नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 26 March 2011

मॅक मॅक!

मॅमॅक!
मॅमॅक!
परवा, बाबांच्या १०० वर्षे जुन्या टेबलावर मॅक स्थापना केली. म्हणजे टेबलावर मॅक आणि पाठी माझ्याकडे लक्ष ठेवून बाबा.

देवाधर्मातील रीतिभाती जरी कमी कळत असल्या तरी देखील कुठलीही आणि कोणाचीही स्थापना ही काही आशा आकांक्षा मनात धरून केली जाते इतपत ज्ञान आहे. त्यामुळे ही स्थापना देखील तसेच काही मनात योजून केलेली आहे. म्हणजे आता घरातच मॅक असल्याकारणाने कामे घरात आटपता येतील. दिवसाढवळ्या घर नजरेस पडत नाही असे न होता, आता सातच्या आत घरात ही बाबांची आज्ञा थोडी फार पाळता येईल. गॅलेरीत ताठ मानेने अगदी दूरदूर नजर लावून वाट बघणारे बाबा आता लेक समोरच बसून काय ते बटणं बडवतेय हे बघून कदाचित थोडे सुखावतील. चित्र काढून काही पैसे मिळणार नाहीत. मग पोटापाण्यासाठी मला काहीतरी करता यावे म्हणून बाबांनी मला एका टायपिंगच्या क्लासला घातले होते. फार काही झेपले नाही. पहिली परीक्षा दिली आणि मग संपलं. त्याची आठवण मला बऱ्याचदा कीबोर्ड बडवताना होते. आता बाबाच समोर आहेत म्हणजे मग ते पण स्वत:च्या निर्णयावर खुष झाले असतील...करते ही बाई काहीतरी उपयोग...असेच म्हणत असतील.

मी माझ्या एका मित्राला सांगत होते...
"आला हा माझा मॅक!"
"हो? अरे व्वा!"
"अरे, आता ना मी घरी लवकर येऊ शकेन! नाही का? नाहीतर आठवडा आठवडा घर उजेडात दिसत नव्हतं!"
"हाsss....म्हणजे आता ऑफिस दिसणार नाही!"
:)

काल...
आईईईई बेडरूम मधून हाक आली!
"काय गं?"
"बस इथे! बस म्हणतेय ना!"
डोकं आलं मांडीवर!
"अगं, तो जॉब द्यायचाय ना!"
"अजिबात आवडत नाहीये हे मला! तू घरात आहेस पण माझ्याकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये! येतेस आणि त्याच्यासमोर बसतेस!"
"ए! इमोशनल अत्याचार नको हा!"

...हे आणि असेच! दोन दिवसात! मॅकविषयी तक्रारींचा सूर लागलेला आहे!

असं वाटतं, ह्या मॅकची वाट बघत कामं जशी काही दारात उभी होती! हा आत शिरल्याशिरल्या एकदम लोंढाच आत शिरलाय...कामांचा!
:)


25 comments:

rajiv said...

दिसला ग बाई दिसला ... त्याला बघून ग उर भरला .!!!
अभिनंदन !!

Gouri said...

अनघा, अभिनंदन! आणि धोक्याचा इशाराही - शक्य असेल तर काम घराबाहेर ऑफिसातच राहू दे ग. म्हणजे किमान ऑफिसहून घरी आल्यावरचा वेळ तरी आपला असतो. एकदा घरून काम व्हायला लागलं, म्हणजे त्याला काही काळवेळच राहत नाही.

Anagha said...

गौरी, खरं आहे गं तुझं म्हणणं...पण खर्चाचा ताळमेळ जुळवणे भाग आहे ना! त्यामुळे....काहीतरी त्याग केल्याशिवाय कधी काही मिळतंय का आयुष्यात?
आभार गं. :)

Anagha said...

राजीव, धन्यवाद. :)

सौरभ said...

भाSSSSरीSSSSS.... ये मॅक मुझे दे दे ठाकूर... >:)

त्या मॅकच्या बाजूला एक डोनाल्ड ठेवायचा. म्हणजे घरच्या घरी मॅकडोनाल्ड स्थापलं जाईल. :D

Anagha said...

हेहे! सौरभ! भारी! लेक खुषच होईल मग माझी!! :D

आनंद पत्रे said...

मॅक मॅक.. हे हे..
अभिनंदन...

Anagha said...

आभार आभार आनंद! :)

तृप्ती said...

Abhinandan. maajhaa gharee yeun paDalaay. tyaalaa sthaapan karaayachaa muhurta saapDenaa aaNi ek desk :)

Raindrop said...

Congratulations :)
Mac ani tujhi back plz take care.

Anagha said...

:) अगं तृप्ती, पोट आहे ना त्यावर अवलंबून! त्यामुळे अगदी चातकासारखी वाट बघते होते मी त्याची! :)

Anagha said...

हेहे वंदू! :)
Yes! Mac and Back! I shall take care of both of them! :)

हेरंब said...

गौरीला अनुमोदन...

अनघा, या मक्याचा उपयोग तू सर्फिंग, चित्रपट बघणे, गाणी ऐकणे एवढ्यांसाठी आणि फक्त एवढ्यांसाठीच करत जा..

मॅकडोनाल्ड ..... सौरभ लोल्झ !! :D

Anagha said...

ह्म्म्म...

हेरंबा, वरवर बघता मलाही पटतं गौरी बाईंचं...पण नाईलाज को क्या इलाज? :D

Shriraj said...

अनघा, छान आहे हं तुझा MAC :)

Anagha said...

छान आहे ना श्रीराज? आणि खूप बरं पण पडलंय! कामं जी चांगली निघतायत! :)

BinaryBandya™ said...

छान आहे ..
माझ्याकडे पण आहे पण ऑफिसमध्ये फुकटात :)

Anagha said...

ह्म्म्म. हा काही माझा फुकट नाही! ऑफिसातला मात्र आहे! चकटफू!
:)

Yogesh said...

अभि+नंदन ...मॅक..मॅक...मॅक...

अपर्णा said...

अनघा सांभाळ ग...कामं घरी (किंवा घरून असलं) की स्वत:ची काय वाट लागते त्याची मी उत्तम साक्षीदार आहे....घरचे पण लक्ष देत नाहीत आणि हापिसातले तर जीवावरच उठतील...तुझ अभिनंदन नाहीच करणार मात्र शुभेच्छा जरूर देईन..काळजी घे...

Anagha said...

योगेश, आभार आभार ! :)

Anagha said...

अपर्णा, वरती म्हटलं तसं....इलाज नाही ! आणि हापिसातलं काम मी अजिबात करत नाही माझ्या ह्या मॅकवर! :) :)
धन्यवाद गं...शुभेच्छांबद्दल. :)

रोहन... said...

माझी इच्छा पुन्हा जागृत होतेय मॅकबुक घ्यायची... :) घरी मात्र बहुदा डेल येईल... :)

Anagha said...

घेऊन टाक रोहन ! मॅक तो मॅकच ! :)

THEPROPHET said...

मी मॅकची तहान आयफोनवर भागवेन! :D