नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 10 August 2010

पायरी

अपूने पावाला मस्का लावला आणि मोरावळा त्यावर पसरला. आठ वर्षांची नाजूक मही मागे उभी राहून आईच्या हालचाली न्याहाळत होती.
"हे काय करतेयस?"
"अगं, आजीला घ्यायला विमानतळावर जायचं न? मग तिला भूक लागली असेल तर ती हे सँडविच खाईल!"
नातींवरचे प्रेम पंच्याहत्तर वर्षांच्या आजीबाईंना, सातासमुद्रापलीकडे जाण्याची शक्ती देत होते.
"पण आई, तुला काय माहित की आजीला हे सँडविच आवडेलच?"
"अगं, तू मोठी झालीस की तुला पण माहितीच असेल नं मला कायकाय आवडतं ते? तसं मला माहितेय माझ्या आईला काय आवडतं ते!"
मही एक क्षण विचारात पडली. पातळश्या ओठांना मुरड पडली.
"हं. बरोबर! मला पण माहितीच असेल तुला काय आवडतं ते!"

आपण मुलींना वाढवण्याची एक पायरी व्यवस्थितरित्या चढलोय ह्याची अपूला जाणीव झाली. हसून ती मागे वळली. तोपर्यंत महीने आपलं डोकं आजीसाठी रंगवायला घेतलेल्या स्वागत भेटकार्डात घातलं होतं.

11 comments:

rajiv said...

या रेशमी धाग्यांची निगुतीने घातलेली वीणच त्याला दोरखंडाचे स्वरूप देईल एक दिवस !

Anonymous said...

nice!

सावधान said...

pharacha chhan ! agadi mojakya shabdat lihalay.
Avadal!
Ny_USA

(shabda chachapanit vel khup jato tyamule punha pratikriya denyat adathala yeto, mhanun mi tasala prakar majhya [Blog]Dinike var thevala naahi.)

Vandana said...

very sweet :)
vandana

श्रीराज said...

मुलं किती निरागस असतात ना!!

अनघा said...

सावधान, भेट दिल्याबद्दल आभार. आणि तुम्हांला ही पोस्ट आवडली हे वाचून आनंद झाला. :)

अनघा said...

Anonymous, धन्यवाद! :)

अनघा said...

हो ना श्रीराज, फक्त ही निरागसता नंतरच्या कालावधीत न सांगता पसार होते.

अनघा said...

Thank you Vandu. :)

संकेत आपटे said...

मस्त

अनघा said...

आभार, संकेत भाऊ! :)