विमानतळावरचा गोंधळ.
गजबजलेले फुटपाथ.
वाहतुकीची कोंडी.
चार दिशांना उडणारे उड्डाणपूल.
रंग बदलणारे सिग्नल.
उन्हात तळपत्या इमारती.
सगळं सारखंच तर होतं.
ड्रायव्हरला इंग्रजी नाही कळलं. पण पोलिसाने त्याला पत्ता समजावून सांगितला आणि टॅक्सी भरधाव निघाली. खिडकीबाहेरचं बीजिंगमधील दृश्य मोकळ्या जागा सोडल्यास काही विशेष वेगळं नव्हतं.
आमच्या दुर्दैवाने पुढच्या पाच मिनिटात वेगळेपण अंगावर आलं.
आमच्या पायाखालची जमीनच वेगळी होती!
आज ठाणे ते दादर गाडी चालवली.
जगभर सर्वसामान्य नैसर्गिकरीत्या, पाऊस न झाल्याने करपून गेलेल्या जमिनीला भेगा पडतात, तुटून तुकडे पडतात. उपाशीपोटी माणसे मारतात.
आमच्या मुंबईत पावसाने जमिनीला भेगा पडतात. तुटून तुकडे पडतात. आणि मग भरल्यापोटी माणसे मारतात.
कोणाच्या पापाची ही फळं? आम्ही का भरतोय? कोणाला शिक्षा का होत नाही? कोणाच्याच बापाचं का काही जात नाही? केलेल्या छोट्याश्या चुकीमुळे देखील दुसऱ्याला त्रास झालेला आपल्याला सहन होत नाही. मग रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याचा इतक्या हजारो माणसांना त्रास होत असताना, ह्यांना काहीच कसं वाटत नाही? शिव्याशापांचे भय का वाटत नाही? हे नरकात जातील, ह्यांच्या शरीरात किडे पडतील, तळपट होईल ह्यांचे.....ह्या अश्याच आणि ह्याहूनही भयानक शिव्या रोज हजारो नागरिक ह्यांना देतात. मग हे कधी मारतात? ह्यांचे मरण असते तरी कसे? किडे पडतात का ह्यांच्या शरीरात?
आणि हो. एक राहिलंच की! ते गुळगुळीत रस्ते, ते अवकाशात झेप घेऊन हलकेच जमिनीवर टेकणारे उड्डाणपूल आणि मी आंधळी कोशिंबीर सहज खेळू शकेन असे ते फुटपाथ...ह्यांची निर्मिती ज्यांनी केली त्यांच्या चेहेऱ्याची ओळख मात्र नाही झाली! ते कोण हुं चूं की फूं होते कोण जाणे! इथे कसे, प्रत्येक पावलाला ठेचाळणाऱ्या माझ्या नशिबाची जबाबदारी ज्या राजकारण्यांची आहे तो प्रत्येक चेहेरा त्याची किळसवाणी झलक रोज मला रस्त्यारस्त्यात लटकणाऱ्या फडक्यांवरून देत असतो! नाही का?
पुढच्या खड्ड्याची खोली न समजल्यामुळे पाताळात जाऊन वर आले.
"इतकं भयाण मरण येईल ह्यांना कि यमराजाला त्याच्या कल्पकतेचा अभिमान वाटेल!"
Tuesday, 31 August 2010
Monday, 30 August 2010
सखी शेजारिणी...
घरात मुलगी जन्माला आली आणि ती दिसायला सुरेख असेल तर ती वयात यायची खोटी, गावातल्या एखाद्या चित्रकारासमोर तिला बसवण्यात येई. सुंदरसं जलरंगातील ते तिचे व्यक्तिचित्र मग सम्राटापर्यंत पोचवायची व्यवस्था होत असे. मुलींना शिकायची परवानगी त्या काळी चीन मध्ये देखील नव्हतीच. चित्रकला, संगीत, नृत्य ह्या कला अवगत असतील तर सम्राटापुढे तिची वर्णी लागण्याची शक्यता अधिक.
घरात मुलगा जन्माला आला आणि घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असेल तर लहान वयातच त्याला बळजबरी तृतीयपंथी बनवण्यात येई. जेणेकरून त्याची नियुक्ती सम्राटाच्या दरबारी होऊ शके व ते ढासळलेलं घर तो सावरू शके. आणि एकंदरीत घरात जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या दर वर्षी चढतीच असे. दिवसागणिक पडलेली कामे करून हे तृतीयपंथी प्रसादातच मोठे होत असत. त्यांच्या रोजच्या कामांच्या यादीतील सर्वात महत्वाचे काम असे, गावाहून आलेली सुंदर षोडशांची चार ते पाच चित्रे, रोज सूर्यास्तानंतर वयस्कर सम्राटापुढे मोठ्या अदबीने साजरी करणे." राजा, आजची ही तरुण रात्र तुला कोणाबरोबर व्यतीत करायला आवडेल?"
जवळपास ३००० बायका असलेला उदार सम्राट, त्यातल्या एखाद्या चित्रावर बोट टेके. ह्या सम्राटांना आपल्या जीवाची फार भीती. त्या नशीबवान रूपवान मुलीला वस्त्रहीन अवस्थेत समोर उभे केले जाई. पुढचे चार तास सम्राटांना आपल्या ह्या एका रात्रीच्या पत्नीबरोबर मिळत असत. बाहेर त्या मुलाचा पहारा असे. बरोब्बर चार तासांनी पडदा बाजूला सारून तो समोर उभा राही. सम्राटांना विचारले जाई," राजा, पत्नीबरोबरची ही रात्र तुझी कशी गेली?"
उत्तर जर नकारार्थी असेल तर त्वरित त्या मुलीला तेथील राजदरबारी असलेल्या 'अक्यूपंक्चर' तज्ञासमोर तश्याच अवस्थेत उभे केले जाई. दुर्दैवाने तिची जर गर्भधारणा झाल्याची कुशंका आलीच तर त्या शक्यतेची तो तरबेज तज्ञ पुरेपूर विल्हेवाट लावत असे.
आणि जर उत्तर होकारार्थी असेल तर? आहे ना...ह्या असंख्य सत्यकथांना तीही वळणे आहेतच... जर गर्भधारणा झाली व तिने राजाच्या पहिल्या पुत्राला जन्म दिला तर मात्र ती सम्राज्ञी आणि तिचा पुत्र पुढील सम्राट! अर्थात पुढील ह्या 'एक रात्री'च्या अनेक आवडत्या बायकांना झालेले पुत्र आणि ह्या पहिल्या पुत्रामधील वैरभावना कुठले टोक गाठेल आणि त्यातून कोण टिकाव धरून चीनचा सम्राट होईल हे अखेर त्या नियतीच्या हाती!
बीजिंगमधील जनतेला कित्येक शतके सूतभर देखील न बघायला मिळालेल्या 'फॉरबिडन सिटी' मधील सर्वच सम्राटांचे हे अत्याचार आणि ते करण्यासाठी त्यांनीच लढवलेल्या ह्या नवनवीन कल्पना!
दुसऱ्या दिवशीची आमची वाटाडी 'Apple' हिने सांगितलेली ही शोकगाथा.
चिनी चहा
मी बघितलंय जी लोकं चहा पितात त्यांना ज्या चवीचा चहा ते पीत आले आहेत त्या चवीव्यतिरिक्त कुठल्याही चवीचा चहा चालत नाही. आईच्या हातचा, बहिणीच्या हातचा, मावशीच्या हातचा, बायकोच्या हातचा, नवऱ्याच्या हातचा, कुठल्या भय्याच्या हातचा, टपरीवरचा कटिंग चहा, कॉलेजच्या कँटिंनचा चहा... प्रत्येकाची वेगवेगळ्या तऱ्ह्येची स्वतंत्र यादी असते. आणि मग समजा दुसऱ्या कुणी धैर्य एकवटून त्यांच्यासाठी चहा बनवलाच तर तो कसा बेचव झालाय हे, ही लोकं कुठलाही आडपडदा न ठेवता अगदी खुल्या दिलाने सांगून टाकतात. पुढील सर्व विधाने ह्याचीच ग्वाही देतात! "तू चहा जास्त उकळलास." " तू कमी उकळलास." "तू साखर कमी घातलीस." "तू साखर जास्त घातलीस." " दुध कमी घातलंस" " दुध जास्त घातलंस." " दुध म्हशीचं आहे का? मला गाईचं आवडतं!" "दुध शीळं आहे वाटतं?" "शी! साय पडलीय!" "साय का काढून टाकली? छान लागते चहात साय!"
चिनी चहाचा आस्वाद घेताना मला ह्या चहाधर्मीय लोकांची तीव्रतेने आठवण आली.
गुबगुबीत 'ली' आम्हाला पाच प्रकारच्या चिनी चहाची ओळख मोठ्या अभिमानाने करून देत होती. चिनी इंग्रजीत. "चहा. मॅडम, चहा हा आमचा धर्म आहे. चहा ही आमची संस्कृती आहे. चहा हा आमचा इतिहास आहे. आणि चहा ही आमची करमणूक आहे." शाळेतील सर्व पुस्तकांच्या सुरुवातीला एक प्रतिज्ञा असे. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' मला ही प्रतिज्ञा ज्या तालात आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणायचो त्याची आठवण झाली.
पाण्याच्या तापमानाची परीक्षा करणारे एक छोटं प्लास्टिकचं बाळ तिने सर्वप्रथम पुढ्यात घेतलं. ह्या बंड्याचे नाव 'पी-पी-बॉय'. किटलीतील पाणी त्या बाळाच्या डोक्यावर ओतलं आणि काय सांगावं! त्या बाळाने 'शू' केली! म्हणजे म्हणे पाणी उत्तम गरम झालेलं होतं! पहिली चव आम्ही घेतली ती त्यांच्या लाडक्या चहाची. 'जास्मिन' चहा'ची. छोट्याश्या नाजूक कपातून तिने तो आम्हांला चाखवला. दुधविरहित. मी चहा पीत नाही. मला चहा आवडत नाही. पण हे पेय मात्र झकास होतं! त्याला मोगऱ्याचा नाजूक वास होता. म्हणे मोगरा आणि चहा ते एकत्र वाढवतात. मस्त! (चहाधर्मियांची मुरडलेली नाकं मला दिसतायत! ) मग आला 'ड्रॅगन चहा'. (ह्यांच्या सगळ्याच प्रकारात कुठून ना कुठून तो ड्रॅगन यायलाच लागतो!) तुम्ही जेवणाच्या आधी ह्या ड्रॅगनचा आस्वाद घेतलात तर तो तुमची भूक वाढवतो आणि जेवणानंतर प्यायलात तर तो तुमची पचनशक्ती वाढवतो! कप छोटे छोटे होते म्हणून ठीक होतं. अगदी कटिंगच्याही एक चतुर्थांश! थाटात चव घेऊन आवड आणि नावड लगेच 'ली'च्या कानावर घालता येत होती. 'फ्रुट चहा'. हे फळांचे आणि गुलाबकळीचे मिश्रण तुम्ही एकदा वापरलंत की पुढचे पाच दिवस परत परत वापरू शकता. किंवा गुलाब सोडून उरलेल्या सुक्या फळांचा स्वाद (चहा पिऊन झाल्यावर) तुम्ही मनमुराद घेऊ शकता. त्यात एक थोडं आंबट असं देखील एक मस्त सुकं फळ होतं! नंतर आला 'वूलॉंग चहा'. जायफळासारख्या दिसणाऱ्या चविष्ट फळयुक्त चहा.
गोरीपान 'ली' गोड हसत गप्पा मारतमारत, माहिती देतदेत आम्हा दोघींसमोर वेगवेगळे चहा, पेश करत होती. आणि आम्ही दोघी अगदी राजेशाही थाटात 'कधी ख़ुशी कधी गम' दर्शवत होतो. त्या अंधारलेल्या खोलीत खरं तर सर्वात सुंदर गोष्ट काय असेल तर चहाचे वेगवेगळ्या रंगाचे डबे आणि बाटल्या. आणि त्यावरचे त्यांचे अतिशय सुंदर डिझाइनचे गुंडाळलेले कागद!
निघालो तेंव्हा 'एक शू-शू-बाळ, एक महागडा नाजूक टी सेट, फ्रुट चहाचे दोन मोठ्ठे डबे, पाच सुंदर छोटे छोटे लाकडाचे रिकामे डबे (त्यांत घालून तो फ्रुट चहा मला बहिणींना, मित्रमैत्रिणींना प्रेमाने भेट द्यायचाय. त्यांनी कितीही माझ्या चहाला नावं ठेवली तरी देखील ह्या माझ्या चहाला ते नावं ठेवूच शकणार नाहीत ही एक गोष्ट! आणि दुसरं म्हणजे माझ्या चहाला हे सगळे नावं ठेवतात तरी देखील माझं त्यांच्यावर असलेलं अबाधित प्रेम त्यांना चहाद्वारेच दाखवून देण्याची अशी सुवर्णसंधी मला परत कधी मिळणार! )
गोडबो'ली' खुश झाली आणि माझ्या क्रेडीट कार्डाने मला बसलेला 'परदेशीय चलनामधील आर्थिक फटका' मोठ्या तत्परतेने एसएमएस द्वारा दाखवून दिला!
Sunday, 29 August 2010
Great Wall of China!
भिंतीपर्यंत पोचायला आमच्या गाडीला तास दीड तास लागणार होता. आम्ही बरोबर इंग्लिश बोलता येणारी चिनी तरुणी गाईड म्हणून घेतली होती. नाव केट. इथे सर्वजण दोनदा बारसं करतात. एकदा चिनी नाव कानात सांगतात आणि थोडं मोठं झाल्यावर एक इंग्लिश नाव ठेवून घेतात. चिनी ललना खूपच तरतरीत आणि हुशार वाटतात. पुरुषवर्ग मात्र स्त्रीवर्गापुढे एव्हढी काही छाप पाडू नाही शकला. रंग गोरा, खांद्याखाली येणारे सरळसोट केस, ताठ शरीरयष्टी, छोटे छोटे माश्यांसारखे डोळे आणि तुरुतुरु चाल. कान टवकारून, अगदी एकाग्रचित्ताने ऐकलं की केट काय सांगू पहातेय ते कळण्याइतपत केटचे परक्या भाषेवर प्रभुत्व. रस्ता कापत असता गूढ भिंतीबद्दल थोडीफार माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न.
"बाहेरून होणाऱ्या मंगोलियन आक्रमणांना रोखण्यासाठी ही भिंत बांधायला सुरुवात झाली. पाचव्या शतकाच्यादेखील आधीपासून. नंतर पुढील कालावधीत वेगवेगळ्या सम्राटांनी आपापल्या कालावधीत ती वाढवत नेली. प्रत्येकाने आपापल्या गरजेनुसार आणि आपापले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ती कधी तोडली, तिचा रस्ता बदलला आणि पुढे नेली. पूर्वेला ती उगवते आणि पश्चिमेला जाऊन मावळते."
केटच्या माहितीप्रमाणे ही जगातील सर्वात मोठी मर्त्यभूमी आहे. ८,८५१.८ किलोमीटर लांबीची मर्त्यभूमी. अंदाजे एक लक्ष मनुष्यहानी ह्या जगातील पहिल्या आश्चर्याच्या निर्मितीत झाली.
वेदनेने पिळवटलेल्या, रक्तात लडबडलेल्या अनेक सत्यकथांमधील ही एक.
दुरदुरच्या छोट्या छोट्या गावांतून ही ग्रेट वॉल बांधण्यासाठी पुरुषांना जबरदस्ती उचललं गेलं. म्हातारेकोतारे, तरुण, धष्टपुष्ट....गावागावांतील प्रत्येक पुरुषाला ह्या बांधकामावर नेमलं गेलं. दयामाया शून्य. सम्राटांसाठी ही भिंत म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न.
एका छोट्या गावात, आपल्या तरुण पत्नीबरोबर आनंदात आपले आयुष्य घालवणाऱ्या अश्याच एका तरुणाला सैनिकांनी पत्नीपासून खेचून दूर केलं. खडतर कामाला जुंपलं. वर्षे ओलांडली. तो घरी परतला नाही. चिनी 'सावित्री' पतीच्या शोधात गाव सोडून निघाली. उन्हातान्हात फिरत मजल दरमजल करत ती भिंतीपाशी पोचली. तिच्या त्या अविरत कष्टांचे तिला उत्तर मिळाले. तो तरुण युवक ते कष्टप्रद आयुष्य फार झेलू शकला नव्हता. तिला त्याच्या प्रेतापुढे उभं करण्यात आलं. त्याच्या शरीराशी तिची ओळख थोडीच होती. घरातून निघालेला तिचा धष्टपुष्ट पती आता काहीच शिल्लक उरलेला नव्हता. त्याच्या गालावरून तिने हात फिरवला. स्पर्शाची ओळख पटली. तिथून ती निघाली. भरकटली. नियतीने दिलेला हा धक्का तिच्या सहनशक्ती बाहेरचा होता. दिवसेंदिवस महिनोंमहिने ती फक्त चालत राहिली. एका कड्याच्या तोंडाशी पोचली तेंव्हा समोर अथांग समुद्र होता. तिने चालणे थांबवले नाही. डोक्यावरचे छप्पर कधीच उडाले होते. आता फक्त पायाखालची जमीन संपली.
आता चिनी सरकार तिच्या नावाचं स्मारक उभारणार आहे म्हणे.
कधी मला कोणी म्हटलेले आठवते..'महाराष्ट्रातले किल्ले ही काही कलेची दालने नव्हेत. नजर टाकावी तिथे फक्त दगड आणि धोंडे. तेच जर राजस्थान गेलो तर तिथे कलाकुसर, चित्रकला दिसते. मुघलांनी तर अचंबे उभारले.'
पायथ्याशी उभं राहून वर भिंतीकडे नजर टाकली. मला बुटके, घामाने निथळलेले अथांग पसरलेले चिनी मजूर दिसू लागले. आणि त्यांना चाबकाने फटकारणारे त्यांचे थुलथुलीत वरिष्ठ अधिकारी. उंच उंच क्रूर पहाड आणि जड वजनाचे प्रचंड दगड. पाठीवर, डोक्यावर की हृदयावर त्यांनी घेतले?
'राजांनी संरक्षणासाठी किल्ले बांधले, ऐषोआरामासाठी नाही. कधी दुष्ट कथा नाही जन्माला घातल्या. आम्ही सुराज्य आणि स्वराज्य उभे केले.' हे ताठ मानेने दिलेलं तेव्हाचं माझं उत्तर त्या चिनी भिंतीच्या पायथ्याशी पुन्हा आठवलं.
ते जगातले आश्चर्य चढायला माझी लेक तयार नाही झाली. तिने माझी वाट बघत पायथ्याशी बसणं पत्करलं.

Saturday, 28 August 2010
बीजिंग- दिवस पहिला
प्रवासावरून परतल्यावर मागे वळून बघितलं की केलेल्या प्रवासातील आनंदाचा उत्तुंग क्षण काय होता ह्याचा विचार माझ्या मनात नेहेमीच येतो. जमिनीकडे वेगाने झेपावणारा, नजरेत न मावणारा पांढराशुभ्र नायगारा धबधबा, ग्रँड कॅननचं अफाट पसरलेलं लालबुंद रूप, बालीमधील बतूर ज्वालामुखीच्या शिखरावरून दिसणारे झाडांचे जळके काळे उभे सापळे आणि त्यातूनही नव्याने पसरलेला हिरवागार रंग, इजिप्तमधील रखरखीत वाळवंटातील ती आकाशात घुसलेली पिवळी टोकं, सायप्रसमधील चारशे वर्षांचा इतिहास सांगणारी त्या घरची सून आणि बँकॉकमधील हातावर डोके रेलून विसावलेला बुद्ध. हे सगळेच कधी विलोभनीय तर बऱ्याचदा पृथ्वीवरील मनुष्याच्या क्षुद्र अस्तित्वाची जाणीव करून देणारे क्षण.
आता बॅगा रिकाम्या झाल्या. पुन्हा वर कपाटांवर जाऊन बसल्या. खाष्ट सासूला शोभेल अश्या आवेशात टाकलेल्या मळक्या कपड्यांच्या ढिगाऱ्याचा वॉशिंग मशीनने फडशा पाडला. आणि मग कालच संपवलेल्या चीन प्रवासाकडे नजर टाकली. ती लांबचलांब भिंत अजगरासारखी परत एकदा माझ्या डोळ्यांसमोर सरपटली.
त्या भिंतीला शेवट काही नाही. चढत जावं आणि वाटलं कि खाली उतरावं. शिखर पार केलं किंवा एखादा किल्ला सर केला अशी मावळी विजयी भावना मिळण्याची इथे सुतरामही शक्यता नाही. भिंत पूर्वेला सुरु होते आणि पश्चिमेला कुठेतरी समुद्राला जाऊन भिडते. पाण्याची छोटी बाटली, गळ्यात अडकवलेला कॅमेरा आणि डोक्यावर टोपी एव्हढी सामुग्री पुरेशी.
अशी एखादी सामुदायिक मोहीम हातात घेतली कि काहीतरी वीरश्री अंगात शिरते. देशोदेशीचे सहस्त्र सहप्रवासी आणि दिशा एकच. कोणी चिनी, कोणी जपानी, कोणी ब्रिटीश तर कोणी इटालियन. वेगवेगळे रंगरूप, वेगवेगळी भाषा. एखादं वृद्ध जोडपं एकमेकांना आधार देत तर कोणी प्रेमी युगुल एकमेकांना बिलगून. वरून माथ्यावर आपटणाऱ्या उन्हाची तमा न बाळगता, कोणी चिनी झाशीची राणी आपल्या लालबुंद गोबऱ्या गालांच्या नारायणाला पाठीशी बांधून ह्या प्रवासाला निघालेली. तर तिघी इटालियन मैत्रिणींना एकत्र भिंत सर करायची होती. हे सगळं बघतबघत चढत असताना थकण्याचा तर प्रश्न नव्हताच.
"मी आता उभा आहे ग्रेट वॉलच्या पायऱ्यांवर."
वळून मागे बघितलं तर त्या शब्दांचा उगम एका पाठीतून होता. ती पाठ कोणाची आहे ह्याचा शोध घेण्यासाठी तीनचार पायऱ्या खाली उतरले.
"अहो, तुम्ही आत्ता मराठीत बोललात का?" साहेब भिंतीची दुसरी बाजू न्याहाळत होते.
वळले. दिसायला पक्के मराठी. नाकावर चष्मा. वय अंदाजे पस्तीस.
"हो. मी मराठीच आहे"
"पण तुम्ही एकटेच का बोलताय?" ह्याला चोंबडेपणा नाही म्हणावे तर काय म्हणावे?
साहेबांनी खाली सोडलेला उजवा हात वर घेऊन मला हँडीकॅम दाखवला.
"अहो, मुलं नाहीयेत हे बघायला. त्यांच्यासाठी म्हणून शूट करून नेतोय!"
"अरे व्वा! हे छानच की! काय आडनाव तुमचं?" मी पाठ सोडली नाही.
"मी परांजपे. ठाण्याचा. आमच्या कंपनीची शांघायला काँन्फरस होती. त्यासाठी चीनला आलोच होतो म्हणून म्हटलं ही भिंत बघून जावं." अधिक प्रश्न येण्याच्या भीतीने मला वाटतं साहेबांनी संभावित सर्व प्रश्नाची उत्तरे एका दमात देऊन टाकली.
"अच्छा. एव्हढी दमवणूक होईल असं वाटत तरी नाहीये नाही का? किती वर चढायचा विचार आहे?" ह्यांची उत्तरे तरी देखील मला नव्हतीच मिळाली!
"नाही हो. माझं वीस किलोंचं तर पोटच आहे. तेव्हढं वजन घेऊन जेवढं जमेल तेव्हढं चढेन म्हणतो." आता ह्यावर 'खरं आहे' असं म्हणायची खरं तर काहीच गरज नव्हती. नाही का?
"खरं आहे. चला मी लागते पुढच्या रस्त्याला"
"हो.हो. निघा तुम्ही."
"मुलांनो, आत्ताशी तर पहिलाच टप्पा आपण पार केलाय. अजून बरंच चढायचंय बरं का!"
माझा मराठी सहप्रवासी पुन्हा हँडीकॅममध्ये तोंड घालून बोलू लागला.
आणि मी वळून दूरदूर दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या भिंतीवरून सरपटू लागले.
हू का चू
'हूँ का चूँ,
चूँ का हूँ,
हे दोघे सख्खे भाऊ.
चें का फूँ,
फूँ का चें,
हे दोघे त्यांचे भाचे.
चार चिनी केंव्हा तरी जेवून गेले माझ्या घरी.
चार पराती वाढला भात,
एक एक काडी दोन हात.
नंतर त्यांनी ढेकर दिली,
ती चीनला ऐकू गेली.
तेव्हा पासून काय झाले,
नाही झुरळ घरात आले.'
विंदा करंदीकरांनी ही चिनी माणसाची ओळख करून देऊन बालपणीच धोक्याची जाणीव करून दिली होती. परंतु कधी चिन्यांशी गाठभेट होईल असे नव्हते वाटले!
आठवडाभर हे 'हूँ का चूँ' करून 'वढाय वढाय' मन घेऊन पहाटे पहाटे मायभूमीला स्पर्श केला आहे.
आता चपातीभाजी, वरणभात तूप लिंबू खाऊन 'हू का चू' करायची ताकद संध्याकाळपर्यंत मिळेल अशी आशा आहे!
:)

Friday, 20 August 2010
चला मंडळी...
तयार होऊन बसलेय. घड्याळ पुढे सरकण्याची वाट बघत. travel light ...हे तत्व आता इतक्या प्रवासानंतर अंगात मुरलंय. एक मोठी बॅग आणि एक छोटी पर्स. इतुकेच माझे ओझे! शेवटच्या क्षणापर्यंत मान मोडून काम करवून नाही घेतलं तर मग कसली ही advertising agency! 'Deadlines ' पाळणे जास्ती महत्वाचे!
जाऊ दे. घरी पोचले...काय ते सामान भरलं आणि एव्हढं करून देखील अजून १५/२० मिनिटे आहेतच निघायला.
कालपर्यंत मला का कोणास ठाऊक वाटत होतं की मला शनिवारी रात्री विमानतळावर जायचंय! त्यामुळे आज संध्याकाळी करेन त्या हिशेबाने काही कामे ठेऊन दिली होती. पण लेक मला चांगली ओळखते. त्यामुळे सकाळीच फोन करून तिने चौकशी केली," काय ग, आई? कधी जाणार आहेस विमानतळावर?"
जरा माझ्या मनात मग शंकेची पाल चुकाचुकालीच. " का ग?"
" नाही, सांग न? कधी जाणार आहेस?"
"अगं, मला शनिवारी जायचंय ना?"
"आआआआईईईई! इथे ये! धपाटा घालते आता मी तुझ्या पाठीत!"
"अगं, गंमत केली! मला माहितेय. शनिवारची पहाटेची आहे ना माझी फ्लाईट?"
"ये तू! बघते तुला! हाँगकाँगला एकटीच सोडणार होतीस वाटतं मला?"
चांगलीच ओळखते माझी लेक मला!
चला मंडळी!
येते!

इन, मीन, चीन
एका आठवडाभरच्या प्रवासाला निघणार आहे मी आज रात्री. हिंदी चिनी भाई भाई मनात धरत. लेक आधीच पोचलीय. आणि तिने हुकूम दिलाय इंग्लिश- चायनिझ शब्दकोश घेऊन येण्याचा. आता पुढचा आठवडा 'चिनीमकाव' डोळे सगळीकडे दिसणार आहेत आणि सकाळ संध्याकाळ फ्राइड राइस आणि नुडल्स खाणार आहोत. आणि मग एकदोन दिवसांतच माझी लेक प्रत्येक मिनिटाला सिटिलाईटच्या मासळी बाजाराची आठवण काढेल! बघू, वेगवेगळ्या चवी नेहेमी मोठ्या आवडीने घेणारी माझी लेक आता किती साप आणि झुरळं खाते! :)
आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, जेंव्हा जमेल तेंव्हा तुमच्याशी गप्पा मारेनच. मराठीतच मारेन, चिनी भाषेत नाही!

Thursday, 19 August 2010
मुंगारु मळिये...कन्नड गाणे
गौरीने मला दिलेल्या कवितांच्या 'खो' चे हे उत्तर! :)
अतिशय मधुर अर्थपूर्ण कन्नड गाणं आहे. सोनू निगमने गायलेलं. मला खूप आवडलं. माझी मैत्रीण वंदना, हिने मला ऐकवल्यावर मी त्या अर्थाने आणि गाण्याच्या नादाने गुंगून गेले. मला आशा आहे, तुम्हांला देखील तोच आनंद मिळेल. कन्नड कवितेखाली मराठी भाषांतर आहे. (माझा एक प्रयत्न!) सर्वात शेवटी युट्युबची लिंक दिलेली आहे. गाणे बघावेसे आणि ऐकावेसे वाटले तर... :)
English-
Mungaru Maleye...
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)
1. Ninna Mugila Saale, Dhareya Korala Premada Maale
(The line you’ve made in the sky, is like the necklace of love to this earth)
Suriva Olumeya Jadimalege, Preeti Moodide
(With the flowing feeling of non-stop rain, Love has bloomed)
Yaava Chippinalli, Yaava Haniyu Muttaguvudo
(In which clamshell, you never know which drop will turn into a pearl)
Olavu Yelli Kudiyodiyuvudo, Tiliyadagide
(Where the bud of love can blossom, has gone beyond my comprehension)
Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)
2. Bhuvi Kenne Tumba, Mugilu Surida Muttina Gurutu
(The cheeks of earth are filled with marks of pearl-like raindrops the sky showered)
Nanna Yedeya Tumba, Avalu Banda Hejjeya Gurutu
(My heart is full of, the footsteps of her arrival)
Hejje Gejjeyaa Savi Saddu, Premanadavoo
(The sweet sound of her anklets, the tune of love)
Yede Mugilinalli, Rangu challi Nintalu Avalu
(In the sky of my heart, she sprinkled color and just stood there)
Baredu Hesara Kamanabillu, Yenu Modeyoo
(Her name written like a rainbow, ah what a spell)
Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)
3. Yava Hanigalinda, Yava Nelavu Hasiraguvudo
(Of which raindrops, which land may turn green)
Yaara Sparshadindaa, Yara Manavu Hasiyaguvudo..
(Of whose touch, whose soul be readied for seeds of love to be sown)
Yara Usirali Yara Hesaru Yaru Baredaro
(In whose breath, whose name is written by whom)
Yava Preeti Huvu, Yara Hrudayadallararluvudo
(Which flower of love, would blossom in whose heart)
Yaara Prema Poojege Mudipo, Yaru Balloro
(Whose love is worthy of worship, who can fathom?)
Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)
4. Olava Chandamama Naguta Banda Manadangalake
(The lovely moon came smiling to my mind’s front porch)
Preeti Belakinalli, Hrudaya Horatide Meravanige
(Lit by the light of love, my heart started off on a procession)
Avala Premadaoorina Kadege, Preeti Payanavoo
(Towards her city of love, the journey of love)
Pranayadoorinalli, Kaledu Hogo Sukhava Indu
(In this fever city of love, for now, go away happiness)
Dhanyanaade Padedukondu Hosa Janmavoo
(I’m grateful to have gotten this new birth)
Mungaru Maleye..
(Oh the first Monsoon Rain..)
Yenu ninna Hanigala Leele
(What the magic have your drops done?)
मराठी-
अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!
ती रेघ तू ओढली आभाळात,
हार तो धरणीच्या गळा.
ह्या अथक झरत्या पावसाने,
फुटे कोंब प्रितीला.
कुठल्या शिंपल्यात
थेंब होईल मोती?
कुठे प्रितीला धुमारे फुटती,
ना चाले माझी मती.
अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!
आकाशाने बरसली मोतीमाला,
धरणीचे गाली त्याच्या खुणा.
मज हृदय भरून गेले,
नाद तो तिचा पावलांचा.
छुमछुम तिचे पैंजण,
प्रीतीची ही धून.
माझ्या हृदय आकाशी,
स्तब्ध तिने शिंपडले रंग
तिचे नाव त्या आकाशी,
जसे हे इंद्रधनुष्य.
अरे, ही काय जादू?
अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!
कुठला थेंब,
करेल हिरवी धरती,
कुठला तो थेंब,
स्पर्शूनी पेरेल प्रिती.
कुठल्या श्वासात,
लिहिले कोणते नाव,
कुठले फूल,
फुलेल कोणत्या हृदयी?
कोणते प्रेम पूजावे हे,
कोण करे हे मोजमाप?
अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!
चंद्र तो हसे,
माझ्या हृदय अंगणी,
प्रितीने उजळे हृदय माझे,
चालू लागे ते दूर प्रवासा,
त्या प्रितीच्या गावा,
हा प्रवास माझा प्रितीचा.
ज्वरभारीत प्रेमगावी.
जा दूर जा आता तू सुखा,
हे तर भाग्य माझे,
मिळे मला हा जन्म नवा.
अरे पहिल्या पावसा,
काय ही तुझ्या थेंबांची जादू!
माझा खो भानस ला! :)
http://www.youtube.com/watch?v=pGQVSPYX6IE

Wednesday, 18 August 2010
विश्वास
मे महिन्याची उन्हाळी सुट्टी. दुपारच्या भर उन्हात खाली खेळायला परवानगी नाही. इमारतीच्या जिन्यावर वरच्या पायरीवर दोघी खेळत होत्या. वय वर्ष धाकटीचं चार तर मोठीचं दहा. चिंचोळ्या जागेत पकडापकडी! धाकटीचा तोल गेला. छोटासा जीव सहा सात पायऱ्या गडगडला. मोठीचा जीव घाबराघुबरा झाला. छोटीला इथे तिथे खरचटलं. डोक्याला एक टेंगुळ आलं. टपोरे डोळे डबडबले. मोठीने तिला हात धरून घरात आणलं.
सुधा करमरकरांच्या बालनाट्यात चेटकीण म्हणून शोभाव्यात अश्या एक बाई ह्या दोघींना सांभाळायला घरी ठेवलेल्या. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. कुरळे कुरळे कायम विस्कटलेले केस. पिवळे पुढे आलेले दात आणि मळकट साडीच्या पदराचा बोळा कमरेला खोचलेला. त्यांनी छोटीचा हात खेचून समोर उभं केलं. तोपर्यंत टेंगुळ बरंच उभारलेलं. मोठी मागे उभीच होती. "काय ग? काय झालं हिला? एव्हढं कसं लागलं?" पिवळ्या दातांतून प्रश्र्न फिस्कटला.
"जिन्यांवरून पडली ती!" घशात अडकलेल्या हुंदक्यातून उत्तर कसबसं बाहेर पडलं.
"पडली? अशी कशी पडली? तूच ढकलून दिलंस न तिला?"
ह्या अनपेक्षित हल्ल्याने मोठी हबकली. हे असं काही आपण करू शकतो ही मारेकऱ्याची भावना तिच्या मनाला स्पर्श न केलेली होती. बाईं मात्र झोपड्यांच्या दुनियेतील 'हाणामारी' गणितांत अतिशय तरबेज होत्या.
छोटीच्या रडणाऱ्या सुरात मोठीने सूर मिळवला.
संध्याकाळी आईबाबांच्या कानावर बाईंनी तावातावाने मोठीची तक्रार घातली.
आईने खाली मान घालून उभ्या असलेल्या मोठीकडे नजर टाकली. बाबांनी पाचसहा दिवसांत चेटकीणबाईंना बाहेरचा रस्ता दाखवला.

Tuesday, 17 August 2010
रुबिक क्यूब
डोकं एक रुबिक क्यूब...
सहा बाजू...सहा रंग.
गरगर....खटखट...
गरगर....खटखट...
एकेक रंग...आणावे एकत्र
करावे प्रयत्न...
चुकत... माकत...
वर्षानुवर्ष.
कधीतरी जमलं तर...
येईल तो ठिकाणावर...
पण मग...
एकसारखे ते रंग.
निळा तर निळाच.
पिवळा तर पिवळाच.
गरकन फिरवावा तर फक्त हिरवा.
गरगर....खटखट...
अडखळत...
ह्या कसरतीत...
कधीतरी...
एक चौकट निखळते...
एक रंग तुटतो...
एक संदर्भ तुटतो...
मग हा ठोकळा...
हळूहळू रिकामा.
एका मागोमाग...
सगळेच रंग विखुरलेला...
सगळेच संदर्भ तुटलेला...
स्मृतीभ्रंश झालेल्या माणसासारखा...
सहा बाजू...सहा रंग.
गरगर....खटखट...
गरगर....खटखट...
एकेक रंग...आणावे एकत्र
करावे प्रयत्न...
चुकत... माकत...
वर्षानुवर्ष.
कधीतरी जमलं तर...
येईल तो ठिकाणावर...
पण मग...
एकसारखे ते रंग.
निळा तर निळाच.
पिवळा तर पिवळाच.
गरकन फिरवावा तर फक्त हिरवा.
गरगर....खटखट...
अडखळत...
ह्या कसरतीत...
कधीतरी...
एक चौकट निखळते...
एक रंग तुटतो...
एक संदर्भ तुटतो...
मग हा ठोकळा...
हळूहळू रिकामा.
एका मागोमाग...
सगळेच रंग विखुरलेला...
सगळेच संदर्भ तुटलेला...
स्मृतीभ्रंश झालेल्या माणसासारखा...
Monday, 16 August 2010
देशभक्ती
काल कुठल्याश्या रेडिओ स्टेशनवर एक प्रश्र्न टाकण्यात आला होता.
तुमच्यासाठी देशभक्ती काय आहे?
अपूर्णावस्थेतील हे माझे त्यावरचे विचार....
मी, माझे काम लवकर व्हावे ह्यासाठी एक छदाम देखील लाच देणार नाही.
मी, माझ्या कामासाठी कधीही वशिला लावणार नाही.
मी, गाडी चालवत असेन तर कधीही सिग्नल तोडणार नाही.
मी, चुकून नियम मोडला गेलाच तर लवकर सुटका व्हावी ह्यासाठी पोलिसाला लाच देणार नाही.
मी, हातात आहे म्हणून कर्कश भोंगा वाजवणार नाही.
मी, माझे वाहन घेऊन उन्मत्त होऊन झेब्रा क्रोसिंग वर जाऊन उभी रहाणार नाही.
मी, कधी पायी चालत असेन तर मी माझ्यासाठी गाड्या थांबवून रस्ता पार करणार नाही.
मी, हिरवा आणि लाल दिवा माझ्याच भल्यासाठी आहेत हे मी लक्षात घेईन.
मी, रस्त्यात एक कणभरही कचरा करणार नाही.
मी, रस्त्यात थूंकणार नाही.
मी, फेरीवाल्यांकडून खरेदी करणार नाही.
मी, निर्माल्य समुद्रात, नदीत टाकणार नाही.
मी, देवभक्तीच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणार नाही.
मी, माझ्या राष्ट्रगीताला पूर्ण मान देऊन ते चालू असता, सूतभर देखील हलणार नाही.
मी, हे कायम लक्षात ठेवीन की देशभक्ती आणि पृथ्वीभक्ती ह्या हातात हात घेऊन नांदतात.
मी, हे कायम लक्षात ठेवीन की माझा देश ही माझी जबाबदारी आहे, दुसऱ्या कोणाची नाही.
मी, हे कायम लक्षात ठेवीन की माझा देश हे माझे प्रेम आहे, दुसऱ्या कोणाचे नाही.
मी, .......................

Friday, 13 August 2010
बाहुली
पॅरीसवरून ती आली. गोरीपान. सोनेरी केस. वाऱ्याबरोबर भुरभुरणारे. हातपाय लांबसडक. हात सरळ केले तर अगदी अजानुबाहू. प्लास्टिक खोक्यात बसलेली. डोळे मिटून. पापण्या दाट आणि लांब. झगा निळा बिनबाह्यांचा. चमचमणारा. खोका सरळ केला तर काय गंमत! वळलेल्या दाट पापण्या उघडल्या आणि पातळ भुवईला टेकल्या. आत निळाशार टपोरा समुद्र. झग्याचाच रंग त्यात पसरलेला. तिच्या लालचुटुक ओठांवरचं हसू आशीच्या ओठांवर येऊन बसलं. किती ही सुंदर!
माधवरावांच्या मित्राने त्यांच्या मुलीसाठी आठवणीने ही परदेशी बाहुली आणली होती. आशीच्या हातात जेंव्हा ती आली तेंव्हा आशीचा आठ वर्षांचा जीव एकदम हरखून गेला. तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन गेलं. शनिवार होता आणि आशीला शनिवारी सकाळची शाळा होती. मग अख्खा दिवस मोकळा. बाहूली दिवसभर आशीच्या हातातच होती. आणि आशी तिला घेऊन घरभर नाचत होती. शेवटी कुठे आशीच्या लक्षात आलं की ती बाहुली आपलीच आहे आणि तिला आता आपण त्या प्लास्टिकच्या खोक्यातून आपल्या भातुकलीच्या जगात आणू शकतो. भराभर प्लास्टिकची फाडाफाड झाली. बाहुली आशीच्या हातात आली.
आशीची मान एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. बाहुली खाली बाहुली वर. चार डोळ्यांची उघडझाप.
तेव्हढ्यात आशीच्या लक्षात आलं, ही तर विमानाचा प्रवास करून इतक्या दुरून आपल्यासाठी, आपल्या भातुकलीच्या खेळात आलीय. किती दमली असेल ती! अरेरे! आता काय करायचं? आशीच्या प्रश्नाचं उत्तर तिलाच अजून थोडा वेळ मान इकडेतिकडे फिरवल्यावर मिळालं आणि मग आशीने बाहुलीसकट धाव घेतली मोरीकडे. बादलीतून तांब्या भरून पाणी घेतले आणि छानपैकी बाहुलीच्या डोक्यावर ओतले. सोनेरी केस भिजले. चकचकीत झगा भिजला. आई रविवारी कशी नहाण घालते मला तसेच करायला हवे हिचे मला आता. किती हे कष्ट. किती हा त्रास! आई नाही का दमून जात माझे लांबलांब केस धुवून? मी पण किती दमतेय! आता पंचा घ्यावा आणि केस छान पुसून घावेत.
"अगं अगं! हे काय? काय करतेयस तू हे?" आई कामावरून कधी आली कळलंच नाही की!
"अगं आई, बाबा नाही का गावाहून आले की अंघोळ करत? ही पण किती दुरून आलेली आई! पॅरीसवरून! विमानातून! म्हणून अंघोळ घातली मी तिला!"
आईने कपाळाला हात लावला.
चकचकीत झग्याचा मुठी एव्हढा बोळा आणि कुस्करून गेलेल्या लांबलांब पापण्या. सोनेरी केसांची झिपरी मोना, आशीची सर्वात लाडकी बाहुली होती!

Thursday, 12 August 2010
भूत
"पानी दोगे?"
"मेन्युकार्ड प्लीज"
"जरा प्लीज, ये टेबल साफ करना"
विवेक, रोहित आणि सोनलने प्रत्येकी तीनदा ह्या विनंत्या वेगवेगळ्या वेटरांना करून झाल्या.
त्यांच्या विनंत्या हवेत विरून जात होत्या. वेगवेगळे हातवारे करून गल्ल्य्यावर बसलेल्या मालकाचे लक्ष वेधून घ्यायचा देखील प्रयत्न करून झाला. मग तिघांनी एकमेकांकडे बघितलं आणि एक मोठ्ठं प्रश्र्नचिन्ह तिन्ही चेहेऱ्यांवर पसरलं.
"मला वाटतं आपण ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्याआधी तो मोठा रस्ता पार केला न तेंव्हा आपल्याला अपघात झाला असावा. आणि त्यात आपण मेलो असणार." इति सोनल.
"हो! आणि मरायच्या आधी भूक लागलीय, तेंव्हा ह्या उपहारगृहात बसून काही खाऊया अशी इच्छा आपण व्यक्त केल्याने आपल्या तिघांचीही भुते इथे येऊन बसली आहेत!" विवेक.
"च्यायला खरंच! त्यामुळेच ना आपण जे बोलतोय ते ह्या लोकांना ऐकूच येत नाहीये!" रोहित.
त्यांच्या खोखो हसण्याने आजूबाजूची माणसे दचकली आणि वेटरने मेन्युकार्ड मेजावर सरकवल्यावर तीन भूतांचा जीव भांड्यात पडला.

Wednesday, 11 August 2010
इंद्रधनुष्य
मन्या गॅलरीबाहेर बघत उभा होता. गेल्याच महिन्यात त्याने केकवरच्या आठ मेणबत्या विझवल्या होत्या. त्याची उंची दोन इंचाने वाढल्याने आता त्याला गॅलरीच्या कठड्यावरून खालचं दिसू लागलं होतं. अगदी इमारतीच्या तळापर्यंत नाही. पण रस्ता दिसायचा आणि संध्याकाळी आईबाबा घराकडे परतताना दिसायचे. तेव्हढं पुरेसं होतं. आज अधूनमधून पाऊस पडत होता. खरं तर त्याने कागदाच्या कितीतरी बोटी तयार करून ठेवल्या होत्या. आणि खाली पाण्याची छोटी छोटी डबकी दिसत तर होती. पण त्याला सांभाळणाऱ्या माई काही त्याला खाली सोडत नव्हत्या. म्हणजे आई आल्याशिवाय काही खरं नव्हतं. सगळ्या बोटी कठड्यावर रांगेत उभ्या होत्या. एकेक करून त्यांना आता बादलीतल्या पाण्यातच सोडावे असा विचार कंटाळलेल्या मन्याच्या डोक्यात आता येऊ लागला होता. रस्त्यावर कोणी नव्हतं आणि पाऊस थोडाच पडत होता. म्हणजे त्याने जेंव्हा हात लांब केला तेंव्हा त्याचा तळहात लगेच नाही भिजून गेला. हलकेच एक एक थेंब त्याला अगदी मोजता येतील असे त्याच्या हातावर पडले. त्याने मोजायचा प्रयत्न देखील गेला पण मग हात पाण्याने भरून गेला. उपडा केला तर पाण्याने थेट खाली उडी मारली.
आता मन्या खूपच कंटाळला. मान उंच करून त्याने वर आकाशाकडे बघितलं तर त्याला ते दिसलं. अर्धवट, पुसट. कठड्याला हात अडकवले, मागे अंग फेकलं आणि मान वाकडी केली तसं दिसणाऱ्या आकाशात ती पट्टी दिसली. मन्याने मग डोळे बारीक करून बघितलं. इंद्रधनुष्य आकाशातून डोकावलं. मन्याने इंद्रधनुष्याच्या एका टोकावरून सुरुवात केली दुसऱ्या टोकापर्यंत जायला. पण डोळे अडकले. बंड्याची बिल्डींग मध्ये आली. बिल्डींग संपली. इंद्रधनुष्य परत दिसलं. मग आला डॉक्टरांचा बंगला. शी! एव्हढा उंच कशाला बांधून ठेवलाय? हरवलं न माझं धनुष्य!
दारावरची घंटा वाजली आणि आईसाठी दार उघडायला माईंच्या आधी मन्या दाराशी पोचला.
मग त्याचं हरवलेलं धनुष्य त्याला परत दिसलं ते गावी काकांच्या घरी. पुढल्या वर्षी. आजीला बरं नव्हतं म्हणून आईबाबा त्याला घेऊन काकांकडे आले होते. चुलत भाऊ, शंकर मन्याहून एका वर्षाने मोठा.
अंगणात त्या दिवशी शंकर आणि मन्या पावसात भिजत होते. साचलेल्या पाण्यात उड्या मारून कोणाचं पाणी उंच उडतं हा खेळ. पाउस येतजात होता. चिंब भिजून कधीच झालं होतं. आई कामात होती म्हणून नाहीतर आत्तापर्यंत मन्याला धपाटाच मिळाला असता. उड्या मारतामारता शंकऱ्या आभाळाकडे बोट दाखवून किंचाळला. मन्याने दचकून वर बघितलं तर इंद्रधनुष्य. मन्याने एक टोक धरलं आणि हे काय? दुसरं टोक देखील तिथेच होतं!
"तुझ्या मुंबईत ते तुकड्यात दिसत असेल. पण आमच्या गावी मात्र ते अख्खंच दिसतं" त्याच्या शंकेला शंकऱ्याचा हे उत्तर होतं.
मन्या हिरमुसलेला. तेव्हढ्यात काका आतून बाहेर आले. इंद्रधनुष्याकडे मान आणि डोळे फिरवून फिरवून बघणाऱ्या मन्याच्या ओल्या केसांवरून हात फिरवत ते म्हणाले," मन्या, अरे इंद्रधनुष्य जन्माला येताना नेहेमीच सगळे सात रंग घेऊन येतं. पण ते कुठे जन्माला येतं त्यावर त्याचे किती रंग शिल्लक रहाणार आहेत हे अवलंबून असतं. आजुबाजूचं वातावरण खुलवणारं असेल तर सगळे रंग अधिक सुंदर दिसतात. त्याचा आकार पूर्ण घेऊन आपल्या समोर येऊन जातं. पण तेच जर त्याला पोषक असे वातावरण नसेल, तर मग काय होणार त्याच्या रंगांचं? ते धूसर होतं. अडथळ्यांतून मग ते दिसतं तुकड्यांत. तुला दिसलेल्या चिंध्याच रहातात मग शिल्लक."
मन्याला काकांचं बोलणं थोडंच कळलं पण बाहेर डोकावलेल्या काकी मात्र कसनुसं हसून परत आत निघून गेल्या.
रिमझिम पुन्हा सुरु झाली.

Tuesday, 10 August 2010
पायरी
अपूने पावाला मस्का लावला आणि मोरावळा त्यावर पसरला. आठ वर्षांची नाजूक मही मागे उभी राहून आईच्या हालचाली न्याहाळत होती.
"हे काय करतेयस?"
"अगं, आजीला घ्यायला विमानतळावर जायचं न? मग तिला भूक लागली असेल तर ती हे सँडविच खाईल!"
नातींवरचे प्रेम पंच्याहत्तर वर्षांच्या आजीबाईंना, सातासमुद्रापलीकडे जाण्याची शक्ती देत होते.
"पण आई, तुला काय माहित की आजीला हे सँडविच आवडेलच?"
"अगं, तू मोठी झालीस की तुला पण माहितीच असेल नं मला कायकाय आवडतं ते? तसं मला माहितेय माझ्या आईला काय आवडतं ते!"
मही एक क्षण विचारात पडली. पातळश्या ओठांना मुरड पडली.
"हं. बरोबर! मला पण माहितीच असेल तुला काय आवडतं ते!"
आपण मुलींना वाढवण्याची एक पायरी व्यवस्थितरित्या चढलोय ह्याची अपूला जाणीव झाली. हसून ती मागे वळली. तोपर्यंत महीने आपलं डोकं आजीसाठी रंगवायला घेतलेल्या स्वागत भेटकार्डात घातलं होतं.

Monday, 9 August 2010
दप्तर
खांद्याला अडकवलेलं शाळेचं दप्तर. त्यात फक्त आकारात लहानापासून मोठ्ठा इतकाच काय तो बदल अपेक्षित. त्यावेळी आतासारखी दप्तरांमध्ये विविधता नव्हती. आणि बहुतेक वेळा तरी मध्यमवर्गीयांच्या घरातून सगळे आलेले असल्याने सगळ्यांची दप्तरे जवळपास सारखीच असायची.
अंदाजे पाचवीत असेल आशी तेंव्हा. तिच्या बाबांनी उत्तम प्रतीची चामड्याची बॅग खास बनवून आणली. बॅग अतिशय सुंदर होती. महाग होती पण मित्राला त्यांनी दर महिन्याच्या पगारातून थोडेथोडे करून लवकरच पूर्ण पैसे देण्याचं वचन दिलं होतं. आणि माधवरांवाच्या वचनावर कोण अविश्वास दाखवेल? कामावरून येताना ट्रेनच्या गर्दीतून ती नवीकोरी हातभार लांबीची बॅग, खूप जपून ते घेऊन आले होते. त्यांना आठवत होतं तो त्यांनी डोक्यावर धरलेला त्यांचा शाळेच्या पुस्तकांचा ढीग आणि ती गावातील मळवाट. त्यांची मुलगी मात्र सुंदर चामड्याचं दप्तर घेऊन, शाळेच्या बसमधूनच प्रवास करणार होती.
घरी पोचल्यापोचल्या माधवराव आशीची सगळी पुस्तकं घेऊन बसले. व्यवस्थित रचून त्यांनी ती बॅगेत भरली. कोपऱ्यात पेन्सिलची डबी देखील ठेवली. बक्कल बंद करून बॅग उभी केली. सगळं कसं अगदी मनासारखं झालं होतं. गोंधळून बाजूला उभ्या असलेल्या आशीच्या हातात त्यांनी ती सुपूर्त केली. बॅग छान होती. तिने हातात धरली. खांद्याला न लावता ती हातात धरून न्यायची बॅग. म्हणजे बसमध्ये बसल्यावर मांडीवर घेऊन बसता येण्यासारखे होते. ती बाबांकडे बघून हळूच हसली.
दुसऱ्या दिवशी तिच्याबरोबर बॅग प्रवासाला निघाली. बसमध्ये मांडीवर बसली. सगळ्यांच्या नजरा बॅगेवर गेल्या. कोणी काहीच बोललं मात्र नाही. मुलांना गोळा करत तासाभराचा फेरफटका मारत बस शाळेबाहेर उभी राहिली. सगळ्यांच्या खांद्याला कापडाचं दप्तर आणि आपल्या हातात चामड्याची बॅग हे पाहून आता तिला थोडं धडधडायला लागलं. जागेवर आशी पोचली तेंव्हा रोज शेजारी बसणारी मैत्रीण तिच्या हातातल्या बॅगेकडे बघू लागली. आशीने नेहेमीच्या सवयीने समोरच्या बेंचच्या खालच्या कप्प्यात बॅग सरकवली. पण बॅग त्या निमुळत्या तोंडात शिरली नाही. कोंबायच्या पहिल्या प्रयत्नात बॅगेला पहिला ओरखडा गेला. मग आशीने बॅग पायाशी ठेवली.
घरी परतल्यावर आपली वह्यापुस्तके पुन्हा जुन्या दप्तरात ठेवली तेंव्हा ते जुनं दप्तर जरी खुश झालं तरी नवी बॅग खिन्नच झाली. माधवराव आले तेंव्हा त्यांनी कोपऱ्यात रुसून बसलेल्या चामडी बॅगेकडे नजर टाकली. आशीने गृहपाठ करताकरता चोरून बाबांकडे बघितले.
"बाबा, मला दिवसभर दहावेळा वाकून बॅग उघडायला लागते आणि दहा वेळा बंद करायला लागते!" खरं तर वह्या आणि पुस्तकं सकाळी पोचल्यावर एकदाच बॅगेतून काढून कप्प्यात ठेवली तर काम भागण्यासारखं होतं.
परंतु, अशी बॅग अख्ख्या शाळेत कोणाकडेच नव्हती आणि जगावेगळं करायचं धैर्य तिच्यात अजूनतरी आलेलं नव्हतं.
त्यानंतर बरेच महिने माधवराव आपल्या तुटपुंज्या पगारातून हे चामडी कर्ज फेडत होते. आणि मग काळाच्या ओघाने जेव्हा चामडीवर पांढरट बुरशी धरू लागली, चकचकीत बक्कल लालसर गंजू लागले तेव्हा रद्दीवाल्याने त्यांना त्याचे मोजून तीस रुपये दिले.

Sunday, 8 August 2010
देणं
काळं करडं गुबगुबीत कबुतर. धुळीत मान टाकून भूमिगर्भातून येणारे आवाज ऐकत सुन्न पडून राहिले होते. उड्या मारत धावत येताना तिची नजर त्याच्यावर पडली आणि ती तिथेच थबकली. एखादी कलाकुसर असावी तश्या त्याच्या करड्या रंगावर काळ्या दोन पट्ट्या होत्या. आणि चोच तशीच करड्या रंगाची. त्याचे अर्धवट मिटलेले डोळे. पण तिला माहित होतं. पोट हलणारी माणसं जिवंत असतात. आणि त्याचं पोट हलत होतं. म्हणजे तो जिवंतच होता. त्याला मदतीची गरज होती. तशीच पळत ती घरी गेली आणि पाच मिनिटात पाण्याची वाटी घेऊन परतली. दचकून तिने बघितलं. त्याचं फुगीर पोट आता हलत नव्हतं. लालसर पाय हवेत ताठ उभे राहिले होते. म्हणजे? मागे तिची मैत्रीण येऊन उभी राहिली तेंव्हा तिचे डोळे पाण्याने डबडबलेले होते.
"अगं, ते मेलय."
हिच्या तोंडून शब्द न फुटल्याने मैत्रीण समोर येऊन उभी राहिली. कमरेवर हात धरून.
"तुला रडायला काय झालं?"
पाण्याची वाटी जेमतेम हातात राहिली होती.
"आता काय करायचं आपण?"
"काय करायचं म्हणजे?"
ओघळणारे डोळे आणि वाहणारं नाक पुसून ती म्हणाली," अगं, आता आपल्याला त्याला पुरायला नाहीतर जाळायला हवं न?"
"काय? तुला कोणी सांगितलं हे?"
"मला माहितेय. असं आपण केलं तरच ते देवाघरी जाऊ शकेल."
"नाहीतर काय होईल त्याचं?" मैत्रिणीचा जरब असलेला आवाज आता थोडा उतरला होता.
"नाहीतर त्याचं भूत असंच इथे फिरत राहील!"
पुढच्या दहा मिनिटांच्या आत त्या कबुतराच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी त्याचं ते फुगीर शरीर कचऱ्यातून जमवलेल्या कागदांवर पसरलं आणि घरातून पळवून आणलेल्या आगकाडीने ते पेटून निघालं.
कबुतराच्या आत्म्याने विलीन होताहोता गुढघ्याच्या खाली लोंबकळणाऱ्या झग्याच्या बाह्यांना वारंवार डोळे पुसणाऱ्या मुलींचे शतशः आभार मानले.
काही देणी गेल्या जन्माची असतात.

Saturday, 7 August 2010
टाळ्या आणि डोकं.
ता थई तक तक थई ...
नऊ दगडांचा रचलेला विषमतोल लगोरीचा डोंगर. एक डोळा बारीक करून नेम धरावा आणि हे स्वर कानावर पडावे. तळमजल्यावर उघड्या दारातून डोकावलं तर एक हाडकुळे गुरुजी डाव्या हातावर उजव्या हाताच्या टाळ्या वाजवत हे असे स्वर फेकत होते. आणि त्यांच्यासमोर माझी मैत्रीण पाय आपटत होती. तीही माझ्याच एव्हढी. दहा बारा वर्षांची.
हे काय आता नवीनच?
"ते माझे डान्सचे गुरुजी आहेत. रोज संध्याकाळी शिकवायला येणार आहेत."
"हो?" माझी चक्र चालू झाली.
" बाबा, माझ्या मैत्रिणीला न डान्स शिकवायला रोज गुरुजी येणार आहेत."
"मग?"
"मग, मी पण जाऊ का बाबा?"
पुस्तकातून डोकं वर काढत बाबा,"म्हणजे काय होईल?"
" मला पण डान्स येईल न बाबा!"
डोकं परत पुस्तकात.
"हो, पण मग पुढे काय होईल?"
एव्हढा पुढचा विचार मी नव्हता केला!
"काही गरज नाही."
"पण का बाबा?"
शांतता.
"बाबा, सांगा ना." मी पण तिच्यासारखा जमिनीवर पाय आपटला.
"मग तू कार्यक्रम करायला निघशील."
?
"आणि मग टाळ्या डोक्यात शिरतात!"
पुस्तकात शिरलेल्या डोक्याकडून पुढे उत्तर मिळायची काहीही सोय नव्हती.
'टाळ्या डोक्यात शिरतात' म्हणजे काय होतं हे काही माझ्या डोक्यात शिरलं नाही.
परंतु नंतर ते 'ता थई तक तक थई' कडे दुर्लक्ष करून, नेम धरून लगोरी फोडणं बरेच दिवस कठीण गेलं खरं!

कसा गेला दिवस?
सूर्य येतजात असतो.
मग कधी दिवस चांगला जातो. तर कधी खराब.
कधी धकाधकीचा. तर कधी दिवस आरामाचा.
मनोरंजनाचा. हसता खेळता. उठताबसता.
साधा सरळ. तर गुंतागुंतीचा.
कधी स्वैपाकघरात. तर कधी शयनगृहात.
आपल्या माणसात. तर कधी जमावात.
कधी कोलाहालात. तर कधी तंद्रीत.
कधी अख्खा दिवस जातो शवासनात.
तर कधी 'माझी सॉलिड लागलीय' असे म्हणायला लावणारा.
समोरच्या इमारतीमधील सुखवस्तू सोमाणकाकांच्या तीन पोरांमधील एकही पोर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आधार द्यायला जेव्हा उभं रहात नाही तेंव्हा त्यांनी त्यांचे तरुणपणाचे दिवस नक्की कसे काढले असतील हे मला कळत नाही. त्यांचा दिवस धकाधकीचा गेला कि आला तसा गेला?
नाती म्हणजे गुंतवणूक. जशी पैश्यांची. त्याहीपेक्षा महत्वाची. एकेक दिवसाची त्यावर मेहेनत. त्यावर श्रम. त्यावर घाम. त्यासाठी जागरण. त्याची जपवणूक करावी. एकेक दिवस नात्याला वहावा.
सूर्य तर जातयेत असतो.
आपण तो नात्याला वहावा.
तर हे दिवस कारणी लागले असे म्हणताना सुरुकुतलेल्या चेहेऱ्यावर हसू आपसूकच येईल.
असं मला वाटतं.

Friday, 6 August 2010
आमचं फूल!
Thursday, 5 August 2010
अगं,
विसरलीस मला?
तिने दूरवरून आपल्या जिवलग मैत्रिणीला मुकी साद घातली. पण हे काय? ती नाही थांबली. आपल्याच तंद्रीत काळोखात दूरदूर जाऊ लागली. मैत्रीण आज तिला विसरून गेली होती काय? जवळजवळ सात वर्षांची मैत्री ती विसरली होती? रोज मारलेल्या सुखदुःखाच्या गप्पा देखील विसरली? दोघींनीच मारलेल्या सुनसान रस्त्यांवरच्या चकरा विसरली?
अंधारात तीस चाळीस पावलं चालून ही पुढे आली होती. आणि मुकी साद जाणवली. ही वळली. मागे बघितलं. दूर ती उभी होती. अंधारात देखील उठून दिसणारी. खांबामागुन डोकावणारी. हिला वाटले, असे कसे टाकले मी सखीला उघड्यावर? तीच तर असते नेहेमी बरोबर...जगासमोर उभं रहाण्याआधी. कधी हमसाहमशी तर कधी ओक्साबोक्शी. त्या त्या वेळी जे असेल ते. जसे असेल तसे. हा असा एकांत कधी आणि कुठे मिळणार? एक शब्द देखील न उच्चारता स्तब्ध, फक्त ऐकून घेणारी...ही सख्खी सखी.
ही जेव्हा वळली तेंव्हा तिला खुदकन हसू आलं.... ह्या टेलीपथीचं.
इतक्या दुरून मी तुला मूक साद घातली, आणि आलीच कि नाही तुला ऐकू?
ही देखील हसली...नुकतीच बॅगेत जाऊन बसलेली किल्ली तिने बाहेर काढली.
आणि किल्लीचं बटण दाबून हिने दुरूनच स्वतःची पांढरीशुभ्र गाडी बंद केली.
इतक्या दुरून देखील तिने टाकलेला निश्वास हिला ऐकू आला.
ही हसली. आणि काळोख्या बिळातून प्रकाशाकडे नेणाऱ्या पायऱ्या चढू लागली.

मला चंद्र हवा
"तुमच्या घराबद्दल काय कल्पना आहेत?"
"माझ्या घरात मला चंद्र हवा."
बाहेरच्या खोलीत पाचांच कुटुंब झोपायचं. आई आणि तीन मुली एका रांगेत आणि वडील त्यांच्या पुस्तकांच्या दुनियेला चिकटून. विद्वानांच्या कुशीत.
रात्र पुढे सरकायची. चंद्र कधी समोरून तर कधी 'side profile' देत फिरायला निघायचा. आणि मग बरोब्बर खिडकीत येऊन अडकायचा. आणि मग काय विचारता? अख्खी १५x१२ ची खोली रुपेरी होऊन जायची. उठून त्याच्याकडे बघितलं तर फिरणारे धुलीकण त्या खोलीला अधिकच गूढ बनवून जायचे. वाटायचं जसं काही आपण सर्वचजण आता तरंगायला लागू आणि न कळत त्या धुलीमार्गातून बाहेरच्या विश्वात नाहीसे होऊ. चंद्रावर पोचू की नाही माहित नाही पण पृथ्वीवरून नक्कीच नाहीसे होऊ. जागी आहे म्हणून मला कळेल तरी पण बाकीच्यांना कळलंच नाही तर? बाबांची पुस्तके त्यांच्या बरोबरच ह्या प्रवासाला निघाली तर मग त्यांना काहीच फरक पडणार नाही. आणि बाबा बरोबर आहेत म्हणजे मग हा रस्ता मला कुठेही का नेईनात, मला फरक पडणार नाही. तो अडकलेला चंद्र अंग झटकून स्वतःची सुटका कधी आणि कशी करून घेई माहित नाही पण जाग येई तेंव्हा ढळढळीत उजाडलेलं असे आणि बाबा समोर व्यायाम करत असत. हुश्श! त्यांच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय त्यांना कोणी नेलेलं नसे!
आता धबधब्याच्या शेजारी घर बांधायला घेताना त्या वास्तुविशारदाने हा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर त्याला एका क्षणात मिळालं. पण माझं हे चंद्राचं घर काही मला नाही मिळालं. असा खोलीत अडकलेला चंद्र नंतर दिसला तो अमेरिकेत बहिणीच्या शयनगृहात. तेंव्हा लक्षात आलं, दुसऱ्यांच्या खोलीत डोकवायची ह्याला खोडच आहे म्हणायची!

Wednesday, 4 August 2010
दुःख तुझे...सुख माझे
ती मुंबईतली रात्र होती...तिला जुना निद्रानाश होता. सूर्यास्त आणि सूर्योदय ह्यामधील कालावधीत टक्क जागी. अथांग पसरलेल्या आढ्याकडे नजर लावून.
सायनवरून ठाण्याकडे जाणारा तुडुंब भरलेला रस्ता त्यावेळी विमानातून बघितले असता कीबोर्डसारखा दिसत असावा. वेगवेगळ्या आकाराची, जागची न हलणारी कचकड्याची नुसतीच झाकणे. दूरवरून अॅम्बुलन्सचा क्षीण आवाज गाडीतील वाजणाऱ्या रॅप संगीतातून देखील त्याच्या कानावर आला. उजव्या हाताशी असलेल्या आरशात लाल दिवा फिरू लागला. त्या घट्ट अडकून बसलेल्या गाड्यांमधून ती कधी पुढे सरकेल कोणास ठाऊक. क्षीण आवाज, अतिशय मंद गतीने स्पष्ट होऊ लागला. डोक्यात भणभणण्याइतका. एखाद्या चित्रपटातील एखादं 'स्लो मोशन'च दृश्य असावं ह्या रीतीने ती अॅम्बुलन्स पुढे सरकू पहात होती. जशी ती त्याच्या गाडीला मागे टाकून थोडी पुढे सरकली तशी त्याची नजरभेट मागे बसलेल्या तरुण स्त्रीची झाली. पदराचा बोळा तोंडावर. नजरभेट एका क्षणाची. तिचा प्राण समोरच्या शरीरात अडकून बसला असावा. ती नजरभेट त्याला सांगून गेली.
अॅम्बुलन्स पुढे गेली. तिच्या मागून एक, दोन, तीन....न संपणाऱ्या गाड्यांचा ताफाच निघाला. अॅम्बुलन्स वाट काढत होती. ताफा तिचा मागोवा धरत पुढे जात होता. रस्त्याला उशिरा का होईना तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. 'टेन कमांडमेंटस' मधील समुद्र जसा दुभंगला तसा गाड्यांचा हा कीबोर्ड दोन दिशांना सरकला. मागे जवळजवळ पाच गाड्यांचा ताफा.
कोणी मोठी व्यक्ती दिसतेय. त्याची गाडी सहाव्या नंबरावर सरकू लागली. लाल दिव्याचा नियम अॅम्बुलन्सला नसतो. पाच गाड्यांमागून सहावी गाडी निघाली. आणि एका क्षणात त्या पाचही गाड्या आपापली गती पकडून समोरच्या रस्त्यावर नाहीश्या झाल्या. साखरेचा दाणा नाहीसा व्हावा आणि मुंग्यांनी आपापला मार्ग धरावा.
तो चक्रावला. त्या गाड्यांचा त्या मरणासन्न मनुष्यजीवाशी काहीही संबंध नव्हता?
एका क्षणात त्याला जाणीव झाली.
हे आपल्याकडून काय घडले?
त्या अॅम्बुलन्सची ढाल करत आपण ह्या ट्रॅफिक जॅम मधून मार्ग काढला?
ती हमसाहमशी रडणारी स्त्री...तिने एकवार आपल्यावर टाकलेली नजर.
मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही वृत्ती आपल्यात कधी शिरली?
वाळवीचा छुपा शिरकाव व्हावा ..आणि आपल्या सदविवेकबुद्धीचा भुसाच उरावा?
आपल्या सुंदर पत्नीबरोबर 'कँडल नाईट डिनर' करण्याचा त्याचा बेत अतीव थकव्यामुळे मागे पडला.

Tuesday, 3 August 2010
स्पर्श
काल एका चित्रतारकेला शूट केलं. सुंदर आणि भावविभोर चेहरा. क्षणात बदलणारा. हवे तसे भाव देणारा. कधी भावूक, कधी आतुर, तर कधी हलकेच स्मितहास्य देणारा. आरसपानी.
बहुतेकवेळा तरी ही PG3 मंडळी सहज तीनचार तास उशिरा येतात. परंतु ह्या तारकेची गाडी आणि माझी गाडी एकाच वेळी स्टुडियोत दाखल झाली. मात्र ज्यावेळी आमची सहनशक्ती संपत आली त्यावेळी तिचा चेहरा मेकअप करून तयार झाला. पाच तास. त्यानंतर एका मागोमाग एक....क्षणात बदलणाऱ्या मुद्रा. खोटं बोलणं माझ्या बापजाद्यात कोणी केलेले नाही त्यामुळे जर तिचा चेहरा बोलका नसता तर मला तिला उस्फुर्त दाद देणं खूप कठीण गेलं असतं. पण हा बोलका चेहरा मी फोटोग्राफरच्या कम्प्युटरवर बघत होते आणि माझ्या तोंडून तिला दाद मिळत जात होती...त्या प्रत्येक सच्या दादेमधून तिची कळी खुलत गेली आणि कम्प्युटर खुश होत गेला. जवळजवळ सहा तास चाललेलं शूट. तिची काम चांगलंच करायची तीव्र इच्छा... आणि अनुभवी अदाकारी. ज्यावेळी पॅकअप झालं तेंव्हा तिने मला मारलेली घट्ट मिठी मात्र मला वेगळीच आठवण करून गेली.
गेल्या वर्षी मी भारताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय शूट करत होते. नागपूर विमानतळावर उतरून सहा तासांचा प्रवास करून एका छोट्या गावी आम्ही पोचलो होतो. शूट पूर्ण झालं त्यावेळी दिवसभर आमच्यावर रखरखत्या उन्हाचं छत्र धरून सूर्य थोडा कंटाळला होता. एका शेतकऱ्याने आम्हां सगळ्यांना घरी घेऊन जाण्याचा घाट घातला होता. पोचलो. घरातील वडीलधाऱ्यांशी ओळखी झाल्या. आणि मिनिटात घरची लक्ष्मी बाहेर आली आणि माझी ओटी भरली. मुंबईतल्या ऑफिसमध्ये बसून ह्या मोठ्या शुटची तयारी करताना, ना मला ह्याची अपेक्षा होती. ना माझी तयारी. घरातील वृध्द आजी ह्या सगळ्यावर दुरून नजर ठेऊन होत्या. मी त्यांच्या पाया पडले तेंव्हा देखील अशीच मला घट्ट मिठी मारली गेली होती. अतिशय आपुलकीची. अतिशय जवळीक साधणारी, तेंव्हाही मला त्यांचा आयुष्यभर काढलेला कष्टांचा घाम जाणवला होता.
काल त्या वातानुकूलित, भल्या मोठ्या स्टुडियोत, त्या चित्रतारकेचा किंचितसा घामट स्पर्श मला, केलेले कष्ट सांगून गेला.

Monday, 2 August 2010
बाबा
माझे बाबा विश्वास पाटील.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असे दोन विश्वास पाटील. एक 'पानिपत' कार आणि दुसरे 'नवी क्षितीजे' कार.
'नवी क्षितिजे' हे त्रैमासिक चालवणारे पाटील, माझे बाबा. इतिहास, मानसशास्त्र, कला, धर्म, तत्वज्ञान ह्या विषयांवर ते लिखाण करत असत.
'पद्मगंधा' प्रकाशनाचे श्री. जाखडे ह्यांनी 'कार्ल मार्क्स' ह्या विषयावरील बाबांचे लेख चार दिवसांपूर्वी, एकत्रितरीत्या प्रकाशित केले आहेत. 'कार्ल मार्क्स- व्यक्ती आणि विचार' ह्या पुस्तकाद्वारे.
माझ्या बाबांसारखे बाबा मला मिळाले हे माझं भाग्य.
वर जलरंगातील जे व्यक्तीचित्र आहे ते माझ्या चित्रकार नवऱ्याचे बाबांवर असलेल्या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे.
Sunday, 1 August 2010
फ्रुट प्लेट
मला वाटतं,
आयुष्य म्हणजे मिक्स फ्रुटची एक प्लेट आहे,
चिकू आहे, आंबा आहे,
संत्र आणि मोसंब देखील आहे.
आणि...
जितकी मी ती लवकर संपवत नाहीये,
तितकीच ती कुजते आहे!

Subscribe to:
Posts (Atom)