कसं आहे...
जिथं जे मिळतं तेच मागावं.
उगा कासाराकडे जावं अन दाणापाणी मागावं.
मग न मिळालं...
म्हणून त्या दुकानवाल्याच्या...
बोकांडी बसावं...
अन्याय अन्याय करून बोंब मारावी..
धो धो धाय मोकलावं...
माथा आपटावा...
कपाळमोक्ष करून घ्यावा.
तसं काहीसं झालंय...
सोनंचांदी...
कपडालत्ता...
मागायचा होता..
डोंगर डोंगर दिला असता...
पण नाही...
मागून मागून मागितलं काय ?
हिरव्या कविता...
गर्द दर्द गाणी...
टपोरं चांदणं...
चिंब पाऊस...
रातराणीचा गंध...
अन प्राजक्ताचा छंद...!
कठीण आहे...
दारुच्या गुत्यावर जावं अन केशरी दूध मागावं !
हव्यास दु:खाचा !
दुसरे काय ?
24 comments:
अप्रतिम आहे !!
रच्याक, शेवटच्या ओळीत लेटेस्ट बझला हाणते आहेस वाटतं :P
मस्तच!!!
ऑफिस मध्ये जावं आणि पगाराबरोबर जॉब satisfaction पण मागावं.... tooo much ना.... :-)
पुन्हा काही बिनसले काय??
प्रामाणिकपणे सांगायचे तर मला नीटसे काही कळलेच नाही... डोक्यावरून गेले.. :(
हव्यास दु:खाचा ! वाह....
सुंदर
पाऊस हुडकाया मी ग्रीष्माच्या गावी शिरलो (संदीप खरे) :(
बाबौ... कौन देऊन याय्ल भौ डोंगरायेवढ??? (कोन का द्ये ईना)... पुण्याच्या हनुमान टेकडीयेवढं द्या पाठवून... पुरवुन घेऊ तेवढेच... :P
अन् कोन ह्यो.. कुबेरा घरी गेला नी उपाशी पोटी ऱ्हाय्ला...
का ग? कुठे धरलास हा दुःखाचा हव्यास?
कित्ती खरं आहे न हे... कवितांचा उगम बर्याच वेळी उदासीनतेतून होतो.
असो.
"ऑफिस मध्ये जावं आणि पगाराबरोबर जॉब satisfaction पण मागावं.... tooo much ना.... :-)" -> +++1 :D
सचमुच नही है ऐ ख़ुदा, तुझको समझ ज़माने की,
था जिसे जो देना चाहिए, बस वही नही दे पाने की...
बेफिक्रमंद पुश्तों की दौलत खा रहे,
उनमे हुनर कि की कमी,
मुझ ग़रीब की ज़िन्दगी
में चैन का लम्हा नही,
कमबख्त, उसपे ये शायरी!
kashala apan kahi maghava...ani tyaane detana ultach kahitari dyava...hum kare so kaayda, do mil jaaye faayada!
हेहे! मला वाटलंच होतं हेरंबा असं तू म्हणणार म्हणून ! ज्या दिवशी लिहिलं त्यादिवशी तो बझ्झ चालू होता. म्हणून दुसऱ्या दिवशी पोस्ट टाकली ! :) :)
अगदी अगदी नीला ! मस्तच ! :)
:) रोहणा, मध्ये मध्ये बिनसतं खरं थोडं थोडं...काळजीच कारण नाहीये पण ! :)
इंद्रधनू, बऱ्याचदा वाटतं असं मला....आपल्यालाच हव्यास आहे...दु:खाचा म्हणून ! :)
आभार गं !
धन्यवाद लीना. येत जा अशीच...:)
बंड्या ! 'पाऊस हुडकाया मी ग्रीष्माच्या गावी शिरलो'...सही आहे हे ! :)
सौरभ... :)
गौरी...कळत नकळत...नेहेमीच धरला....
:)
श्रीराज, मला पण हसूच आलं नीलाने लिहिलेलं वाचून ! सॉलीडच आहे ते ! :)
वंदू, कोणी लिहिलंय ते ????? तू ???? सुंदर आहे गं !!!
खूप वेळा येवून गेले पण शब्द सुचायाचेच नाहीत लिहायला ..
ह्यावेळी हि असच झालं.. "सुंदर" म्हणून भागवून घेतलं ..
ani kob lihnaar tujhya friend shivay :)....zuni rachna aahe...pan tujhya post la fit basli mhanun lihli ither :)
काही(जसा हा) ब्लॉग्स, लेख इतके सुंदर असतात कि वाटते एकादी तिरकस प्रतिक्रिया टाकावी....नजर लागू नये म्हणून.... चियर्स!!
योगिक, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)
Post a Comment