Product development...भाग १
महाराष्ट्रातील निवडणुकांचे दिवस जसजसे पुढे सरकत होते तसतश्या पैश्यांच्या उलाढाली वाढत होत्या. करोडो रुपये. फक्त एका महिन्यात. हल्ली कार्य दिसून येत नसल्याकारणाने जाहिराती भरमसाठ कराव्या लागतात. नाही का ? टिळकांनी कधी रस्तोरस्ती फलक लावले ? काय गांधीजींनी रंगीबेरंगी जाहिराती छापल्या ?
एका पक्षाचे, जाहिरातींचे काम आम्हांला मिळावे म्हणून आमच्या एजन्सीचा प्रयत्न होता. एकाचवेळी अनेक एजन्सीज ह्या चढाओढीत उतरणार होत्या. आणि ते काम मिळणार होते मात्र एकाच एजन्सीला. ह्या सर्व जाहिरातींची भाषा, बहुतेक करून मराठी असणार होती. आमचे अख्खे ऑफिस त्यावर काम करणार होते. प्लानर्स, सर्विसिंग, क्रिएटीव्ह, फिल्म विभाग आणि अगदी डिसपॅचदेखील. पंधरा दिवस. रात्रंदिवस.
ज्या पक्षासाठी काम करत होतो त्या पक्षाची विचारधारा मनाला पटत होती का ? एक विचार मनाला टोचून गेला. नाही असे नाही. पण आता असा कुठला पक्ष आहे ज्याचे आचारविचार मनाला पटतात ? नाही ना ? मग द्या सोडून. उगाच डोक्याला नाट !
ह्या सर्व प्रकाराला आम्ही आमच्या रोजच्या भाषेत 'पिच्च' म्हणतो. म्हणजे स्पर्धा असे म्हणता येईल. गुणवारी ठरवण्यासाठी बऱ्याच बाबी लक्षात घेतल्या जातात. फक्त 'क्रिएटीव्हीटी'वर ही स्पर्धा कोणी कधी कमीच जिंकते.
तर आम्ही कामाला लागलो. मिटींगा झडू लागल्या. मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये बरेच मॅक हलवले गेले. वेगवेगळ्या टीम्स तिथे एकत्र बसून भेजा फ्राय करू लागल्या. गरमागरम तवा...त्यावर लुसलुशीत भेजा ! मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न फुटावे तसतश्या टपाटप कल्पना (आयडीया) फुलत होत्या व फुटत होत्या. व त्याच गतीने बॉस मंडळी आमचे गरमागरम पॉपकॉर्न काचेबंद खिडकीबाहेर फेकून देत होते. टप टप. हलकेच... तरंगत तरंगत मग ते पॉपकॉर्न गतप्राण होऊन जमिनीवर पडत असावेत. आणि खाली सडा...पांढऱ्या पारिजातकाचा नव्हे. मृत कल्पनांचा ! लगेच अश्या पोटावर पडलेल्या रक्ताळलेल्या बायका का बरं आल्या डोळ्यासमोर ? हा ! 'ती' कल्पना. 'तो' कल्पना नाही. ढँन्टढँण !...फ्रस्ट्रेशन म्हणतात ह्याला...जे आम्हा सर्वांना आलं होतं. आठवड्याभरात.
मग एका रविवारी. मी व माझा एक मराठी मित्र. दोघेही आर्ट. कॉपी नाही. पण शेवटी आर्ट आणि कॉपी काय फरक ? नाही का ? कल्पनांना भाषा नसते. मग त्या रविवारी आम्ही दोघांनी कल्पनेची ऐशी की तैशी केली. डझनावारी कागद उलटेपुलटे वापरले. निराशेच्या भरात टराटरा फाडले. ढीगभर स्क्रिबल्स केली. पाच सहा वेगवेगळ्या साइट्सवर इमेजेस सर्च केली. आणि ! आणि दोन तासांनी 'घेऊन टाक' ! घेऊन टाक झालं ! म्हणजेच 'आयडीया क्रॅक' केली ! अडकित्यात अक्रोड घ्यावा व जोर लावावा. क्रॅक ! झाली ! झाली ! आयडीया क्रॅक झाली !
मग पुढे हेडलाईन्स, बेसलाईन्स, कॉपी...वगैरे वगैरे. मराठी...मराठी आणि मराठी. करुनशान टाकलं. हापिसात बसून. सोमवारच्या मिटिंगसाठी सगळं तयार केलं ! लेआउट सकट ! आणि सटॅक ! सोमवारी सटॅक अप्रुव्हल ! सब बॉसेसने हम दोनोंकी कल्पना को पसंद किया....क्योंकी हमारी कल्पना एकदम कडक थी !
मग पुढचे पाच दिवस एक्झिक्यूशन ! हा रूट तुम्हीं आता फिल्ममध्ये कसा पुढे नेणार...आणि त्याचा रेडिओ स्पॉट कसा होणार ? लॉंचअॅड कशी असणार ? फोलोअप अॅडसचं काय होणार ? हे व असे बॉसेसना पडलेल्या प्रश्र्नांची उत्तरे. एक ढीग. कल्पनांची एक रास. मॅकवरच्या फोल्डरची वजनवाढ. १ जीबी. २ जीबी, १० जीबी...मेंदूचा किलोभर कीस आणि फोल्डरच्या वजनात १ जीबीची भर. फायलीत फाईल. प्रेस, होर्डींग्स, रेडिओ, फिल्म्स, एव्ही, इनोव्हेटिव्ह प्रेस अॅड्स, इनोव्हेटिव्ह होर्डींग्स...ब्ला ब्ला आणि ब्ला.
पाच दिवस नो झोप.
क्लिक, सेव्ह, डिलीट.
फोटोशॉप, गुगल, इलस्ट्रेटर...
फोल्डर त्यात दहा फोल्डर्स आणि दहा फोल्डर्स मध्ये प्रत्येकात कमीतकमी ५ फाइल्स.
तो दिवस उजाडला. "Hey ! Sharp at 11 o'clock. Big conference room. We all are meeting...be there with all your stuff...try to carry everything." बॉसची सेकी.
थप्पी. मी माझी थप्पी उचलली. दुसरा ग्रुप. त्यांची माझ्यासारखीच एक थप्पी. त्यांचा रूट देखील इंटरनल प्रेझेंटेशनसाठी जय्यत तयार. रंगीत तालीम. त्या राजकीय पक्षाने रात्री आठ वाजताची वेळ आम्हांला दिली होती. त्या आधी आम्ही सर्वजण एकत्र बसून, रंगीत तालीम करत होतो.
प्रथम बॉसचे पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशन. हे तुम्हीं (म्हणजे त्या राजकीय पक्षाने ) आम्हांला ब्रीफ केलंत...आम्ही त्यावर असा असा अभ्यास केला...त्या अभ्यासात आम्हांला असं असं मिळालं...आणि म्हणून आम्ही हा एक असा रूट घेतला..."Ya. Now Sandy you'll take over." तो रूट प्रेझेंट करणारा संदीप. एक मराठी मुलगा. इंग्लिश माध्यमात शिकलेला. कॉपी रायटर. संदीपला आज्ञा दिली गेली. संदीप उभा राहिला....एक छोटं भाषण...हा रूट आम्ही का घेतला...व घेतला तो घेतला...तो पुढे कसा नेला...ही अशी दिसणार व बोलणार तुमची फिल्म, हा असा गाणार तुमच्यासाठी रेडिओ, ही घ्या तुमच्यासाठीच खास बनवलेली प्रेस अॅड आणि हे बघा कसं झकास दिसतंय तुमचं होर्डिंग...
बॉसच्या बाजुलाच मी दोन फुटांवर. का बरं ? का बरं मी समोर नाही बसले ? Whatever ! हातात कागद...कागदावर फिल्म स्क्रिप्ट्स. टेबलावर पुढ्यात प्रेस अॅड्स आणि वगैरे आणि वगैरे. ह्या वगैरेची उंची एक फुट.
आणि हळूहळू...अगदी हळूहळू तो माझ्या हृदयावर येऊन बसू लागला. नकळत. ज्यावेळी स्थिरस्थावर झाला त्यावेळी तो शाळेतला प्रचंड आकाराचा जुना दगड, मला पुन्हा एकदा जाणवला. श्वास घ्यायला त्रास. हातपाय थरथर.
संपलं संदीपचं. " Nice. That's good ya ! Very nice !" सगळे म्हणू लागले. संदीप चेहेराभर हसला.
"ya...now Anagha, I will go back to my presentation...and I will give a little background of your route...okay ?" इति बॉस. मी जड मान हलवली.
३ मिनिटांचं PPT ! संपायला तीनच मिनिटं लागली...आणि सगळ्यांच्या नजरा तडक माझ्याकडे लागल्या. लांबसडक गोल टेबलाभोवती आम्ही सगळे बसलो होतो. बॉस माझ्या उजव्या हाताला. काहीजण डाव्या हाताला. काही समोर. जवळपास दहा बारा लोकं. बसूनच प्रेझेन्टेशन करायचं होतं. मी सुरु केलं...हे आणि हे आणि असं आणि तसं...तसं आणि तसं...धाडधाड. चार मिनिटं आणि माझं बोलून संपलंच. हातातील कागदांची चळत संपली. २/३ स्क्रिप्ट्स, २/३ रेडिओ. समोरचे वेगवेगळे प्रिंट आउट्स. पोस्टर्स, होर्डींग्स, लॉंच अॅड, फोलोअप अॅड्स...पंधरा दिवसांची अहोरात्र मेहेनत आणि मोजून चार मिनिटांची आगगाडी. आली कधी आणि गेली कुठे...कोणाला काही म्हणून काहीही पत्ता लागला नाही. सगळे गप्प. चिडीचूप.
"Anagha, you are going too fast. See, I'll tell you. You do one thing...you look at me in between your presentation. If I do this...that means you are going too fast and you need to go slow...ya ? Don't worry...you will be fine."
...असं, म्हणजे बॉसने हात हळूच टेबलावरून उचलला आणि हलकेच दोनदा खालीवर केला.
"ya...I will keep that in mind." क्षीण स्वरात मी पुटपुटले.
"Or do you want me to ask someone else to present ? Tell me."
कल्पना माझी. आणि सादर कोणीतरी दुसराच करणार...मग अप्रेझलच्या वेळी हा सर्व एपिसोड माझ्या विरोधात जाणार ! गटांगळ्या खाताना दिसलं मला सगळं...तोच तो दगड गळ्याशी बांधून...इन्क्रिमेंट, प्रमोशन सगळं खोल खोल...
"No...I'll do it." त्या दगडाच्या खालून माझा खोल खोल क्षीण आवाज.
"And practice again in the afternoon...ya ? Ask somebody to sit in front of you and practice...okay ?"
मी मराठी. प्रेझेन्टेशन मराठी माणसांना द्यावयाचे होते. आपल्या मराठी राजकारण्यांना.
परीक्षा होती. जी मी एकदा नापास झालेले होते. त्यावर बरीच वर्षे उलटली म्हणून काय झाले ?
वर्षे उलटली म्हणून काय माणूस बदलतो ?
क्रमश:

19 comments:
samajhdar ko ishara hi kafi hai :)
I am curious!!! pudhe kay zale
खरे आहे , एकदा लेबल चिकटवले की बदलणे खूप कठीण असते . पण आपण चिकटवलेले लेबल बदलणे हे आपल्याच हातात असते.
हाहा.. मस्त वर्णन केलंयस.. उत्सुकता लागून राहिलीये अगदी.. :)
आता मात्र उत्सुकता वाढली आहे. जिंकलीस ना शेवटी ??
यथार्थ वर्णन ..
आता पुढे काय होणार याची
उत्सुकता आहे..
एकदम चित्रमय लिखाण
प्रसंग डोळ्या समोर उभे राहिले...
मस्तच मला आवडले.....
लोकांचे ‘प्रॉडक्ट फेल’ गेल्याचे जुने शेरे आठवले, त्यांचा तेंव्हा किती त्रास झाला होता हेही आठवलं. आपल्याच मनात एक प्रतिमा निर्माण होते यातून आपली ... आपल्यालाही तसंच वाटायला लागतं हळुहळू, नाही का ग? पुढे काय झालं ते सांग ना लवकर उत्सुकता लागून राहिलीय.
वंदू, :)
लिहितेय रे बाबा ! श्रीराज... :) :)
अगदी खरं बोललीस गं सुमेधा !
धन्यवाद हं. :)
हेरंबा, लिहिते...लिहिते पटापट ! :)
लिहिते गं भाग्यश्री ! धीर धर ! :) :)
अगदी गं गौरी...ढगच जमा होतात मग...काळोखून टाकतात नुसते !
लिहिते गं लवकरच ! :)
तृप्ती, लिहिते हं मी लवकरच ! :)
आणि आभार गं !
छान! तुम्ही नक्की नक्की यशस्वी व्हावं असं वाटतंय! तो ’दगड’ जाणवणं म्हणजे काय भयानक चीज असते! आता मनाचा दगड, घेतो कण्हतं उशाला.. आठवलं! (उगीच!:))
अगदी अगदी विनायक ! :)
अनघा, आपल्या कॉलेजमध्ये वर्गात मी दिलेल्या माझ्या पहिल्या लेक्चरला नव्हतीस हे बरे झाले...हा..हा...हा.....
:) मी कल्पना करू शकते सर ! धांदल उडालेले तुम्हीं ! :D
फाश्ट लोकं फाश्टच बोलतात... आपणपण असे फाश्ट फाश्ट प्रेसेंटेन्शन्स दिलेत...
Post a Comment