नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 6 September 2011

दोन किडे...

सकाळी सकाळी डोक्यात मिक्सर लागला.
डोकं उघडलं...
नुसताच लिबलिबीत, चिपचिपीत गोळा बाहेर आला...
त्यात होते दोन किडे...
एक होता श्रीयुत वळवळ...
आणि दुसरा श्रीयुत खळबळ !

१. श्रीयुत वळवळ
माझा दावा...
माणूस असण्याचा.
माणसासारखं प्रेम केलं...
माणसावर प्रेम केलं.
माणसासारख्या चुका केल्या.
तू.
माणूस.
तू + दारू.
राक्षस.
मग राक्षसाला प्रेम करायला का बरं देवता हवी ?

२. श्रीयुत खळबळ
घुसमट.
भोवळ.
जशी भोवऱ्यात अडकलेली.
किती प्रयत्न करावा...
ह्यातून बाहेर पडण्याचा.
पण नुसतीच उलथापालथ...
नुसतीच डुचमळ.
घशात श्वास अडकावा.
छातीवर मणमण ओझे पडावे.
जशी कोणी बासरी, बूचं लावून बंद करावी.

11 comments:

Gouri said...

का ग?
:(

Raindrop said...

premaat rakshas rakshas disat nahi....devta la vatata ha saada ganit....soppyane tu+daru sandhi cha vicched karta yeil....pan tyala kalale nahi to ekach shabd hota :(

Anagha said...

हम्म्म्म...गौरी...बऱ्याच युद्धपातळ्यांवर लढायला लागतंय सध्या...चालायचच.

Anagha said...

वंदू...

सौरभ said...

दोनो टाईपके किडोके लिए अपने घर लेके आईए लाल हिट और काले हिट का कॉम्बिनेशन... सुपरहिट...

भानस said...

मला वाटल होते की आता निदान पुढचे काही दिवस तरी हे असे किडे करायची नाहीस.. पण तू नं अशी आहेस... बयो, जरा आनंद मनव की... :)

Anagha said...

भाग्यश्री, माझी किडेगिरी....कोर्टात दोन केसेस....दर पंधरा दिवसांनी मुंबई सिव्हील कोर्ट...साध्या साध्या गोष्टींसाठी चढावी लागलेली कोर्टाची पायरी....पुन्हा पुन्हा...
:)

आनंद पत्रे said...

:(

सौरभचं कौतूक, कितीही डिप्रेसिंग पोस्ट असली तरी तो त्याच्या स्टायलीतच कमेंट देतो...

Anagha said...

:D आनंद, सौरभची कमेंट हे नेहेमीच माझ्या डिप्रेसिंग मुडावरचं औषध ठरलंय ! मी चाललेले असते कुठे भलतीकडेच आणि हा एकदम रस्ताच बदलतो ! :D
आभार रे प्रतिक्रियेबद्दल. :)

Shriraj said...

अनघा, तू भोगलेल्या भोगांची 'पूर्ण' कल्पना कदाचित मला एवढ्यात करता येणार नाही; पण दारू + मानवाला दानव होताना मला काही घरातून हल्ली पाहायला मिळालंय... त्यामुळे पुरुष जे बोलतात की बायकांना दारूची विनाकारणच भीती वाटते ते चुकीचे आहे

Anagha said...

श्रीराज, :)