगलंच जड करायचो चर्च्यांमधे! पण मग तो त्या रजनीशांच्या मागे कशाला गेला?:( असो! ’काटे नही कटते’ ला मात्र +१०० :-) तुमची पोस्ट खरंच आवडली.

Anagha said...

मस्त ! विनायक कित्ती बरं वाटलं मला ! ह्या सगळ्या बायका बघा ना कश्या करतायत ! उगाच आपल्या विनोद खन्नाला नाव ठेवतायत ! :D
दिसलं की नाही शेवटी गाणं...पाऊस...आणि श्रीदेवी ? ;)
आभार हं आणि...
आता सगळ्यांचं हे बोलणं ऐकून...सगळ्यांना खुष ठेवण्यासाठी ते 'काटे नही कटते' पण टाकावं की काय असा विचार करतेय ! :)...

Anagha said...

ह्म्म्म...बंड्या... :D

Anonymous said...

अनघा मी आहे गं तुझ्यासोबत ... मलाही आवडायचा विनोद खन्ना... अक्षय खन्नाही आवडतो... :)

श्रीदेवी मात्र मि.ईंडियातली :)

>>>इतका की श्रीदेवी नुसती भिजणारच नाही तर वाहूनही जाईल ;)

हेरंबा :)

Anagha said...

आहेस ना ग तन्वे तू तरी माझ्याबरोबर ?! बरं झालं बाई ! विनायक सोडून बाकी मेले हे पुरुष जळतात गं विनोद खन्नावर ! ;) :p

आनंद पत्रे said...

सौरभशी सहमत... काटें नहिं कटते रॉक्स!!! :-)

Anagha said...

hmmmm...
:) :)

Shriraj said...

अनघा, ह्या आधीची पोस्ट वाचल्यानंतर ही पोस्ट वाचताना वाटलं एका दिवसाच्या अंतराने केवढा हा मूड-बदल!!!!

---

सौरभ, तुला माहितेय लहानपणी जेव्हा टीव्ही वर "काटे नहीं कटते" लागायचं, तेव्हा जर आजूबाजूला मोठी मंडळी असली तर आम्ही चक्क ढोपरात तोंड लपवत असू ... प्रचंड लाज वाटायची... एवढी कदाचित त्या श्रीदेवीला पण वाटली नसेल... ते गाणं शूट करताना

Anagha said...

हेहे ! श्रीराज !!! :D माझी लेक करायची हे उद्योग ! म्हणजे अशी काही गाणी लागली आणि आजोबा बाजूला बसलेले असले की चॅनल बदलायची ! उगाच आजोबांच्या मनावर परिणाम नको ! म्हणून ! :p