हळव्या चिमणीचं नक्की काय झालं ?
तिचं घुबड कधी झालं ?
वादळ आलं ? उल्कापात झाला ?
कोवळ्या चिमणीचं नक्की घुबड का झालं ?
व्हायचं ते झालं...
घडायचं तेच घडलं.
गळला एकेक दिस....
ढळलं एकेक पीस.
मऊ लोण्याचं शेण झालं...
गुलाबी रंगाचं मातेरं झालं.
बघताबघता ह्या चिमणीचं घुबड झालं.
तिचं घुबड कधी झालं ?
वादळ आलं ? उल्कापात झाला ?
कोवळ्या चिमणीचं नक्की घुबड का झालं ?
व्हायचं ते झालं...
घडायचं तेच घडलं.
गळला एकेक दिस....
ढळलं एकेक पीस.
मऊ लोण्याचं शेण झालं...
गुलाबी रंगाचं मातेरं झालं.
बघताबघता ह्या चिमणीचं घुबड झालं.
5 comments:
हं! मला चिमणीइतकचं घुबड पण आवडतं...:-)
त्यामुळे कवितेतून जे सांगायचं आहे ते बहुधा माझ्यापर्यंत पोचलं नाही!
:-(
नक्की काय खुपतंय... :(
चिमणीचे .. घुबड !!
हि संकल्पनाच अफाट आहे .
वेताळाच्या विकट हास्यातून निर्माण झालेले एक क्रूर स्थित्यंतर .....
nice...kavita suddha chaan lihites
Post a Comment