नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 28 November 2012

जाळपोळ

डोक्यात जाणारी माणसं वाढलीत.
आणि हृदयाची लोकसंख्या घटलीय.
म्हणूनच बहुधा डोक्यात राख घालून घ्यावीशी वाटते.
आणि वाटते हृदयाची करावी जाळपोळ.

6 comments:

रोहन... said...

मागेही तू एक जाळपोळ पोस्ट लिहिली होती न? आठवतंय मला. :)

rajiv said...

डोक्यात राख घालणे काय किंवा हृदयाची जाळपोळ काय... नुकसान आपलेच :(

Shriraj said...

Asa vatta khara ekekda... pan rajiv mhantat tase ajubajuchya rag annarya goshtinni apan svatahache ka nuksan karave... kutchi tari changli kalakruti apla hruday normal karta mhantat...

सौरभ said...

hmm... kharay... dokyat janari mansa layich vadhlit...

श्रिया (मोनिका रेगे) said...

अनघा, मला हा असा प्रश्न अनेकदा पडतो आजकाल कि ,सगळीकडे स्वार्थ वाढतो आहे आणि अर्थात त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो आहे. पुढे काय होणार?

ह्या तुझ्या चार ओळी खरे सांगताहेत.
माझ्या कामाच्या ठिकाणी कधी कधी हे असे अनुभव येतात, आणि मग मन सुन्न होते. पण आपण आपला स्थिरपणा, ढळू द्यायचा नाही हे मी ठरवून टाकले आहे. चार लोक जसे करतात तसे नेहमीच योग्य असते असे नाही न!

भानस said...

बयो जाळपोळही आपणच करायची आणि मग विझवतही आपणच बसायचे... शेवटी हात आपलेच पोळणार नं... :( :(

काळजी घे गं!