देव काहीतरी डोक्यात घेऊन गेम प्लान करतो...
मला अजिबात विश्वासात घेत नाही...
मी उगाच मग इथेतिथे भरकटते...
तो फक्त मजा बघतो.
त्याच्यावर विश्वास ठेवते म्हणून काय झालं ?
थोडी तरी कल्पना नाही का देता येत ?
एकमेकांना विश्वासात घेऊन गोष्टी केल्या तर त्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते...
साधी गोष्ट कळत नाही त्याला.
जसा काही कॅरमचा एक डाव...
मी मांडून ठेवते.
तो येतो...
एका फटक्यात डाव फोडून जातो.
मी मग एकटीच बसते...
काळा दिवस आणि पांढरी रात्र...
गर्तेत सारत !
मला अजिबात विश्वासात घेत नाही...
मी उगाच मग इथेतिथे भरकटते...
तो फक्त मजा बघतो.
त्याच्यावर विश्वास ठेवते म्हणून काय झालं ?
थोडी तरी कल्पना नाही का देता येत ?
एकमेकांना विश्वासात घेऊन गोष्टी केल्या तर त्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते...
साधी गोष्ट कळत नाही त्याला.
जसा काही कॅरमचा एक डाव...
मी मांडून ठेवते.
तो येतो...
एका फटक्यात डाव फोडून जातो.
मी मग एकटीच बसते...
काळा दिवस आणि पांढरी रात्र...
गर्तेत सारत !
19 comments:
:(:(:( बयो, का घाबरवते आहेस? काय झालं गं?
:(
काळा दिवस आणि पांढरी रात्र...
गर्तेत सारत !
बापरे!!
अगं त्याचा देव vs देव असाच गेमप्लन असतो ... आपल्याला उगाचच वाटतं आपण मांडलाय, आपण खेळतोय म्हणून ...
तरीही, पुन्हा मांडायचा घाट घालावाच आपण.
क्या बात है!!! म्हणावसं वाटत होता पण तुझ्या काळजीने विचारतोय-
क्या बात है?
आणि कित्येकदा रडीचा डाव असतो त्याचा !! :(
हम्म्म्म....ठीक आहे गं भाग्यश्री. :)
बंड्या, जास्तीच घसरली ना गाडी ?! :(
:)
गौरी ! हसायलाच आलं मला ! देव vs देव !! :D :D आणि मी फक्त बाजूला बसून बघत असते वाटतं ?! आणि मला उगाच वाटतं की मीच खेळतेय !
अगं, माझ्या बहिणी आणि नवरा पूर्वी सारखे खेळत असायचे कॅरम ! आणि मला येत नाही म्हणून घ्यायचेच नाही खेळायला ! मग मी अशी असायचे...बाजूला बसून बघत ! :D
श्रीराज, 'क्या बात है' ह्यात लिखाणाचं कौतुक आहे...तेच मला छान वाटतंय !
आणि आता डोस्कं ठीक आहे...त्यामुळे हसायला येतंय ! :)
रड्याच आहे रे तो हेरंबा ! वेडपट कुठला ! :)
(इंटरनेट वापरत तर नसेल ना तो ?!)
;) :p
हो ना ...कधीच आधी कल्पना देत नाही तो ...same condition होती माझीही ..अर्थात तुझ्या सारखे नसते जमले शब्दात मांडायला ...पण आता माझे हि डोक्से ठिकाणावर आले आहे ..म्हणून हि प्रतिकिर्या......
apan tyachya mothya gameplan chya chhottushya part aahot....aplya carrom coins phutat astanna dusrya konachya lagori stones pile up pan hot astil.....hech tyacha game!! ani aplya khishyaat raani aali tenvha dusrya konacha zero var run out pan honaar.....
it is like....he is organising the olympics and we are all in our little arenas....some on the track n field...some in the pool....some on the archery ground.....some heading back home retired and hurt while new substitutes making way in....we know the medals tally only in the end :(:(
तृप्ती....मध्ये मध्ये घसरते गाडी...पण 'ती अशी का घसरते' ह्याचा मी डोक्याला त्रास करून घेणं सोडून दिलंय ! तिच्याकडे दुर्लक्षच केलं ना की ती येते आपोआप रुळावर ! :)
तसं नाही हा वंदू, आपण त्याच्या मोठ्ठ्या गेम प्लानच्या छोटुश्या सोंगट्या असलो ना तरी तो त्याचा प्रत्येक सोंगटीकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. फक्त त्याने अख्खा गेम आखून ठेवलेला असतो आणि आपण तो तुकड्या तुकड्यात खेळतो...म्हणून मग जरा अधेमध्ये गोते खातो ! :)
खेळ मांडला... मांडला... मांडला... (read it with fade-out effect)
अरे क्विन कुठे?? बाकी सोंगटी को जाने दो.. स्ट्रायकर तमारा, नेमपण तमारा... फोकस ऑन रानी.. ज्यूस पिवो, कॅरम रमवो, मज्जानी लाईफ... रानी तो तमारीच छे (*conditions apply - विथ/विदाऊट कव्हर)
हेहे ! सौरभ ! मला कोणीही घेत नाही खेळायला...हापिसात पण नाही ! :D
काय झालं गं?..I know I am asking late...but this is scary...:(
ह्म्म्म. अपर्णा, आलीय गं गाडी रुळावर ! :)
(म्हणजे परत सरकणार नाही अशी काहीही खात्री देत येत नाही बरं का ! :p :D
Post a Comment