आता वाटतं...
आयुष्य आंब्यासारखं...
एकेक फोड...
जणू आयुष्याचा एकेक टप्पा.
प्रत्येक फोडीची चव निराळी...
कधी गोड...
कधी आंबट...
तर एखादी फोड...
...मार लागलेली.
एक दिवस मात्र फोडी संपून जातील...
चोखून, शोषून, विस्कटलेली कोय
एकटीच राहील..
काय ती एकटीच पडून राहील..
उन्हातान्हात करपत राहील...
कचराकुंडीत सुकून जाईल ?
वा त्या कोयीतुनच एक कोंब जन्म घेईल ?
24 comments:
शेवट एकदम निगेटीव्ह निगेटीव्ह होतोय असं वाटत असतानाच "वा त्या कोयीतुनच एक कोंब जन्म घेईल ?" हे बघून एकदम मस्त वाटलं.
कोयीतुनच एक कोंब जन्म घेईल ?
नक्कीच... आणि मग पुन्हा एकेक फोड... प्रत्येक फोडीची चव निराळी... हे अव्याहतपणे सुरूच राहील... :)
आणि हे असे वाचून बघ ना.... त्या कोयीतुनच एक कोंबडी जन्म घेईल ? हिहीहाहा...
ताई,
पुनर्जन्माचं तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीनं सांगितलंस! :)
वाह......
tula upama alankaar madhe 100 out of 100 :)
mastch :)
ह्म्म्म. हेरंबा, ते आपोआपच घडलंय...गाडीने आपोआपच रूळ बदललेत ! :)
:) आभार सेनापती !
कोंबD :D :D
विद्याधर, काय माहित नाही...लिहायला घेतलं तर डोकं कुठे चाललं होतं आणि शेवट केला तर ते वेगळीकडेच पोचलं होतं. :)
आभार इंद्रधनू. :)
उपमा माझा नाही चांगला होत ग वंदू ! (आवरा !!) :D
बंड्या, धन्यवाद ! :)
बयो, अगं सुखाने खा की फोडी. :D:D
अनघे, अगं जोवर ’नवीन कोंब फुटतोय’ तोवर नो चिंता. बाकी, हाताच्या बोटांसारखंच गं हे.
:)
छान...! :)
" वा त्या कोयीतुनच एक कोंब जन्म घेईल ?"
एकदम टर्न झाला ट्रॅक........ :)
हो ना समीर ! नशीब ना ? ! :D
कचराकुंडीत ही बाट्याला (तुमच्या भाषेत कोयीला) कोंब फुटतात हं. मी या या डोळ्यांनी बघितलंय... खास करून पावसाळ्यात... त्यामुळे तू घाबरू नकोस... तसाही पावसाळा जवळ आलाय :)
Ithalihi udali.... Devaa! :(
Vaitaag Vaitaag...
श्रीराज ! :D :D
बघ ना गं भाग्यश्री ! किती वैताग आहे हा ! किती कमेंट्स नाहीश्या झाल्या ! :(
तू परत येऊन वाचतेयस...पुन्हा कमेंट लिहितेस ही किती मोठी गोष्ट ! खूप खूप आभार गं ! :)
सू वात छे!!! सू वात छे!!! :) :)
ह्म्म्म. ठीका छे ! :)
Post a Comment