ऊन तर ऊन. ऊनपाऊस नाही. ऊनसावली नाही. ऊनही असं...जसा प्रेमाचा वर्षाव. उगा, कुठल्या पुराण्या वैराचे बाण फेकत राहिल्यासारखं नव्हे. हिरवंगार गवत व त्यावर पडलेलं प्रेमळ ऊन. वर पसरलेलं निळंशार छत. असं वाटावं जणू अख्खं जग एकाच निळ्या तंबूत वस्तीला आलंय ! पायाला गवताचा ओला ओला मऊ स्पर्श. आणि त्यात काय बरं निळं निळं ? निळ्या तंबूचा जसा एक तुकडा. चिमुकला. मी वाकून पाहिलं तर ते कोणा पक्ष्याचं अंड. बोटाच्या एका पेराहून थोडसं मोठं. चिमटीत उचलवयास जावं तर ते इतकं नाजूक की त्याचा तुकडाच पडावा. मग हलकेच तळहातावर घेतलं आणि जरा आसपास विचारपूस केली. कोणता जीव ह्यातून बाहेर आला असावा ? ह्या बाहेरील अगडबंब विश्वात कोणी प्रवेश केला असावा ? हे रॉबिनचे अंड ! एका शेजारणीचे ठाम मत. छे छे ! हा तर ब्लू जे ! कोणाचा अर्धवट अभ्यास !
आणि ह्यावर...कोणाचे हे अंडे हेच माहित नसल्याचं माझं अज्ञानातील सुख.
कुठल्या अंड्यातून आपण बाहेर पडणार हे कुठे आपल्या हाती ? परंतु, आता बाहेर पडलोच आहोत ह्या अस्ताव्यस्त जगात, तर निदान कोण बनणार हे तरी आहे काय आपल्या हाती ?
18 comments:
kashaat kaay maahit nasnyachi gammatach tar keeps the hope alive :) you never know kashaat kaay...life or anda fry :) deep but cute post!
ब्लिस इज इग्नोरन्स :)
तो बाजूला ठेवलेला प्राणी त्या अंड्यातून बाहेर आलाय??? त्याचा आकार बघता घनफळ/क्षेत्रफळाचं गणित चुकल्यासारखं वाटतय... (ते चुकलं म्हणूनच अंड्यातून बाहेर आला असावा...) पण हा प्राणी परग्रहवासी दिसतोय...
by the way... चादरीचा आणि अंड्याच्या रंगाचा contrast अगदी बेस्ट जमलाय...
(अंड्यातून बाहेर आल्यावर कोण बनणार हे आपल्या हाती कसं??? कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू मोठं होऊन हत्ती झालं तर माणसानं त्याला खावं कसं???)
@Saurabh ++1 :-)
>>आता बाहेर पडलोच आहोत ह्या अस्ताव्यस्त जगात, तर निदान कोण बनणार हे तरी आहे काय आपल्या हाती ?
आता समोरच अंड्यातून बाहेर पडल्यासारखाच आहे नं ऋषांक त्याच्याकडे पाहून या वाक्याचा विचार करतेय....:)
उगाचच , " कुणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण कुणाचा बाप होणं टाळता येतं.." आठवलं. "पार्टनर" मध्ये वपुंनी काय सुंदर लिहिलंय ना ताय ?.
बाकी सौरभशी आम्ही रजनीकांत टक्के सहमत !!
म्हणून कुणब्याच्या बेट्यासारखे असावे... ढुंगांत लंगोटा; पण धर्माचा मोठा :)
धन्यवाद ग वंदू...
अगं, काल शेजारीण सांगत होती, त्या अंड्यातून बाहेर आलेला चिमुकला पक्षी तिच्या अंगणात मरून पडलेला !
:'(
मग काय तर हेरंब ! :)
हेहे सौरभा ! तो बाहेर आलेला प्राणी हॅमस्टर आहे ! माझ्या भाचीने असे छोटे छोटे खुपसे प्राणी जमवले आहेत ! :)
आणि मी सुरुवातीलाच म्हटलंय ना बोटाच्या पेराहून थोडुसं मोठं अंड्यांचं कवच ! म्हणजे बघ ना तो हॅमस्टर तर त्याहून लहानच असणार ना ? असे काही फोटो असतात ना ज्यांना काही रेफरन्स पॉइन्ट नसतो. मग त्यांचे आकारमान लक्षात नाही येत ! तसंच झालंय ना इथे ?! गंमत ! :)
नीला ! :)
अपर्णा, जन्माला येतो आपण, ते काही गुणधर्म घेऊन येतो...पण नंतर अनुभवांतून काही वेगळेच बनत जातो. :)
आपण म्हणतो खरे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ! मग, ऋषांक साहेबांचे पाय काय बरं बोलतायत ? :) :)
संकेत, सौरभच्या खादाडी मताशी सहमत का रे ? :)
आणि अगदी अगदी....बाप होणं टाळता येतं !! :)
श्रीराज !!! :D
Murgi kya jaane aande ka kya hoga
Aree life milegi ya tawee pe
fry hoga
मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा...
लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा???
आनंद... :)
अंडे का फंडा... :)
रोहणा :D
Post a Comment