नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 22 April 2011

माझा जिना...


जो जिना चढता असतो, तोच जिना उतरतो देखील...नाही का ?
की उलट....?
जो जिना उतरतो....तोच जिना चढतो ?

मी जिना चढते आहे.....की मी उतरते आहे ?

मला जिना, कधीच सरळ नाही उतरता येत...
लहानपणापासून मला उतरायची घाई लागलेली आहे.... धाड धाड.
आणि माझा चढता जिना मात्र संथ...तसा मंदच असतो...

देव करो, माझा जिन्याला उतरण न लागो....

26 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

हम्म! आपल्यावर असतं सगळं. रस्तात सुद्धा चढ असतात, तेच उलट बाजूने येताना उतरण वाटतात. काही ठिकाणी उतरण असते तीच परतताना चढ वाटते. अनुभवांतून माणूस शिकतो अडचणींना तोंड द्यायल आणि मात करायला. अनुभवातून माणूस शिकतो पराभवाचं दु:ख पचवायला आणि यशाची झिंग अनुभवयाला. देव करो, तुझा प्रगतीच्या जिन्याला चढच असावी आणि अडचणींना उतरण. :-)

Anagha said...

:) धन्यवाद गं कांचन ! शुभेच्छांबद्दल आभार ! :)

Raindrop said...

abhi teri lift ki baari hai...jina hua purana

हेरंब said...

'जिने' के लिये सोचाही नही दर्द संभालने होंगे !!

Shriraj said...

अनघा, तरी बरं तुझ्या जिन्यावर उजेड तरी पडतोय... संथपणे की होईना न धडपडता चढता तरी येऊ शकतं. माझा जिना तर तिन्ही त्रिकाळ अंधारात... सतत ढोपर फोडून घेतोय :)

Shriraj said...

...पण काळजी करू नकोस... त्या कासवासारखी तूच जिंकशील बघ!!

Anagha said...

हेहे ! वंदू, म्हणजे आता मी 'लिफ्ट करा दे' 'लिफ्ट करा दे' म्हणायला सुरु करू वाटतं ? :p

Anagha said...

:D :D हेरंबा, भारी ! हसायलाच आलं मला ! :D

Anagha said...

:D श्रीराज बुवा, तुम्ही थोडे इथे तिथे धडपडलात तरी अजून ठीक आहे ! माझं आता पडणं थांबलं तर जरा बरं होईल! नाही का ?

http://www.facebook.com/home.php#!/video/video.php?v=10150169109193749&comments

काल ना मी फेसबुक वर एक लिंक पाहिली...IPS officer म्हणून. मला वाटतं तू पण बघितलियस. त्यात तो म्हणाला "माझ्या प्रत्येक अपयशाला मी म्हणत गेलो...अपयश ही यशाची एक पायरी असते...आणि शेवटी वळून बघितलं तर मी अपयशाचा एक जिनाच चढून आलो होतो !"
काही म्हण, ते ऐकून मी इतकी हसत सुटले ना ! :D
फक्त एक आहे की आता तो यशस्वी झाल्यामुळे हा असा अपयशावर विनोद करून सगळ्यांना हसवू शकतो व अपयशाकडे सकारात्मकरित्या बघावयास शिकवू शकतो ! नाही का ?

बापरे ! किती बोलते मी ! :p

Anagha said...

आणि हो ! श्रीराज, त्या जिन्यावर उजेड आहे ना ?! त्यामुळे तो बघ चढताच वाटतो...प्रकाशाकडे जाणारा...उतरता नाहीच वाटत ! :)

Trupti said...

hello anghaji,
me tumcha blog wachte...mala aavdato..mana pasun lihilele...mana la bhidatech....thanks...shubhechha!
trupti :)

Anonymous said...

>>>>देव करो, तुझा प्रगतीच्या जिन्याला चढच असावी आणि अडचणींना उतरण. :-) +१००

काय मॅडम विचारात टाकता ना हो :)

हेरंबा :)

Anagha said...

तृप्ती, खूप खूप आभार. लिहिते खरी मनापासून....तुला हे लिखाण आवडतं हे वाचून मला खूप बरं वाटलं....कोणीतरी आपल्याबरोबर ह्या कठीण रस्त्यावर आहे....असं काहीसं... :)

Anagha said...

तन्वी, गोंधळ घालते ना मी ?! डोक्यात असं काहीतरी चालू असतं माझ्या ! सतत ! :)

Shriraj said...

अनघा, पटलं!!

Anagha said...

श्रीराज, आभार... :)

भानस said...

'जिने' के लिये सोचाही नही दर्द संभालने होंगे !!
+1000000000

Anagha said...

भाग्यश्री, कुठून सुचतं ह्या हेरंबाला कोण जाणे ! :D

सौरभ said...

हाहाहा... "जिना" इसिका नाम है!!!

Anagha said...

:D :D

रोहन... said...

सौरभने माझी प्रतिक्रिया ढापली... (उशिरा पोस्ट वाचायचा परिणाम)
खरच जिना इसी का नाम है... :) शेवटी आपण जितके वर वर जातो तितकेच खाली येतो अनघा...

there is a famous quote "its upto every individual how high they want to scale a mountains, as they themselves see there own decends on their way back."
आणि काय गं... हा खरच तुझ्या घरच्या जिन्याचा फोटो आहे... मस्त आहे एकदम... :)

Anagha said...

ह्म्म्म...खरंय रोहणा, दमछाक होते खरी पण ! :)

THEPROPHET said...

माझ्या एका मित्रानं अशाच अर्थाची एक Stairwell म्हणून पोस्ट लिहिलेली काही वर्षांपूर्वी .. ती आठवली!

Anagha said...

तू आणि रोहन, किती पेशन्सने इतक्या दिवसांचं राहिलेलं वाचताय विद्याधर ! प्रेमाने...हो ना ?
त्याबद्दल तुम्हा दोघांचे खरोखर मनापासून आभार ! :)

Anonymous said...

थॉट आवडला.
बाकी हा फोटो कोणी काढलाय? लाल निळयाचा कॉन्ट्रास्ट मजा आणतो. आणि मधला काळा...

:)

Anagha said...

आभार अल्हाद. :)