टूर'की'...भाग १
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३
टूर'की'...भाग ४
टूर'की'...भाग ५
टूर'की'...भाग ६
इस्तान्बुल मधील दुसरा दिवस. सकाळी हॉटेलबाहेर पडताना मॅनेजरला विचारले होते. ग्रॅन्ड बझारला कसे पोचायचे ? बाहेर पडा, उजवीकडे वळा....चढ चढा. चालत रहा. जिथे पोचाल तो ग्रॅन्ड बझार. बाहेर पडलो आणि एका सेकंदात दोघी मागे फिरलो. मी लोनली प्लानेटमध्ये वाचलं होतं, ग्रॅन्ड बझार १४५५ मध्ये बांधला गेला होता. व तिथे शतकानुशके दुकाने वाढत गेलेली आहेत. GPS शिवाय तिथे फिरणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. माझी लेक ही माझी GPS सर्विस आहे. मुंबईत, किंवा कुठेही. मला रस्ते कधी कळत नाहीत आणि ते लक्षात देखील रहात नाहीत. सुरवातीला काही वर्षे मला माझा एक भाऊ ऑफिसला सोडायला येत असे. आणि घ्यायला. मग त्याने जो काही रस्ता आखून दिलेला असे, मी त्याच रस्त्याने येत असे. उगाच ही वेगळी गल्ली, तो सुंदर रस्ता ही अशी काही धाडसे करण्याच्या फंदात मी कधीही पडत नाही. मला आठवतंय, शाळेत असताना एकदा प्रभादेवीला मुख्य रस्त्यावर मी हरवले होते ! आमचं घर तिथून दहा मिनिटांवर ! पण तरी देखील मी हरवले!
"ह्या आपल्या हॉटेलच्या परिसराला काय म्हणतात ?" लेकीने आमच्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारले. त्यावर त्याचे जे काही उत्तर होते ते लक्षात रहाणे सहज शक्य नव्हते. मग तिने तिथलाच एक कागद उचलला आणि त्यांच्या हातात दिला. "Will you please write it on this ?" त्याने जे काही लिहिले त्याचा मराठीत तरी उच्चार हा असा होता... सेंमबरलीतास !
कागद खिशात घातला. आणि मग लागलो आम्हीं रस्त्याला.
ग्रॅन्ड बझार. १४५५ मधील थंडीच्या दिवसांत ह्या बाजाराचे बांधकाम प्रथम सुरू झाले होते. येथील बांधकामाचा अभ्यास केल्यावर त्याचे साधर्म्य १५ व्या शतकाच्या दुसऱ्या पर्वात सापडते. बेन्झेन्टाइन काळात इथे गुलामांची विक्री होत असे. संपूर्ण बाजाराला अनेक प्रवेशद्वारे आहेत. म्हणे १५४५ साली सुलतान सुलेमानने इथे अजून एक बाजार बांधून घेतला. अनेक लोकांनी आपली दुकाने टाकावयास सुरवात केली आणि मग कालांतराने पूर्वी वेगवेगळे असणारे हे दोन बाजार एकमेकांत मिसळून गेले. सतराव्या शतकाच्या आसपास सध्या उभा असलेला बाजार उभा राहिलेला होता. ह्या देशाविषयी काहीही वाचायला घेतले की अगदी तीनशे साली, चारशे साली...असे आकडे आपल्या समोर येतात ! बाजारात फिरताना भरभरून दिसत होते ते गालिचे, काचसामान, दागदागिने. इथे पैशांची घासाघीस केलीच पाहिजे हा नियम देखील मी वाचलेला होता. म्हणजे कॉलेजच्या दिवसांतील मुंबईमधील फॅशन स्ट्रीटने गिरवून घेतलेले हे कौशल्य इथे कामास येणार होते ! तसेही आम्हांला शॉपिंग करायचे नव्हतेच ! युरो X टर्किश लिरा = रुपया...हे गणित एकूणच कठीण व मानसिक छळ करणारे ! त्यामुळे पाय मोकळे करावयास निघाल्यागत, गल्ल्यागल्ल्यांतून रिकामटेकडे फिरणे आणि इथेतिथे उगाच डोकावणे, ह्यापलीकडे तसा काही उद्योग नव्हता.

एक सुंदर पर्स अगदी मनात भरून गेली. म्हणजे लेकीने अगदी खांद्यावर अडकवली. मी अगदी कौतुकबिवतूक केलं. वा वा सुंदर. हिंदुस्तान म्हटल्यासरशी त्याने आम्हांला विचारलं..."You know Tabbu ?" आम्हीं हसून माना डोलावल्या. त्याने लगेच वर भिंतीकडे बोट दाखवले. आम्हीं बघितले तर होत्या तब्बू बाई...फोटोत. ह्या दुकानदाराबरोबर. तिने म्हणे त्या दुकानातून चार बॅगा घेतल्या होत्या. एक अशी...एक तशी...आणि दोन अशातश्या ! असेल बाई ! लेकीला आवडलेल्या बॅगेचा आम्हीं तोंडी गुणाकार केला. मराठीत. उत्तर होतं चार हजार रुपये. मी काही बोलायच्या आत बॅग पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. ऐटीत.
दुसऱ्या दुकानात आम्हीं शिरलो. एक निळीशार नक्षीकाम असलेली प्लेट विकत घेण्याचा मी विचार केला. इथले एकूणच दुकानदार सगळे अगदी नम्र, आणि वाचा मृदू. 'Where are you from ? ह्याचे उत्तर आम्हीं दिले की एकूणच सलमान खान, शाहरूख खान असे संभाषण सुरू होत होते. मी घासाघीस सुरू केली. मात्र तो दुकानदार दोन मिनिटांसाठी बाहेर केला असता लेक माझ्या कानात कुजबुजली...बस झालं हा आई तुझं ! घे आता काहीतरी !"...म्हणजे एकदम माझ्या देशाचं नाव नको खराब करूस...असं काहीसं ! म्हटलं, घेतेच आहे गं मी ! मी आपली माझी 'last price' सांगितली. म्हणजे असं आपण दुसरच काहीतरी बघतोय असं करायचं आणि त्याला अशी अगदी खालची किंमत सांगून टाकायची ! तो मनमिळाऊ, नम्र दुकानदार हसला आणि मान डोलावून म्हणाला..."You got a good deal Mam ! You negotiate very well !" लेकीच्या तोंडाकडे बघून मला कळेचना...की हे माझं कौतुक झालंय...की कसली बाई कंजूष आहे...असं हा मनातल्या मनात म्हणतोय !
असो...

खरेदी केलेल्या चारपाच छोट्या गोष्टी, एका लहानश्या हॉटेलमध्ये 'चिकन शॉवरमा.
संपला आमचा 'ग्रॅन्ड विहार' ! लेकीने एकदा पुढे, एकदा मागे वळून बघितलं. दहा मिनिटांत, बझारच्या खोलवर गेलेलो आम्हीं, सकाळी ज्या बोळातून आत शिरलो होतो बरोब्बर त्याच बोळातून बाहेर आलो !
हॉटेलच्या रस्त्याला लागलो तेव्हा आमची पोटं भरलेली होती. मात्र आमच्या रत्यावरल्या एका छान हॉटेलचा आणि त्याच्या साठीच्या आसपासच्या अतिशय मधुरभाषी मालकाचा आम्हांला कालच शोध लागला होता. त्याने बाहेर रस्त्याला लागून पदपथावर छोटी टेबले टाकली होती. पाच सहा पायऱ्या उतरून आत जायचे, तिथे ठेवलेल्या पुस्तकांमधील आपल्याला हवे ते पुस्तक उचलायचे. आरामात बाहेर बसायचे. पुस्तक वाचतावाचता आम्हीं तिथे फस्त केले...पिस्ताचीयो.

गेल्या महिन्यात तुर्कस्तानात सूर्य धीम्या गतीने सरकत होता. कधी मनाला येईल त्यावेळी आकाशातून नाहीसा वगैरे होत होता. नऊच्या आसपास. बालपणापासून मी कायम सूर्याला समुद्रात डूबताना बघितलेलं होतं. इथे नेमकं उलट. समुद्र एका दिशेला आणि सूर्य त्याच्यावर रुसल्यासारखा दूरदूर सरकत कुठे भलतीचकडे. म्हणजे अगदी एखाद्या इमारती मागेबिगे. इमारतीच्या मागे जाऊन लपण्यात कसली मजा ? मात्र काळोख लवकर पडत नसे. ते आमच्या पथ्यावर पडलं. रस्त्यावर फिरण्यास तशी काही भीती वाटत नसे. एकदा दोनदा 'eve teasing' चा अनुभव आलाच. तरुण टवाळखोर कुठे सापडत नाहीत ? Indian ? Indian ?...आणि मग त्यांच्या मातृभाषेत काहीबाही. हे त्यांचं बोलणं कदाचित असभ्य असेलही. परंतु, ते आम्हांला न कळणाऱ्या भाषेत असल्याने 'एका कानाने ऐकावे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावे ' हे आचरणात आणणे तेव्हां सहज जमून गेले ! त्यातूनही ह्या अशा लोकांचे आपण काय करायचे असते ह्याचे शिक्षण आपल्याला अक्कल आल्यापासून असतेच. तिथे आणि दुसरं काय करणार ? तरुण तुर्क...दुर्लक्ष.
चारच्या सुमारास लेकीच्या डोक्यात काही वेगळेच आले. आम्हीं दोघींनी आपापली पुस्तके उचलली. मी माझा कॅमेरा घेतला. समुद्राच्या दिशेने चालण्यास सुरवात केली. अर्थात मॅनेजरला आधी रस्ता विचारून. दुरून समुद्र दिसू लागला. भर दुपारी तुर्कांचा मासळी पकडण्याचा उद्योग चालूच होता. ही लोकं कामावर कधी जातात ? हे असे दिवसभर इथे मासे का पकडत बसतात ? असे एकदोन प्रश्र्न मनात उद्भवले. आम्हीं एक छानसं झाड बघितलं. मायलेकी पाय पसरून मस्त हिरवळीवर बसलो. समोर समुद्र. लेकीने तिचं पुस्तक उघडलं. मान त्यात खुपसली. मी इथेतिथे बघितलं. कॅमेरा चालू केला. गुढघे दुमडून त्यावर स्थिर विसावला. कॅमेऱ्याच्या डोळ्याने बघावयास सुरवात केली. जाणवलं...दूर, माझ्या कॅमेऱ्यासमोरून वेगवेगळी माणसं फिरत होती. कोणी उजवीकडून डावीकडे. तर कोणी डावीकडून उजवीकडे. कधी एखादं जोडपं...तर कधी एखादं चौकोनी कुटुंब. मी क्लिक करत गेले...त्यांना टिपत गेले. तुर्क मला प्रेमळ व कुटुंबवत्सल दिसला.
संध्याकाळी सातच्या आसपास बाहेर पडलो ते थेट अरिस्ता बाजाराच्या दिशेने. हा थोडा श्रीमंत बाजार. इथे दिसणारे गालिचे उंचीचे. रस्त्यावर सुबत्ता. दोन्ही बाजूंची हॉटेल्स अधिक देखणी. जालावर शोध घेताना ही हॉटेल्स का बरं सापडली नसतील..असा विचार मनात चमकून गेला. संध्याकाळ काही वेगळीच होती. कालची निराळी आजची आगळी. आता अंधार पडत होता. रस्त्यावर पर्यटक फिरत होते. आज आमच्या डोक्यात होते गिरक्या घेणारे दर्विश. इथे रोज एका हॉटेलमध्ये संध्याकाळी दोन कार्यक्रम होतात. बरेच पर्यटक तिथे येऊन हुक्क्याचा आस्वाद घेत, बोर्ड गेम खेळतात. आम्हीं तिथे पोचेस्तोवर पहिला कार्यक्रम नुकताच संपला होता. दुसरा रात्री दहा वाजता सुरू व्हायचा होता. तेथून बाहेर आलो. काहीही न ठरवता रस्त्यावर चालायला सुरुवात केली. दहा वाजता इथे परतायचे इतकेच निश्चित. चालताचालता पोटपूजा. एका हॉटेल बाहेर ताजे चकचकीत मासे शोभेसाठी ठेवलेले दिसत होते. ह्याहून चवदार दुसरे काय असणार ? रस्त्यावर टेबले टाकली होती. त्यातले एक आम्हीं दोघींनी बळकावले.
सगळे वातावरण मन रिकामे, हलके करणारे. रोजच्या सारखा कुठलाही जटील प्रश्र्न डोक्यात अडकलेला नव्हता...शांत निवांत. डाव्या बाजूला छोटी स्टूल्स घेऊन तीन वादक गायक बसले होते. आपल्या कौशल्याने लोकांचे मनोरंजन करीत. आपल्याला हवा तो मासा निवडून आपल्या टेबलापाशी आलेल्या वेटरच्या हाती सुपूर्त करायचा. थोड्याच वेळात त्यांनी शिजवून आणलेला तुर्क मासा आपण चवीचवीने फस्त करावयाचा...ही संकल्पना. लेकीने मोठ्या प्रेमाने एक मासा निवडला....तितक्याच प्रेमाने माश्याला आत नेण्यात आलं. आणि इतक्यात वादकांनी आजच्या त्यांच्या भारतीय श्रोत्यांसाठी सुरु केलं ते हे गाणं...
दहा वाजत आले होते. आम्हीं हॉटेल Mesle पाशी पोचलो. कार्यक्रम अजून सुरू झाला नव्हता. मंच रिकामा होता. कोणी हुक्का पीत होतं. कोणी बोर्ड गेम खेळत होतं. तो काय खेळ आहे हे त्यांना विचारायचं माझ्या मनात खूप होतं. पण हुक्का ओढत बसलेल्या दहाबारा तरुणांजवळ जाऊन हा प्रश्र्न विचारण्याचे धैर्य नाही झाले. लगेच कॅमेरा बाहेर. मी इथले तिथले फोटो काढत होते. "आई, सुरू होतंय हं." समोर मंचावर दोन माणसे येऊन बसली होती. समोर माईक. हलकेच गाणं सुरू झालं. गाण्याला शब्द होते. पण अर्थ नव्हता. बऱ्याचदा अनाकलनीय भाषेतील गाणी अधिक आनंद देऊन जातात. उगाच अर्थात न अडकता त्यातले सूर आपल्याला गुंतवून टाकतात म्हणून असावे कदाचित. इतक्यात एक लांब बाह्यांचा पायघोळ झगा घालून मध्यम अंगचटीचा माणूस पुढे आला. मंचावर चढून मांडीपाशी दोन्ही हात एकत्र बांधून शांतपणे उभा राहिला. हळूवार संगीत सूर झाले. त्यात खोल आवाज मिसळला. दर्विश हलकेच गिरकी घेऊ लागला. एक...दोन...तीन...चार....अनेक...असंख्य...गोल..गोल....तो अनुभव एक धुंदी चढवणारा होता. आपण जरी एका जागेवर स्थिर असलो तरीही ते संगीत...उजवा हात आकाशाकडे झेपावणारा...डावा हात पृथ्वीशी नाते जोडणारा...आकाशातील देवाकडे आराधना करताना....पृथ्वीवरील भौतिक सुखांना नाकारणारा...काळाचे बंधन गिरकीसहित झुकारून देणारा....दर्विश. ती हालचाल....ते संगीत सर्व काही भारून टाकणारे होते...दहा मिनिटे एक टप्पा...दुसरा....तिसरा...
उगाच बालपणीचं...गोल गोल राणी...इतकं इतकं पाणी...आठवलं. चार गिरक्या काय नाही झाल्या की आम्हीं धाडकन जमिनीवर पडत असू. आणि कधीतरी नाहीच पडलो तर खोलीत गोलगोल करत भिंतीवर नाहीतर दारावर धाडकन आपटणे चालू असे. किती टेंगुळं आणि किती काय !
समोर हुक्का नाही पण टर्की चाय होता. माझा कॅमेरा व्हीडियो रेकॉर्डींग करीत सुटला होता. एकामागोमाग एक...
एक तास उलटला. दर्विश वाकून प्रेक्षकांचा निरोप घेऊन दिसेनासा झाला. आम्हीं देखील निघालो. चालत आमच्या हॉटेलपर्यंत जायचे होते. काळोख पडला होता. हॉटेल तिथून वीस मिनिटांच्या अंतरावर होते. आम्हीं चालायला लागलो. रस्ता निर्मनुष्य झालेला होता. चिटपाखरू रस्त्यावर दिसत नव्हते. दूरवरून समुद्र पक्षाची साद ऐकू येत होती. पक्षी कुठेही दिसत नव्हते. फक्त आसमंतात मधूनच टिपेला पोचणारा आवाज. एक भीती मनात शिरू बघत होती. मात्र तिला एकदा मनात प्रवेश करू दिला तर ती उगा भलभलते विचार उद्दीप्त करेल ह्याची खात्री होती. पुन्हां मला रस्ता ओळखता येत नाही हे आहेच. लेकीने पटापट पावले उचलली. तिच्याबरोबर मी.
पहाटे चारच्या सुमारास हॉटेल सोडावयाचे होते. ओनुर एअर. इस्तान्बुल ते अन्ताल्जा. पावणे आठचे विमान.
तीन रात्री. दोन दिवस. शहर सोडायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता.
आम्हीं भूमध्यसमुद्राच्या दिशेने निघणार होतो. एका छोट्या गावाकडे.
गाव चिराली.
क्रमश:

15 comments:
छान चालू आहे. येऊ द्या, येऊ द्या.
गेले अनेक दिवस मी तुमचा ब्लोग नियमितपणे वाचत आहे. एक शंका अशी की, एवढा चांगला साहित्य तयार करत आहात तर तितकीशी चांगली ब्लोग सेवा का बुआ नाही वापरत. म्हणजे माझा रोख, ब्लोगर सोडून वर्डप्रेस वर जाण्याच्या संदर्भात आहे ! :)
:)
"गुलामांच्या विक्रीपासून ...पर्स च्या विक्री'पर्यंतची सैर मला तर एकदम छान अनुभव देऊन जात्ये .
"इथले एकूणच दुकानदार सगळे अगदी नम्र, आणि वाचा मृदू." यांना मराठी मुलुखात येण्याचे आग्रही आमंत्रण देऊन आलीस न ?
'भुकेल्या पोटी बुद्द्धी काम करीत नाही असे म्हणतात' यावरील उत्तम उपाय तुर्कांनी उपलब्ध केलाय तर.. एकाचवेळी पोटाला व बुद्धीला खाद्य...मस्त ..सुंदर !!
एकदंरीत काय.. तुझ्या ह्या अनुभवांचे लिखाणाच्या जोरावर आम्ही इतर परिचीतांसमोर.. 'टर्की'बाबत 'टूरटूर' करणार :)
‘चिकन शॉवरमा', लेकीने मोठ्या प्रेमाने एक मासा निवडला....तितक्याच प्रेमाने माश्याला आत नेण्यात आलं.
जल्ला मेला. इथं डायजिन/इनो शोधावी लागेल आता मला.
सर्व माहिती नीट एकत्रित करून ठेव मला लवकरच लागणार आहे. :)
मस्त चाललंय... वाचतोय...
तुमच्यासाठी वाजलेल गाणं मस्त होतं. आवारा हुं ची आठवण झाली. आणि गिरकी पाहून "ख्वाजा" ची.... खूप सुंदर प्रवास चालू आहे तुमचा, मी स्वत: टर्की पाहिल्यावर इतका आनंद नसता मिळाला जितकं हे वाचून मिळतोय :)
हर्षल, बाकी काही कारण नाही...ब्लॉगरची सवय झालीय इतकंच ! :) आणि आभार...वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
विद्याधर, :D
राजीव, मला ते नाटक आठवलं...टूरटूर...आणि त्यातलं गाणं...टूर निघाली...टूर निघाली.... ऐकलयत का तुम्हीं ?? :) :)
पंकज, तू बरोब्बर खायचे पदार्थ वेचतोयस ना ?? :) :)
रोहणा, आता पेट्रा ! :p
हेरंबा, नाही वाचलंस तर छळणार नाही का मी तुला ?! :p :) :)
इंद्रधनू, खूप खूप धन्यवाद गं !!! :) :)
आपल्याला तो सुफी डान्स लईच भावलाय. मेरेकु इमोसनल कर देता है... }:)
Post a Comment