माझी गाडी रस्त्यावर रहाते. तो माझा नाईलाज आहे. आपल्या वस्तूंवर आपण प्रेम
करणे हे काही अवास्तवी नसावे. मी ज्या घरात रहाते ते घर स्वच्छ ठेवणे ही माझी गरज आहे. व ते काम आमची रेश्मा करते. रस्ता साफ करणे ह्यासाठी
महानगरपालिकेने माणसे नेमली आहेत. परंतु, ती कधी कामावर येतात तर कधी नाही.
आपल्याला नेहेमीच मनपसंत काम उदरभरणासाठी मिळेल ह्याची काही शाश्वती नसते
आणि रस्त्यावरचा केर काढणे कोणाला आवडू शकेल हे एकूणच कठीण दिसते.
मला केर काढणे आवडते. केर काढणे, वा एखादी गोष्ट धूळ झटकून पुन्हा जागेवर ठेवणे ह्यातील आनंद काही आगळाच. त्या मागचे कारण इतकेच असावे की काम चांगले झाले आहे, त्याने काही आसपास फरक पडला आहे ह्याची प्रचिती त्वरित मिळते. असे काही सर्वच कामांबद्दल बोलता येत नाही. असंख्य कामे अशी असतात जी सातत्याने करावी लागतात तेव्हा कुठे त्याचे बरे निकाल आपल्या डोळ्यांना दिसू लागतात.
कोण जाणे केर काढावयास मी कधी शिकले. माझे बाबा अतिशय सुंदर कचरा काढीत असत. त्यांनीच कधीतरी ते काम मला सांगितले असावे. माझा कचरा काढून झाल्यावर बाबा घरभर अनवाणी पायाने चालीत, व पाय जमिनीवर घासून मी अंगावर घेतलेले काम बरे केले आहे की नाही ते तपासीत. जर त्यांच्या पसंतीस ते उतरले तर त्याबद्दल मला शाबासकी मिळे. त्या शाबासकीसाठी मला आपण रोजच कचरा काढावा अशी इच्छा होत असे. "अनघा, छान काढलास हं कचरा !" बाबांच्या तोंडून हे उद्गार ऐकणे म्हणजे भारीच.
माझी गाडी रस्त्यावर लागत असल्याकारणाने तिच्या आसपासचा कचरा काढला जात नाही. दिवसरात्र माझ्या मुक्या गाडीला अंगाखाली कचरा घेऊन तिष्ठत उभे रहावे लागते. उन्हापावसात. ऊन आणि पाऊस ह्या दोन गोष्टींवर मी काहीही करू शकत नाही. आपण काय करू शकतो व कोणत्या गोष्टीवर आपला ताबा नाही हे सर्वप्रथम समजून घेतलेले बरे असते. मी धडधाकट जन्माला आले आहे, आणि अजूनही माझ्या अंगात शक्ती आहे, हे मी स्वत:ला वा जगाला सिद्ध करावयाचेच म्हटले तर ते एखाद्या चांगल्या गोष्टीने करावे. मी बदल घडवून आणू शकते इतका आत्मविश्वास मात्र माझ्यात आहेच. आणि, कुठलाही बदल घडवून आणावयाचा असेल तर त्याची सुरवात स्वत:पासूनच व्हावयास हवी हे नक्की. नाहीतर मी आणि एखाद्या कुत्र्याने रस्त्यात करून ठेवलेली घाण ह्यात फरक तो कोणता ?
उगा भुईला भार.
पहाटे शिवाजी पार्कला चकरा मारीत असताना माझ्या लक्षात आले, की आपण आपल्या गाडीवर हा असा अन्याय नाही करू शकत. केवळ तिला मी घरात ठेऊ शकत नाही म्हणून तिला कचऱ्यात उभे करून ठेवणे हे सपशेल चुकीचे आहे. आता मी दुसऱ्यावर नेमके किती विसंबून रहावयाचे आहे ? एखाद दिवस रेश्मा आली नाही तर मी घर असेच गलिच्छ टाकून कामावर जाते काय ? नाही. मी केर काढूनच हसतेखेळते घर सोडते. ह्याचाच अर्थ असा होतो की ह्यावर देखील मला काहीतरी केलेच पाहिजे.
घरी पोचले. गाडी रस्त्यावर लावली. आणि आमचे रखवालदार गोसावी ह्यांना विचारले," गोसावी, तुमच्याकडे झाडू आहे ?"
"झाडू ? झाडू कशाला हवीय तुम्हाला ?"
"द्या तर !"
गोसावी इमारतीच्या मागे धावतपळत गेले आणि येताना एक खराटा घेऊन आले.
झक्कास !
मी खराटा घेतला आणि माझ्या गाडीच्या आसपासचा आणि तिच्या अंगाखालचा रस्ता झाडावयास सुरुवात केली.
खर्र खर्र.
मी पार आमच्या गावच्या अंगणात जाऊन पोहोचले. पहाटे जाग यायची तीच मुळी कोणी अंगण झाडीत असे त्या नादाने. खर्र खर्र. डोळे चोळत अंगणात उभे रहावे तर अंगण अगदी कोणी गुदगुल्या करीत असल्यागत खुदखुदत असे. खुशीत.
मोजून पाच मिनिटे लागली माझ्या गाडीला हसवायला.
रस्ता हसला. गाडी हसली. मी हसले. आणि वर आले तर भिंतीवरील व्यक्तिचित्रातील बाबा पण हसले.
"अनघा, छान काढलास हं कचरा."

आहे काय आणि नाही काय ?!
11 comments:
अनघा, हल्ली तुझी प्रत्येक पोस्टच विचारात पाडायला लागलीय बरं ...
माझ्या शहरातल्या सार्वजनिक ठिकाणचा कचरा साफ करायला एकटीनेही झाडू उचलण्याइतकं हे शहर मला आपलं कधी वाटेल बरं?
काय थांबवतं माझा हात?
’मला काय त्याचं?’ असं वाटणं?
का ’हे काम माझं नाही’ असं वाटणं? मी कर भरला आहे, मग ही सुविधा मला मिळायला हवी ही जाणीव?
का या कचर्याची सवय होऊन तो नजरेआड करायची लागलेली सवय?
का लोक काय म्हणतील म्हणून लाज वाटत असावी मला?
:)
आणि हसरे वाचक! असाच विचार दुसऱ्याच्याही मनी फुटावा हेही पोस्ट चे यश!
:)
क्या बात है अनघा ! अप्रतीम पोस्ट.
मला खूप आवडते, घर नीट नेटके आणि स्वच्छ ठेवायला.घरात आल्यापासून धूळ जास्त येते आधी इमारतीत इतकी येत नसे हे जाणवले.घराच्या मागील अंगणातील फुल झाडे आणि बाग स्वच्छ दिसावी म्हणून साफ सफाई जोरदार चालते माझी.तुझा लेख इतका बोलका आहे कि वाटले प्रत्यक्षात तू जेंव्हा असे केले असशील तेंव्हा तुला मिळालेले समाधान कसले जबरी असेल! तुझ्या बाबांनी केलेले संस्कार आणि त्यांचा प्रभाव ह्यामुळे नक्कीच अनेक प्रश्नांतून तू सहज मार्ग काढत असशील.स्वतःच्या घरासमोरचा रस्ता साफ असावा हि प्रत्येक नागरिकाची गरज आहे आणि प्रामाणिकपणे कर भरल्यामुळे हे सुख सहज प्राप्त हवे पण जसे तू म्हणालीस तसे,तुझ्या गाडी भोवती आणि खाली असलेला कचरा तू स्वतः साफ केलास ह्यात तुला काहीही कमीपणा वाटला नाही,उलट आनंद वाटला.हे वाचून काहीतरी शिकले.
तुझे लेख आवडतात.:)
Avadale. Ekunach sarv. :)
मीही असाच करतो. मज्जा येते ना बास मग.
अवांतर: आमचं घर पण असंच लख्ख असतं. पाहण्यासाठी आ/निमंत्रण बरं !
:-)
मस्त. छान पोस्ट :)
'कुठलाही बदल घडवून आणायचा असेल तर त्याची सुरूवात स्वत:पासून व्हावयास हवी हे नक्की'
Very True.
अनघा, :)
अंगण झाडणे हा माझा अत्यंत आवडता उद्योग आहे. इथे लॉन मोअर माझा सवत झाला असल्याने मौका मिळत नाही. पण घरी गेले की जितके दिवस मुक्काम असेल तितके दिवस ते काम मी करते. स्वच्छ झाडून सडा घातलेल्या अंगणात एक एक करुन प्राज्क्ताची फुलं पडताना बघणे म्हणजे सुखाचा स्वर्ग!
:)
maze baba hi sundar ghar jhadtat ani mala hi tyanchi ch savay ahe...me zadu marlyavar baba kadun wa taya...ase ekiyala ustuk asayachi ..
mast ch post
छान :)
Post a Comment