घरी असलं की काय करू आणि काय नको असं होत असतं ! पुस्तक वाचू, गाणी ऐकू की चित्र काढू ! एक जाडजूड पुस्तक चालू केलंय वाचायला. आणि माझ्या इतर उद्योगांत, हे पुस्तक माझे काही महिने तरी गिळंकृत करेल ! मध्यंतरी दिवसाला एक चित्र असा संकल्प केला होता खरा पण तो संकल्प फक्त काही दिवस चालला. चित्र काढण्यास कंटाळा आला असे नाही, पण नाना उद्योग उगवत गेले आणि त्यांची छाटणी करण्यात माझं हे गवतफूल वेचायचे राहूनच गेले.
परवा मात्र पुन्हा एकदा ब्रश हातात धरला आणि एक व्यक्तीचित्र रेखाटलं. आता ज्या छायाचित्रावरून मी हे चित्र काढलं ते तर मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही. त्यामुळे ते मी तंतोतंत काढलं आहे की नाही हा प्रश्न तुमच्या मनात अनुत्तरितच रहाणार आहे !
;)
5 comments:
अनघा हे चित्र खूप छान रेखाटले आहेस.जरी ते एखाद्या छायाचित्रावरून काढले असलेस तरी तुझ्या हातातून जे कागदावर उतरले आहे ते मला तरी खरे चित्र न बघता देखील जिवंत वाटते आहे! :)
खूप छान !
सुंदर, बोलके डोळे! एकदम जिवंत वाटतंय ते चित्र.
ekdam saaro che... :) badhiya :)
खूपच मस्त!
Post a Comment