नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 25 December 2011

Slipping through my fingers...

ते छोटसं बाळ...त्या केसांच्या झिपऱ्या...दोन दोन शेंड्या...शाळेचा गणवेश...आईला सोडून दोन तास शाळेत जावं लागणार म्हणून गोबऱ्या गालांवर ओघळणारे ते चमचमणारे अश्रू...शाळेच्या दरवाजाकडे टक लावून माझी वाट बघणारे ते टपोरे डोळे...मी दिसल्यादिसल्या माझ्याकडे धावत सुटणारी चिमुकली पावले...दोन अक्षरी इंग्लिश स्पेलिंग दिवसभर घोटणारं आणि येत नाही म्हणून कावरंबावरं झालेलं ते बाळं मन...एव्हढ्या मोठ्या कागदावर छोटीशी नाव काढली म्हणून तिला नापास करणाऱ्या तिच्या चित्रकलेच्या सरांशी मी जाऊन भांडले की खुष होणारी ती माझी लेक...जीवतोड मेहेनत करून महाराष्ट्र जिल्ह्यात बॅडमिंटन खेळात सिडींग मिळवणारी माझी लेक...खांद्याच्या दुखापतीमुळे बॅडमिंटन सोडून द्यावे लागल्याचे दु:ख पेलणारी माझी लेक...अनेकदा स्वत: वेडेपणा करून देखील तावातावाने माझ्याशीच भांडणारी माझी लेक...परदेशात जाऊन अभ्यास करणारी माझी लेक...आजोबांसारखाच अभ्यासाचा हव्यास असलेली माझी लेक..."आई, माणसे वाईट नसतात...परिस्थिती वाईट असते"...हे असे सहजगत्या मला सांगणारी माझी लेक...आयुष्याचे टक्केटोणपे माझ्याबरोबर खाणारी माझी लेक...

कन्यादान शब्द चुकीचा वाटतो....कन्या आहे ती माझी...तिचे दान का बरे मी करावे असेच वाटत रहाते...
मुलगी झाली तेंव्हा मलाच काय, सगळ्याच आयांना माहित असतं...हे आपलं कुकुलं बाळ एक दिवस मोठं होणार...आणि उडून जाणार.
मुलं देखील मोठी होतात आणि पंखांत बळ आलं की बाहेरच्या जगात उडून जातात..परंतु, मुलगी दुसऱ्या घरी जाणं हे काही वेगळंच.

किती वेळा बघितला तरी मन न भरणारा 'ममा मिया' आज आम्ही दोघींनी पुन्हां बघितला....

...मेरील स्ट्रीपची लेक लग्नाला उभं रहायला निघाली...नट्टापट्टा करायला तिच्यासमोर बसली...आणि डोळे वाहू लागले...कितव्यांदा कोण जाणे. बाबा आईला नेहेमी सांगत असत...मुलींना हवे ते खायला घाल...काय माहित सासरी आवडीचं खायला मिळेल की नाही...मुलींशी बोल...गप्पा मार....आईला कधी तिच्या नोकरीत गप्पा मारायला वेळ मिळाला नाही...आणि अर्थात तसा तिच्या स्वभावही नव्हता.
पण हे मेरील स्ट्रीपचे तिच्या मुलीशी असलेले नाते अगदी पार मला इथे मुंबईत पटते...आणि मी तिच्याचसारखी तिच्याचबरोबर माझ्या पोरीच्या बालपणात पोचते...
मीच कशाला...माझी लेक आणि मी...आम्हीं दोघी पोचतो...उड्या मारत...हसत खेळत...

...मन आईचे...देशात काय आणि परदेशात काय...सगळीकडे सारखेच...डोळ्यात पाणी आणणारे...

'ममा मिया'तील मायलेकी...
http://www.youtube.com/watch?v=BbPsVknvg0Y&feature=related


22 comments:

Shriraj said...

मी अजून पाहिलेला नाही हा चित्रपट. कधी पाहायला मिळेल तेव्हा नक्की पाहीन :)

बाकी आधुनिक आईच्या आणि अत्याधुनिक लेकीच्या जगण्याबद्दलचे तुझे विचार मनाला भिडणारे आहेत.

Gouri said...

मामा मिया बघायचाय अजून ...
आई आणि लेक हे नातं कुठल्याही ऍंगलने बघ ... डोळ्यात पाणी उभं करतंच! आणि कन्यादान शब्दच काय कन्सेप्टपण एकदम अमान्य. ती काय तुमच्या मालकीची वस्तू आहे उचलून कुणाला द्यायला?

Yashwant Palkar said...

गोबऱ्या गालांवर ओघळणारे ते चमचमणारे अश्रू.

khup chan lihil aahes...

movie nakkich pahayala hava...

Soumitra said...

Anagha,
This article took me to my future may be after few years from now , that feeling of leaving daughters is soooooo bad na. you have written this so well, its like I could see my lovely daughters leaving me one day after their marriage,

Anagha said...

श्रीराजभाऊ, तुम्हांला कन्यारत्न झालं ना की कळेल मी काय म्हणतेय ते ! मग येतील अधूनमधून डोळे भरून ! :)

rajiv said...

अनघा ... का परीक्षा घेतीयस ..अग कानात नाहीतर इअरफोन मध्ये तिची बडबड नसेल तर उजाडता दिवस पण मावळल्यासारखा होतो .. :(
त्यातच तिच्या पाठवणीची फिल्म पण दाखवलीस ...झाले ..मग काय संपलेच होते सारे वाचत असताना... :"(
८ महिन्यांची पोर गाडीत एकटी शेजारच्या सीटवर बसल्यापासून..ते ..कानावर येणाऱ्या प्रत्येक आवाजातील ताल शोधून तो फक्त आपल्याला त्यावर पाय हलवण्यासाठी व कालांतराने त्यावर थिरकण्यासाठीच वाजवला जात आहे हिच खात्री बाळगणारी मूर्ती उभी राहिली !!

जावयाला बायको बरोबर सासरा 'फ्री' नाही मिळाला तरच नवल :)

Anagha said...

अगदी अगदी गौरी ! ते असे कोणाचे आईबाबा बघितले ना कन्यादान करताना...की मला एकदम रडायला कारणच मिळतं ! :(
:)

Anagha said...

यशवंत, नक्की बघ...मात्र आयुष्यातील नियम डोक्यात घेऊन नको बघूस....मग नक्की आनंद मिळेल. :)

Anagha said...

सौमित्रा, रडवलं वाटतं मी तुला ! :D
दोघीदोघी जायच्यात नाही का तुझ्या....हम्म्म्म... मला बोलाव हा लग्नाला ! मग मी तुझे फोटो काढेन ! :p :D

Anagha said...

राजीव, मला माहितेय लेक तुमची किती लाडकी आहे ते ! :)
सगळ्या मुलींच्या बाबांना आज रडवलंय मी बहुधा ! :D
जावयाला सासरा फ्री ! :D :D हाय राम ! लेक पाठवून देईल हा तुम्हांला परत तुमच्या घरी ! "बाबा ! काय झालंय तुम्हांला ?!" असं ओरडेल तुम्हांला ! :D

Raindrop said...

I don't know why but everything you wrote sounded sooooo true....only one fact was different for me...mother-daughter na asun he sagla majhya life madhe father-daughter asa ghadla....mother-daughter naata ke kitti nazuk asta,,,,you have portrayed it so well.

Anagha said...

हे असं नातं...माझंही माझ्या बाबांबरोबरच होतं...बऱ्याचदा मुलींना वडील अधिक जवळचे वाटतात...हो ना वंदू ? :) माझ्या लेकीला विचारून बघ....कोणावर जास्त प्रेम करते ती ते...तिच्या बाबाचंच नाव घेईल ती !! आणि मग मी उगाच भांडत बसेन तिच्याशी ! :D :D

Prof. Narendra Vichare said...

अनघा,
आमच्या कीर्ती च्या लग्नात तिची पाठवणी करताना आधी तिची आई कोसळली होती आणि नंतर मी कोलमडलो होतो.... ती घटना पुन्हा डोळ्या समोर उभी राहिली. निव्वळ मुलगी आणि वडील यांच्यातील तरल नात्यावर कोणी चित्रपट का काढीत नाहीत ? आईला होणाऱ्या वेदना, ती लपवू शकत नाही म्हणून लोकांना दिसतात. परंतु आतल्या आत ढेपाळलेला आणि रडणारा बाप कोणाला दिसत नाही... नाही का ?
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे तुझे निसटून
उरे काय तुझ्या माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं ||

सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये ?
ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला, ला..
ला ला ला ला, ला.. ला ला ला ला, ला.. ||

BinaryBandya™ said...

...मन आईचे...देशात काय आणि परदेशात काय...सगळीकडे सारखेच...डोळ्यात पाणी आणणारे...

छान लिहलंय ..

सुप्रिया.... said...

अनघा वाचून काय वाटलं सांगू,

मन आले हे भरुन,माहेराच्या आठवाने
मायेच्या कुशीसाठी,असे सैरभैर झाले..
मन पाखरावानी,इथतिथ भरकटते,
माहेराच्या ओढीने,डोळा आसू दाटवते....

कन्यादान होतानाच नाही ग... मम्मी-पप्पांची आठवण आली कि डोळ्यात पाणी येतच कुठल्याही लग्न झालेल्या मुलीच्या...मी स्वतः...जेव्हा जेव्हा मुंबई वरून पुन्हा बंगलोर ला परतायचं असत तेव्हा पोटात गोळा येतो...खूप पोकळी निर्माण होते मनात आणि रडू येत.... लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला अन तिच्या घरच्यांना असच वाटत असाव.... :(

कधी कधी लग्न करून मुलीने मुलाच्या घरी जाव ह्या कन्सेप्टच पटत नाही :P ;)

हेरंब said...

'ममा मिया' जाम फेव्ह आहे माझा.. गाणी तर कसली तुफ्फान आहेत त्यातली. !!

बाकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणं मला शक्य नाही !! :(

Anagha said...

खरंय सर, मला माहितेय...माझ्या लेकीची पाठवणी शरदला माझ्यापेक्षा जास्ती नसती झेपली...हो ना ? :'(
...आणि ही कविता ?? कोणाची ???

Anagha said...

बंड्या, धन्यवाद रे. :)

Anagha said...

सुमेधा, :) मला सांगत असतात हल्ली सगळे...घरजावई करून घे म्हणून ! आणि मी म्हणते..."पायावर धोंडा पाडून घ्यायची माझी हौस पूर्ण फिटलीय !!" :p :D

Anagha said...

हेरंब, खरोखर कसला घेतलाय तो सिनेमा ! मस्त मस्त!
आणि का बरं...एका घरातली कन्या घेऊन नाही का गेलास तू स्वत:च्या घरी ?! मग ? बोलू शकतोस तू बाकीच्या पोस्टवर देखील ! अगदी अधिकारवाणीने ! :)
आणि लेकाला सोबत म्हणून एक कन्यारत्न पण आणू शकतोस ! :p :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

फार भारी पोस्ट झालीये.

Anagha said...

:) धन्यवाद पंकज.