काही नळ असे असतात की ते तुम्हीं चालू केलेत तर त्यातून फक्त गढूळच पाणी येऊ शकते.
कारण त्या पाण्याचा साठा जिथे आहे ते उगमस्थान मुळात गढूळलेले असते. कधी एकाच जागी राहून तुंबलेले...त्यावर शेवाळ जमू लागलेले. तर कधी विविध प्रकारच्या गरज नसलेल्या वस्तूंनी भरून गेलेले. तेथील आसमंतात एक प्रकारचा कुबट वास भरून राहिलेला असतो. तो जलसाठा असा नसतो, ज्याच्या काठाशी दोन क्षण विसावावे...आणि मनावरचे मळभ दूर होऊन जावे.
मग जर उगमच नासका तर त्यातून निघालेले पाणी कोणा वाटसरूची तहान कशी भागवणार ?
मग जर उगमच नासका तर त्यातून निघालेले पाणी कोणा वाटसरूची तहान कशी भागवणार ?
अशी माणसे आपल्या आयुष्यात येतात. आणि कधी टाळता न येण्यासारखी असतात. आपल्या मेंदूचा ती नाश करू लागतात. म्हणजे हे नकळत चालू असलेली विषबाधाच म्हणायची. काय हे सर्व ते जाणून बुजून करतात ? नाही. परंतु, नकारघंटा त्यांच्या डोक्यात सतत घणघणत असते. ती ते नाही थांबवू शकत. आणि आपल्या कानावर त्याचा कटू नाद येतच रहातो...आपली इच्छा असो वा नसो.
नळाची उपमा. त्याला नकारघंटेचा नाद.
कचेरीतील सहकाऱ्यांचे दोन गट पाडू शकतो का ? शत्रू वा मित्र. सगळ्यांशी आपण काही मैत्री करू शकत नाही पण त्यामुळे ते आपले शत्रू बनत नाहीत. परंतु, त्यांच्याबरोबर काम तर करावेच लागते. कधी त्यांची जबाबदारी तुमच्यावर टाकली जाते. कारण त्यांना बडतर्फ केले जाईल अशी परिस्थिती असते. हे असे घडू नये असे आपल्याला मनापासून वाटत तर असते. परंतु मग त्यांना वाचवता वाचवता आपण आपला मेंदूच किडींसाठी उघडा करून ठेवला आहे की काय अशी शंका येते. म्हणजे हळूहळू नकारात्मक विचारांची कीड, आपला मेंदू पोखरू लागेल...आणि अकस्मात लक्षात येईल, ताटलीतील मेंदू संपत आलेला आहे. ते गढूळ पाणी पिऊन पिऊन शरीरात विष पसरत जाईल आणि मग ज्या सकारात्मक विचारांच्या बळावर उभे रहाण्याची ताकद हे शरीर मिळवत आले आहे तीच ताकद एक दिवस शरीर गमावून बसेल.
एकाच मिटिंग वरून आम्ही दोघे परत येतो. आणि आमच्या दोघांच्या बॉसला, काल क्लायन्टबरोबर झालेल्या मिटिंगविषयी सांगत असतो. आणि इतिहासाची पुनरावृत्ती घडू लागते.
कालच्या चर्चेतील घटना मी सकारात्मक मांडून सांगत असते. माझा सहकारी तीच गोष्ट पूर्ण नकारात्मक दृष्टीकोनातून मांडत जातो. ऐकणारा शेवटी त्यातून काय समज करून घेतो त्याचे त्यालाच माहित !
कुठेतरी आत मला माहित असते. गेली कित्येक वर्षे आयुष्यात घडत गेलेल्या अनेक वाईट घटनांवर पाय देऊन उभे रहाण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला असतो. अप्रिय, भीषण, अटळ घटना. ह्या घटना 'कालिया' होत्या...परंतु, मी कृष्ण नव्हते. माझ्या पायांत तितके बळ नव्हते. सहजगत्या मर्दन करणे मला शक्य झालेले नसते. हे 'कालियामर्दन' माझ्या आयुष्याची घट करूनच गेलेले असते.
आणि तरीही मी माझा प्रयत्न चालूच ठेवते.
कारण मला हार मानता येत नाही.
मला नकारघंटा वाजवता येत नाही.
मात्र थकवा येतो. मानसिक थकवा.
मी काही त्या पाण्याच्या उगमापर्यंत पोचू शकत नाही.
एक प्रश्र्न मात्र राहून राहून मनात येतो. ज्यावेळी अशा माणसांना मुले होतात, त्यावेळी एक 'खंबीर माणूस उभा करण्याची' आयुष्यातील सर्वात कठीण जबाबदारी हे काय अशाच नकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडू पहातात ? मग ह्या अजाण बालकांचे मोठेपणी होते तरी काय ? ते नक्की कसे घडतात ?
अर्थात, मी त्या बाळाची चिंता का करत आहे ?
...नाहक कोणावर तरी मी खेकसते. आणि ह्या 'नकारघंटे'च्या सहवासातील धोका मला जाणवू लागतो.
आणि खरं तर मला माझीच चिंता वाटू लागते.
May be....I need a break.
20 comments:
ह्म्म. अवघड आहे खरं गढूळ पाण्यापासून आपल्यालाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेणं.
Use perspective difference to pick a good won from your own perspective, but don't take the rest, because picking "restiscrime"
अनघा तुझ्या पोस्ट्स वाचताना सतत जाणवतं तुझ्याच नावेत बसलेय मी.... अगं हे गढूळ पाणी स्वत: तर बेचव असतं पण इतरांचं आयूष्य नासवण्याची ताकद बाळगून असतं गं!!!
तो नळ बंद करता येत नसेल तर किती असहाय, अगतिक , हतबल वाटत असेल नं अश्या लोकांच्या घरच्यांना..... जाणिवपुर्वक दुर रहाणे हेच हाती उरते आपल्या!!!
>> May be....I need a break.
Sí. que haces! ;)
एकत्र काम करायचं आणि इतक्या नकारात्मक विचारांचा स्वत:वर अजिबात परिणाम होऊ द्यायचा नाही....कधीकधी वैतागच येतो मला गौरी.
नामधारी विनवी (प्र)सिद्धासी, प्रतिक्रियेबद्दल आभार.
काय माहित ग तन्वे...मला शंका येते बऱ्याचदा त्याच्या घराचे पण तसेच असणार !
हेरंब ! :D
Anagha you do need a break...come to West coast this time...:)
Really nice post...
most of time we live with negative thinker. we need to came out of that.
sharing this post with all my reader and friends :)
अनाघाताई, खरंय तुमचं! कितीही सकारात्मक रहायचा प्रयत्न केला, तरीही कधीकधी आपण नकळत नकारात्मकतेकडे वळायला लागलोय का असं वाटू लागतं. अगदी भावली ही पोस्ट.
तुमच्या ब्लॉगची नियमित वाचक जरी असले तरी आज प्रथमच प्रतिक्रिया देत आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.
नकारात्मक माणसांना कसं झेलायचं ह्यावर काही माहिती मिळते का ते पाहायला पाहिजे. मला नेल्सन (माझा एक सहकारी)-ची मागच्या वर्षाची ट्रेनिंग आठवली. त्याने अशाच एका माणसाचे उदाहरण दिले होते... तो कसा त्याला डिस्टर्ब करत होता आणि त्यावर त्याने काय केले....स्वतःला कसे वाचवले वगैरे वगैरे.
खरंय अपर्णा...
will be taking one soon... :)
धन्यवाद, नागेश. :)
मेघना, तू नेहेमी वाचत असतेस हे वाचून मला छान वाटलं ! :)
आणि मनापासून धन्यवाद. :)
श्रीराज, काय केलं रे बाबा त्याने ?? सांग सांग मला....गरज आहे खूप ! :)
नेल्सन खूप वैतागलेला ह्या माणसाला... त्याच्या नकारात्मक बोलण्याला. देशाबद्दल, आजूबाजूच्या लोकांबद्दल, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कायम नकारात्मकच बोलणं. तो स्वतःला खूप समजवायचा की त्या माणसाच्या बोलण्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ द्यायचा नाही; पण त्याच्यावर तो व्हायला लागलाच. तेव्हा त्याने ठरवलं की याचा सोक्षमोक्ष लावायचाच. एक दिवस तो असाच भारताबद्दल काही तरी बरळत होता; यावर नेल्सनने नेहमीपेक्षा वेगळ्याप्रकारे रिऍक्ट् झाला ... वेगळीच प्रतिक्रिया दिली..काहीतरी विचीत्रासारखा हसला... तेव्हा त्या माणसाला कळलं की ह्याला आपलं बोलणं आवडत नाही. तेव्हा कुठे नेल्सनची मुक्तता झाली त्याच्यापासून. तू ही प्रयत्न करून बघ...चाललं तर चाललं
श्रीराज, वेगवेगळ्या क्लुप्त्या करून झाल्यात वेगवेगळ्या माणसांच्या खरं तर...but in vain...
be the tap that gives way to the dirty water to flow... let it flow... it need to flow away for its own purity... :)
Purity ? Hmmmm
Post a Comment