त्या घरातल्या चिमुकलीचा, तो पहिला वाढदिवस होता. घर रंगीबेरंगी सजलं होतं. फुगे सगळ्यांच्याच मनाला तरंगवत होते. बाळ नटलं होतं. "अगं, अजून ती यायचीय." "हा आला का?" "चला जमले सगळे?" बाळाचे काकामामा, मावश्या आत्या, दादा ताई सगळे आवर्जून हजर होते. एक मेणबत्ती डोक्यावर घेऊन केकही आला. बाळाचा चिमुकला हात हातात घेऊन आईने केक कापला.
आणि नंतर एक म्हटली तर साधीशी आणि म्हटली तर महत्वाची घटना आकार घेऊ लागली.
नातेवाईक एकेक करून आपापल्या भेटवस्तू घेऊन पुढे सरसावू लागले. बहुतेक सगळ्याच भेटी बाळाच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. बाजूला आई उभी होती. तिच्या बाजूला ढीग उभा आडवा पसरू लागला. मी कालच सोन्याची चिमुकली बुगडी घेतली होती. बजेट मध्ये बसतील अशी. माझ्या नंतर त्या घरची धाकटी सून पुढे आली. तिच्या हातात होतं एक दीड फुट उंचीचं मऊ मऊ गुलाबी अस्वल.
"अरे वा! किती गोड आहे! कुठे मिळाला हा तुला?" मी विचारलं.
"अगं नाही! मी बनवला!"
"बनवलास? इतका सुंदर? अगदी विकत आणल्यासारखा वाटतोय हा तर!"
ह्यावर आलं एक मंद स्मित.
भेटवस्तू देण्याचा पहिला भाग आटपला. भेटवस्तू उघडण्याचा दुसरा भाग सुरु झाला. रंगीबेरंगी कागद टराटरा फाटू लागले. आनंद व आश्चर्यमिश्रीत आवाज खोलीमध्ये ऐकू येऊ लागले. माझीही भेट उघडली गेली आणि मग घरातील जेष्ठ बाई आल्यागेल्याला अतिशय कौतुकाने बुगडी दाखवू लागल्या. धाकटी सून खोलीतच इथेतिथे वावरत होती. दूर कोपऱ्यात अस्वल पडलं होतं. सुनेचा चेहेरा हिरमुसत चालला होता.
"मां, मी दिलेल्या वस्तूसारख्या, सोन्याच्या हजार वस्तू बाजारात मिळतात." मी बाईंना म्हटलं.
"तर?"
"तर काही नाही. मी अजून थोडे पैसे घातले असते तर एखादा अजून मोठा दागिना आला असता."
बाईंना हे असंतसं नव्हतंच कळणार.
"सीमाने ते अस्वल रात्ररात्र जागून खूप प्रेमाने बनवलंय. आणि दुकानात जी अशी मऊ खेळणी विकत मिळतात, तितकच हे सुंदरही झालंय." वयाचा मान राखून हे एव्हढंच बोलणं शक्य होतं.
सीमा सासूबाईंसमोर कावरीबावरी झाली.
श्रमदान तोलता येते?
सोन्याची कर्णफुले की एखादं स्वहस्ते तयार केलेलं, मऊ गुबगुबीत अस्वल...काय भावते मनाला?
21 comments:
arey wah :) god post aahe and now i got an idea too....tujhya chimuklichya lagnaat na me khoop khoop shramadaan karen...n no gift ;)
मला चालेल ग वंदू! चिमुकलीला विचारून घे पण!! :p
वंदू, श्रमदानाने एखादी भेटवस्तू देखील बनवू शकतेस हा तू!! ;)
तुझ्या सगळ्या पोस्ट वाचल्या की खांडेकरांच्या रुपककथा वाचल्यासारख्या वाटतात..
छोट्याश्या पण खुप काही सांगुन जाणार्या !!
ही पोस्ट सुद्धा छान झाली हे वेगळं सांगु का आता?? :)
हो, सांगायलाच पाहिजे! दीपक, नाहीतर एका बाळाला फक्त छान छान म्हटलंस तर माझ्या दुसऱ्या बाळांना वाईट नाही का वाटणार?! ;)
>>एक मेणबत्ती डोक्यावर घेऊन केकही आला.
हे माझं अख्ख्या कथेतलं सर्वांत आवडतं वाक्य आहे! :)
बाकी दीपकशी सहमत. पण वेगळं सांगण्याच्या तुमच्या क्लॉजशीही सहमत! :D
ओय ! मी तुझ्या सार्याच बाळांना छान छान बोलतो रे !
बोलतोस हा दीपक! माझ्या कुठल्याच बाळाची तक्रार नाहीये तुझ्याबद्दल!! :)
shramdaanani ek poem lihun dein....fukat mein baithe baithe gift n shram n bheja daan....waah wot n idea!!!!
दीपकशी सहमत. खांडेकरांचं सुवर्णकण वाचल्यासारखं वाटतं तुझ्या एकेक पोस्ट्स वाचून.
ऑन अ लायटर नोट :
>> सोन्याची कर्णफुले की मऊ गुबगुबीत अस्वल...काय भावते मनाला?
गिफ्ट देणार्या बाईच्या नवर्याच्या नजरेतून उत्तर द्यायचं तर सोप्पंय.. अस्वल.. कारण ते *स्वस्त* असतं :P लोल
अजिबात नाही हा वंदू! knowing you, पाच मिनिटं बसशील आणि दहा कविता लिहिशील! म्हणजे फक्त पाच मिनिटांचच झालं श्रमदान ! ;)
सुवर्णकण?! :p
हेरंब, व्वा रे व्वा! बिचारी बायको रात्रभर जागून भेटवस्तू तयार करतेय आणि नवरेबुवा पैसे वाचल्याच्या आनंदात आहेत!! Men I tell you! ;)
वाह वाह!! बाजारातल्या वस्तुंपेक्षा स्वतःच्या हातांनी बनवलेली भेट नक्कीच खास असते. आता श्रमदानाचे महत्व कळले ना?? माझ्या वाढदिवसाच्या भेटीसाठी कामाला लागा आता. :P ;)
विद्या +१ >> एक मेणबत्ती डोक्यावर घेऊन केकही आला.
खास वाक्य आहे हे.
बघा हा सौरभ, मी बनवलेलं फक्त भेट कार्ड मिळेल! बाकी मला अजिबात हस्तकला येत नाही! :)
मस्तच.....तुला श्रमदानाला कुणी अजुन हवंय का??? :) मी कुठल्याही हस्तकलेमध्ये एकदम शून्य आहे आणि सोनं पण फ़ार महाग होतंय नं आजकाल....:))
तुझी हि प्रामाणिक गोष्ट मला खूप आवडली :)
(तुझ्या सर्व गोष्टी प्रामाणिकच असतात म्हणा!!!)
अपर्णा, आभार गं! :)
श्रीराज, तुझ्या गोष्टी पण प्रामाणिक असतात ना? :) आभार रे प्रतिक्रियेबद्दल.
काय 'भाव' ते मनाला? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न... :D
ते अस्वल आहे का गं अजून???
रोहन, मला नाही वाटत ते कोणी जपून ठेवलं असेल!
Post a Comment