काही दिवसांपूर्वी, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील ह्यांच्यासमोर जाण्याचा योग आला होता. त्यांनी व मी, पाटीवरील गमभन, एकाच वेळी एकाच शाळेत गिरवले होते. मग मनात आलं, त्यांना आपली छापील पाटी भेट द्यावी. 'पाटी माझी पटेल का' पुस्तकावर सुवाच्च अक्षरात त्यांचे नाव टाकले. माझी नेहेमीची मराठमोळी सही उमटवली...आणि पाटी त्यांच्यापुढे धरली. त्याआधी पाच मिनिटे, १२ डिसेंबर २००२ साली बाबा गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील काही दिवस विविध वर्तमानपत्रात आलेली त्यांच्याविषयक कात्रणे पाटीलसाहेबांसमोर ठेवली होती. आणि मग त्यावर माझी पाटी ! साहेबांनी पुस्तक चाळायला सुरुवात केली होती. आणि मनाला काही विचित्र वाटले. काहीतरी चुकीचे. स्पष्टीकरण गरजेचे.
"हे माझ्या ब्लॉगवरील लेखांचे एक छोटेसे पुस्तक." मी दोन्ही हात एकत्र गुंफत, बोटं मोडत म्हटलं. साहेब मान खाली घालून पाने उलटत होते.
"म्हणजे बाबा, वैचारिक, गंभीर विषयांवर लिहित असत..."
"...हं..."
जणू, सोन्यापुढे, पितळाने मिथ्या मिरवावे...आणि बघणाऱ्याने पितळ हाती घ्यावे...
मला एका वाक्यात 'पाटी'चा सारांश करणे व त्यांच्या कानावर घालणे अत्यंत जरुरीचे झाले.
"माझं आपलं साधसुधं लिखाण आहे...म्हणजे जन्मल्यापासून, मुंबईतील स्पर्धात्मक आयुष्य जगता जगता...सामान्य माणसाचे आयुष्य जगताना आलेले हे आपले माझे अनुभव...त्याव्यतिरिक्त काही नाही...!"
पालकमंत्री हसले.
एकच शाळा आणि एकाच इयत्तेच्या प्रेमाने त्यांनी पुस्तक गुळगुळीत लाकडी काळ्या मंचावर ठेवले.
...एक चुटपूट आपली माझ्या मनात...
...उंच भरारी मारणाऱ्या, अवकाशात पंख पसरलेल्या पक्ष्याच्या अथांग सावलीत; कोणा चिमणीने रहावे आणि उगा ती धरतीवर क्षितिजापार पसरलेली सावली माझीच म्हणून शेखी मिरवावी....असेच काहीसे.

23 comments:
आम्हालाही हवे आहे आपल्या हस्ताक्षारासाहित तुमची पाटी... मिळेल का?
फाSSSSर विचार करतेस तू !! :)
अरे हेरंबा ! अशीच आहे मी ! जित्याची खोड आहे ती ! :D
हेहे ! मिळेल मिळेल ! रोहणा, नक्की मिळेल ! :p
पण चिमणीलाही स्वतःची सावली असतेच .. हे कळेलच न सगळ्यांना, ती अथांग सावली दूर झाल्यावर ..
one thing which very few realise is that ek mothya vatvruksha chya saawleet kaahit grow karat nahi....pan tu grow zhalis...ek chottusa plant mhanun nahi pan ek mothi tree zhalis (ok maybe not as big as the vatvruksha)...that itself speaks volumes about the struggle that the lil plant has to go thru fighting the sawlee and growing where nothing grows!!
>>जणू, सोन्यापुढे, पितळाने मिथ्या मिरवावे...आणि बघणाऱ्याने पितळ हाती घ्यावे... वाह.....
मला पण पुस्तक. पटणारी पाटी पाहिजे.
मलाही हवं स्वाक्षरीसहित पुस्तक! :)
लेखकाच्या स्वाक्षरीसकटचं माझं पहिलंच असेल! :D
>>>मलाही हवं स्वाक्षरीसहित पुस्तक! :)
लेखकाच्या स्वाक्षरीसकटचं माझं पहिलंच असेल! :D
मलापण मलापण :)
बाकि हेरंबला अनूमोदन गं!!!
मला वाटतं तुला सह्यावाल्या कॉप्यांसाठी एक स्पेशल आवृत्ती काढावी लागेल! :P
राजीव, चिमणीची चिमुकली सावली ! :)
Vandu, love you for being there all the time...through out good and bad...and you know, I mean it. :)
इंद्रधनू, आभार. :)
:D पंकज, देते देते. :)
मले चिडवू नको हा विद्याधर ! :p :)
:D चिडवनेका नही हा तन्वे ! :D
अगं, जित्याची खोड ती....! :)
तीव्र निषेध... मला माझी कॉपी मिळाली नाही अजून.
उपोषणाला बसवणार की काय तु मला, झेपणार नाही गं ह्या पामराला ;-)
तू भेटतोस तेव्हा लक्षातच नाही रहात ! आणि नंतर आठवतं सुहास ! :(
अनघा, तुमच्या दोघांच्याही लेखनाचा बाज वेगळा आहे; पण मला दोन्हीही तितकेच वाचनीय वाटतात.
आभार श्रीराज. :)
पालकमंत्री जयंत पाटील ह्यांच्यापर्यंत पाटी पोहोचली.... क्या बात है!!!! आता शाळेतील प्रत्येक मुलामुलीने ह्या पाटीतले धडे गिरवावेत.... आणि ही पाटी आम्ही सगळीकडे पोहोचवणार....
आवाऽऽऽऽऽऽज कोणाचाऽऽऽऽ अनघाजींचा.... :D
:D :D :D सौरभबुवा !!!! :D
काम आलं का तुमचं आटोक्यात ? थोडी तरी उसंत मिळाली का बुवा तुम्हांला ? :)
Post a Comment