नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 21 November 2012

प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका.
कित्येक प्रश्न. त्या प्रश्नांना कुठलीही वर्गवारी नाही. एका वाक्यात उत्तरे द्या, सविस्तर उत्तरे द्या, गाळलेले शब्द भरा...असे काहीही नाही. फक्त प्रश्न.
आणि त्यातून सगळे सोडवलेच पाहिजेत असेही नाही. काही प्रश्न आपल्यासमोर फक्त मांडण्यात आले आहेत, मात्र ते आपण सोडवायचे मात्र नाही आहेत अशी पुसटशी देखील कल्पना दिली जात नाहीत.
मी मात्र सगळेच प्रश्न गांभीर्याने सोडवू पहात होते.
काही प्रश्न काळ सोडवणार आहे व काही थोडेच मी सोडवायचे आहेत हे आधीच कळू शकलं असतं तर कदाचित आयुष्य जगणं थोडं सोपं झालं असतं.
उगाच दिवस उलटतात, महिने सरतात आणि वर्षे निसटतात.
आणि मग मागे वळून बघितल्यावर जाणवते...

...तो प्रश्न मी कधी सोडवूच शकले नाही.
आणि तो कधी सुटलाच नाही.

कोवळ्या वयात कल्पना फार भराऱ्या वगैरे घेतात.
उगाच आत्मवल्गना स्वत:च्याच मनाशी, स्वत:बद्दलच्या.
आयुष्य संपता संपता सगळाच भ्रमनिरास होतो.

आणि हे सगळे इतके कठीण प्रश्न मी सोडवायचे आहेत का ?....ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर मिळते.

कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी द्यावयाचेच नव्हते.

परीक्षेला 'काळ' बसला होता !

15 comments:

रोहन... said...

मजेत : चला.. आमच्यासाठी रेडी रेकनर. ;)

गंभीर : तुझी खूप मदत होते बघ. :) तुझ्या कळत-नकळत. :)

हेरंब said...

>>परीक्षेला 'काळ' बसला होता !

You said it !!!

भानस said...

हे आधीच कळलं असतं तर जगणे सपाट झाले असते कदाचित...

बाकी परिक्षेला ' काळच ' बसतो आपण केवळ निमित्तमात्र!

Shriraj said...

Publius Syrus la prashnanbaddal ase vatayche ki - "it is not every question that deserves an answer". Attach sapadle mla hey vakya. Kiti yogya ahe na!

Anonymous said...

>>>>परीक्षेला 'काळ' बसला होता ! ..... ++

Suhas Diwakar Zele said...

परीक्षेला 'काळ' बसला होता !!!

निव्वळ अल्टीमेट :)

Mahendra Kulkarni said...

आत्मवल्गना स्वत:च्याच मनाशी, स्वत:बद्दलच्या.
आयुष्य संपता संपता सगळाच भ्रमनिरास होतो.
.... काय मस्त ओळी आहेत.. वाह!

अपर्णा said...

परिक्षेला "काळ"च बसला होता...
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

Unknown said...

परीक्षेला काळ बसला होता....Super Sentence Mamma!!

Abhishek said...

कपाळावर सटवाई लिहिते म्हणतात, ह्या परीक्षेची उत्तरपत्रिका तीच असावी. आणि प्रश्ना-उत्तरांच हे इंगित आयुष्यात आधीच उमजल तर 'सरप्राईज' चे किती तरी क्षण उपभोगायला राहतील का? मागे वळून पाहतांना 'त्या' काळाला(!) मिस्स करण ह्यातच खरी गोडी असावी, अपूर्णत्वासारखी, अर्थात इति निसर्गनियम.

नेमक आजच केल्विन पण असा आहे...
http://www.gocomics.com/calvinandhobbes/2012/11/22
छोटासा पण पुरून उरणारा (की उरून पुरणारा)लेख :)

BinaryBandya™ said...

आत्मवल्गना स्वत:च्याच मनाशी, स्वत:बद्दलच्या.
आयुष्य संपता संपता सगळाच भ्रमनिरास होतो.

mastch :)

Panchtarankit said...

परीक्षेला काळ....
खल्लास

सौरभ said...

>>परीक्षेला 'काळ' बसला होता !

You said it !!!

+1 (c) AN

Dhaval Ramtirthkar said...

superb thought Anagha

Dhaval Ramtirthkar said...

superb thought Anagha