"नाना खूप बोलतो हल्ली."
"नाना बोलतो तसंच वागतो."
"हो…असेल तसं. पण करावं पण बोलू नये."
"सध्या गरज आहे जे आपण चांगलं काम करतो ते बोलून दाखवण्याची. पूर्वीचे दिवस गेले…
सत्कृत्य करायचे…पण
त्याची कुठेही वाच्यता करायची नाही. जे चांगले आहे ते जगापुढे येण्याची गरज आहे…त्यामुळे जगातील माणसं ते पटलं तर तसाच वागण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता तरी असते. नाही तर वाईट कामांची सतत सगळ्या माध्यमांतून बोंबाबोंब होतच असते आणि त्यात चांगले काम, चांगला विचार कुठे नाहीसा होतो पत्ता लागत नाही. कुठल्याही चुकीच्या गोष्टीवर आपण आक्षेप घ्यायचा नाही…त्यावर काहीही करायचे नाही, आणि मग भ्रष्ट्राचार वाढलाय, हल्ली कोणीही नियम पाळत नाही असे म्हणून फक्त तक्रार करीत रहायची. हीच आपली सवय झालीय. आणि त्यामुळे कोणी चांगला विचार मांडला की मग तो हल्ली फार बोलतो असं म्हणायचं…सपशेल चुकीचं आहे हे !"

संजय दत्तच्या ताज्या बातमीवर नाना पाटेकरांचे मत ऐकून माझ्या एका मित्राने त्याचे मत मांडले. आणि मग त्यावर मी माझे.
इथे त्याची युट्यूब वरील क्लिपिंग
दिली आहे. ती बघा…आणि त्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगितलेत तर
बरे होईल. त्यामुळे माझे विचार जर चुकत असतील तर ते मला कळेल. मगच
सुधारणेला वाव असू शकतो. कारण कुठेही काही चुकीचे होताना दिसले तर त्यावर
'let it go' करून मला पुढे निघून जाता येत नाही.
आणि तसे मला जाता येत नसल्याने मला हा 'let it go' चा सल्ला वारंवार ऐकवला जाऊ लागला आहे.
4 comments:
एखादी गोष्ट पटली नाही तर नुसती त्याबद्दल बडबड अनेक लोक करतात पण त्याचा खराखुरा विरोध करणारे आज हवे आहेत. आणि नाना चे बोलणे येथे समर्पक आहे आणि कृती योग्य वाटली.
अनघा, मी लहानपणापासून नानाचा चाहता आहे... आणि आता ही आहे... पण मोठेपणी ही तो मला आवडत राहिला त्याचे कारण त्याचा हा स्वभाव आहे... सरळ आणि अतिशय सरळ विचार करणारा असा हा मनुष्य मला वाटतो...
मतावर मत आणि त्यावर अजुन मत... दामिनीमधले सन्न्नीपाजी आठवले. wrong or right is relative...
त्या पत्रकाराला कुणी सांगितलं होतं नानाला प्रतिक्रिया विचारायला? उठसूठ जाऊन नानाची प्रतिक्रिया घेऊन येतात टीआरपीबाज चॅनेलवाले.
Post a Comment