नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 6 October 2010

मश्गुल

भरगच्च गुलाबी आणि त्यावर पांढऱ्या रंगाची उधळण. म्हणजे जसं काही गुलाबी दुलई अंथरावी आणि त्यावर आभाळातून पांढऱ्या रंगाने थबथबलेला कुंचला झटकावा. मग कुठेही विसावतील ते थेंब. त्या गुलाबी रंगांवर त्या पांढऱ्या मुक्त पद्खुणा किती खुलून दिसतात. मोजून एक दोन आणि तीन, लाल कौलारू घरे. आणि त्याला पडलेला सिमेंटचा उभा आडवा वेढा. त्यात ही बोगनवेल. तशीच दिसते ती. तिसऱ्या मजल्यावरून. गालीचा अंथरलेला. असा गालिचा, ज्यावर कधी पाऊल ठेवूच नये. उंचावर, हातात हनुवटी खुपसून तासनतास बसावं आणि तो नाजूक गालीचा डोळे भरून बघावा.

आपल्यातच मश्गुल असतात असे काही जीव. आजूबाजूला तोडफोड होते. आभाळ कोसळतं. धरणीकंप होतो. जग उलथंपालथं होतं. कधी इमले कोसळतात. पण ह्यांचं मात्र जगणं चालू. फुलणं चालू. पानगळ होते. नाही असं नाही. पण त्यातही त्यांचं फुलणं संपत नाही.
मग प्रश्न पडतो...वरून बघणाऱ्याला. त्याला वाटतं...खिजवते ही बोगनवेल!
"मी इतकं थैमान घातलं...जग तुझं स्मशानात पोचवलं....तुझं फुलणं तरी संपतच नाही?!"

आपल्यातच मश्गुल असे असतात काही जीव!

9 comments:

BinaryBandya™ said...

अगदी असेच जगता यायला हवे ..
पण नाही ना जमत ... :(

अनघा said...

अरे, मला पण हल्लीच कळलंय कि असंही जगता येतं!! :)

सौरभ said...

येक्दम राईट्ट... असंच जगायच असतं. मुळात ह्यालाच जगणं म्हन्त्यात. (आsss... लई झालं लेक्चर. मेंदू जड झाला. आता गाणी गा...)
बोगनची वेल निघाली...
झाडे हि डुलाया लागली... :D
नाचो गाओ मश्गुल हो जाओ :)

अनघा said...

सौरभ महाराज की जय!! :)

श्रीराज said...

तुझा ब्लॉगसुद्धा बोगनवेलच तर आहे ना...सतत फुलणारा...शिवाय ह्या वेलीवर फुलं ही वेगवेगळ्या रंगांची येतात...अगदी रोज

अनघा said...

श्रीराज, तुम्ही सगळे इतके अविभाज्य घटक आहेत ना ह्या ब्लॉगचे कि तो फक्त माझा नाहीये आता! असं मला तरी खूप वाटतं...तुमच्याशिवाय अधुरा... :)

Anushree V. said...

shevatacha vakya....khasach hota...:)

THE PROPHET said...

जीवन मुळात असंच असतं...तो जीवनाचा मूळधर्मच आहे असं मला वाटतं...फक्त आपण ते समजून घेत नाही आणि स्वतःला त्रास करून घेतो!
अति होत आहे..आवरा!!!

अनघा said...

विद्याधर, त्रास करून घेणं अति होतंय ना? प्रयत्न चालू आहे आवरण्याचा! :)