कसलं तरी आर्टवर्क जायचं असतं. आणि त्यामागे जीवाची तोडमोड ! बेजबाबदार माणसं...स्वत:च्या जबाबदारीवर नको ते निर्णय घ्यायला निघतात...आणि घाणेरडं काम करून त्या प्रिंट आउटवर सह्या मागायला येतात !
आर्टवर्कचे दोन भाग असतात. बहुतेक वेळा तरी. एक इमेज आणि दुसरं लाइन आर्टवर्क. दोन्ही कामे वेगवेगळी माणसे करतात. ही कामे चालतात आमच्या स्टुडियो विभागात. स्टुडियो प्रमुखाने, जे आर्ट वर्क जायचे आहे त्याची सर्व प्रथम क्लायंटकडून अप्रूव्ह होऊन आलेली फाईल बघणे, ही अतिशय प्राथमिक गरज. ती फाईल बघूनच त्याला कळणार आहे, ते आर्ट वर्क आपल्या स्टुडियोतील कोण माणूस चांगले करू शकेल ! सिंपल ! पण नाही ना ! स्वत:च्या मुर्खपणाने ज्या कामाला फोटोशॉपची गरज आहे ते काम जो माणूस लाईन आर्टवर्क करतो त्याला देऊन कसे चालेल ? पण दिले ना ! आणि आल्या रात्री जेपेग्स माझ्या अप्रूव्हल्ससाठी !
मग ? आरडा ओरडा ! केस घ्यायची....बोंबाबोंब करायची ! बेसिकली, गोष्टीचा इश्यू करायचा ! घाणेरड्या कामावर मी सही देणार नाही ! जा खड्यात ! स्वत:च्या जबाबदारीवर पाठवा फाईल्स रिलीजसाठी ! पिरीयड !
काल जे आर्ट वर्क शांतपणे, बरोबर निर्णय घेऊन, डेड लाईनमध्ये जाऊ शकलं असतं...त्यावर आता एक मोठ्ठा इश्यू झाला....बोंबाबोंब झाली....रक्त आटवावं लागलं...
...स्टुडियोत आर्ट वर्क चालू आहे.
मी माझ्या मॅकवर सहज माझं फोटोंचं फोल्डर उघडलंय....
मस्त पाऊस...दूरदूर वाहता धबधबा....हिरवंगार माझं कोकण...
कसला ताळमेळच नाही...
जीवाचा आटापिटा....
घर चालवा...
पैसे कमवा....
मुलांना वाढवा...
आणि दुरून दुरून येणारी माझ्या मस्त उन्मत्त कोकणाची हाक ?
कान बंद. डोळे बंद. फोल्डर बंद. मॅकच बंद !
कोकणाकडे दुर्लक्ष.
घराकडे लक्ष !
डोकं नका चालवू मॅडम !
त्यापेक्षा घर चालवा !
:(

27 comments:
ह्या रखरखीत कामाच्या राम रगाड्यात आणि चैत्री वणव्यात ... हे हिरवेकंच रान एकदम जीवाला थंडावा देऊन जात्येय
मस्स्त !!!!
:) कसलं मस्त दिसतंय ना राजीव !!
आर्टवर्क, स्टुडियो, फोटोशॉप वगैरे शब्द बदलून अपग्रेडस, डेडलाईन, डेटासेंटर वगैरे शब्द टाकले की झाली माझी पोस्ट... बाकी फोटो बिटो बघणं सगळं सेम.. !!! शेम. साली शेम जिंदगी :(
कसलं सगळं मस्त हिरवंगार आहे ना हेरंब ! आणि माझ्या ऑफिसच्या खिडकीतून नुसत्या उंच उंच बिल्डींगी दिसतात ! वैतागेय ! :(
joshi buwanni bhaarich ghol ghatlela distay :) ani tu bara kelas disconnect houn shaantpane foto takles... na taal na mel, doosre ki galati main kyon loo jhel!!!
:) वंदू, अगदी अगदी ! :)
कसला टवटवीत हिरवाकच्च रंग आहे. वाह.. असा नजारा समोर असेल तर कसला बॉस आणि कसलं काय. गेली दुनिया तेल लावत...
हेहे! सौरभ बुवा, मी केलीय बोंबाबोंब...सगळ्यांना धारेवर धरलं मस्त! :)
हेरंब + १. ऑफिसोऑफिसी मातीच्याच चुली .
ऑफिसोऑफिसी मातीच्याच चुली! अगदी अगदी गं गौरी !! :D
कधी तरी प्रश्न पडतो - माणसाने प्रगती करून काय साधले... स्वतःचे भविष्य सुधारले? नाही; आजू-बाजूचा निसर्ग सुधारला? नाही; मन:शांती मिळवली? नाही. स्वतःच विणलेल्या जाळ्यात गुरफटून गेलाय माणूस
हेरंब + १. ऑफिसोऑफिसी मातीच्याच चुली + १
फोटो मस्त आहेत.....
हेरंबसारखंच इष्टुडिओ, आर्टवर्क, फोटोशॉप बदलून डेडलाईन, रिलीज, डिलिव्हरी असे शब्द टाकायचे. काही बळेच काढलेले गरीब जुने फोटो आणि माझी पोस्ट तयार.
कधी एकदा हे आयुष्य बदलवून टाकतो असं झालंय.
खरं आहे श्रीराज भाऊ..... :(
इंद्रधनू, आता बघ मस्त पाऊस लागेल...आणि तो मला फक्त ह्या एसीत बसून खिडकीतून दिसेल ! :(
कसं बदलायचं ते पंकज ?! जाऊ आपण बदलायला, आणि पगार जमा होणे बंद होईल ! म्हणजे मग झालं की ! :(:(
एक दिवस असा येईल की या ठराविक तारखेला येतो त्या ठराविक आकड्याच्या पगाराची गरजच लागणार नाही. आणि तो दिवस आला की पाहिजे कुणाला ही कीबोर्ड खाजवायची, बॉस आला की Alt+TAB करायला लावणारी नोकरी..!!
किती विरोधाभास असतो न आपण ज्या जगात वावरतो त्यात आणि आपल्याला जे जग अभिप्रेत असते त्यात!
हेरंबसारखच अपग्रेड,ब्लू प्रिंट, डेव क्यू प्रॉड हे परवलीचे शब्द त्यात मधेच vaccination , स्लीपलेस नाईट, आजार बोबडे बोल असं टाकल की आमची शेम टु शेम वाली जिंदगी ......यार कंटाळा आला पण म्हणवत नाही कारण त्यातल बरच काही इतर काही वेगळ्या नावानी हव पण असत न....जस करियर, पिलू आणि असंच काही...
पंकज, नक्की असं होईल बघ ! :)
खूप खूप प्रिया.... आणि हा विरोधाभास धूसर होण्याचं काहीही लक्षण नाही !
अगदी अगदी...अपर्णा, आठवतायत नं मला ते दिवस...
पण म्हणजे मी, त्यातून पुढे इथपर्यंत आले...तरी माझं रडगाणं चालूच आहे की ! :( आईशप्पत ! :)
’डोकं नका चालवू.. घर चालवा!’
एकदम एकदम चपखल. म्हणजे अगदी इसिपे हाथ मिलाओ... चीअर्स इत्यादी एवढं अगदी अगदी!
कधी शिकणार मी डोकं न चालवायला... :)
नीरजा ! कधी मिळवूया हात, बोल ? :)
कभी चांद की तरह चमकी, कभी राह में पडी पाई..
अठन्नीसी.. जिंदगी!
:) (प्रयोजन कळलं नाही तर सोडून दे.. मलाही नाही कळलं हे गाणं मला नेमकं तुझी पोस्ट वाचून का आठवलं ते!)
कधीकधी ना विद्याधर, मला स्वत:कडे बघून काय वाटतं माहितेय ?
'रडतराऊत घोड्यावर बसले ! :) :)
भा.पो. एकदम!
तो डॅशबोर्ड्या गणपती आणि वायपरचा पावसाळी फोटो ग्रेटच!!
इसिलिये तो जीते है!!
Post a Comment