का जे देवावर विश्वास ठेवतात, वार पाळतात, उपासतापास करतात, त्यांनाच
नेमकी देवाची कार्यपद्धती पटताना दिसत नाही ? का त्यांना देवाची एखाद्या
कृतीमागची भूमिका आवडत नाही ? देवाने हे असं का केलं ह्या विचारावर आपला
वेळ व शक्ती वाया घालवताना ते का दिसतात ?
आणि त्या उलट उपासतापास, देवळेमंदिरे न करणारी माणसे; देवाचे विचार समजून घेऊन त्यानुसार आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना का आढळतात ?
शेवटी देव हे एक आयुष्य जगताना मदत करणारे तत्वज्ञान आहे. देव कायम आपल्यावर लक्ष ठेवून आहे. तो कधीही आपल्याला एकटं टाकत नाही. फक्त तो जे आपल्या आयुष्यात घडवून आणतो, ते त्याने का घडवून आणले असावे, त्याची त्यामागची भूमिका काय असावी व जे काही घडतं त्यातून; आपण आपलं व्यक्तिमत्त्व, आपल्या माणसांच्या, समाजाच्या भल्यासाठी बदलू शकलो, घडवू शकलो तर आपल्या बऱ्यावाईट अनुभवांतून आपण काही शिकलो असे म्हणता येईल.
असो.

मी समोरच्याला समजण्यासारखं काही लिहिलं आहे की नुसताच माझ्या विचारांचा गुंता समोर ओतला आहे…कोण जाणे !
शेवटी प्रत्येकाचं आयुष्य तेच ते जुनं तत्वज्ञान ओतत घोळत असतं.
पेला अर्धा रिकामा की भरलेला…वगैरे वगैरे.
फक्त हे तत्वज्ञान आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या पानावर शिकतो हे महत्त्वाचं.
नाहीतर पुस्तक छप्पन पानांचं.
आणि आयुष्याची ओवी पंचावन्न पानावर !

5 comments:
गुंता तर आहेच…. तरीही देव ही संकल्पना स्वत:च्या आधारासाठी मानवाने निर्माण केलेली असावी . पण घडणाऱ्या घटनांकडे सकारात्मक न बघता जर त्यातील वाईट फक्त बघून 'देवा'ला दोष देणे हे एकदम चुकीचे आहे. घटनांमधील गैर वा चुका टाळून पुढे जात रहायला हवे …
yuss yuss... ekdam agree :) :)
Ka kon jane Deool chitrapatchi athvan zaali. Tyat Dilip Prabhavalkar Girish Kulkarnila Devachya sankalpane baddal sangto to scene mla hi post vachtana athavla
राजीव, का कोण जाणे पण आई म्हणत असे ते आठवलं…माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. :)
सौरभ, :) :)
Post a Comment