त्याचं असं झालं...
सकाळी गाडी इमारतीच्या आवारातून बाहेर काढली ना काढली तोच डाव्या हाताला एक विशीतील तरुणी तोंडावर उजवा हात घट्ट दाबून हमसाहमशी रडताना दिसली. सडपातळ. जीन्स आणि एक फिकट रंगाचा टॉप अंगावर. साधीसुधी. पदपथावर उभी नव्हती आणि भर रस्त्यात देखील नव्हती. काहीतरी विपरीत घडलं होतं. डोळे मिटून तिचं एकटीने मूक आक्रंदन चालू होतं. थोडं पुढे जाऊन मी गाडी बाजूला लावली. तिच्या जवळ गेले. पाठीवर हात ठेवला आणि विचारलं..."काय झालं?"
तिने मान नकारार्थी डोलावली आणि तशीच पाय फरफटत पुढे निघाली. अजूनही रुमाल तोंडावर. शरीर गदगदत.
तेव्हढ्यात समोरील कॉलेजच्या प्रवेशद्वारातून २/३ मुले पुढे झाली. माझ्याकडे बघून म्हणाली..."कोणी तरी मारून गेलं तिला."
"मारून गेलं? म्हणजे?"
"एक मुलगा बाईकवरून आला आणि तिला उलट्या हाताने थोबाडीत मारून गेला."
तिच्याकडे परत बघितलं तर हा संवाद तिच्या गावी नव्हता. पाय खेचत ती पुढे निघाली होती. रडत.
अजून एक मुलगा आता पुढे आला. दुसऱ्याला म्हणाला,"अरे, काहीतरी अफेअर असणार रे!"
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही....त्यांचं काहीतरी अफेअर असणार. आणि त्यातून आता त्याने येऊन हिला मारली!"
"तुमच्या समोरच झालं का हे?"
"हो! तिथेच होतो आम्ही उभे!"
ती आता गल्लीच्या मध्यावर पोचली होती...पाय ओढत.
प्रत्येकाने आयुष्यात प्रेमात हे पडायलाच हवं. असा एक समज. माझा. मग जग सुंदर दिसू लागतं. काळवेळ भान हरपतं. तहानभूक हरपते. सुंदर आकाश, ओला पाउस, ओसळता समुद्र, हातात हात आणि लांबचलांब रस्ते. भर गर्दीत देखील अख्खीच्या अख्खी गर्दी आपोआप नाहीशी करणारे हे क्षण. मन सुंदर. हळुवार क्षण.
आता वाटतं हे तर राज कपूर स्टाइल प्रेम. जुन्या जमान्यातील. ब्लॅक अँड व्हाइट. म्हणजे जेव्हां 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेमच असतं...' असं काही मन गुणगुणायचं त्यावेळेच्या ह्या गोष्टी. प्रेमाची पहिली पायरी, त्याग असतो...आपण देत जावे त्यातून आपल्यालाच आनंद मिळतो आहे ह्याचा आपण विचार करावा...आपल्याला त्याची परतफेड मिळते किंवा नाही ह्याकडे लक्ष देऊ नये...इत्यादी इत्यादी.
....ब्ला ब्ला आणि ब्ला.
तुमचं आमचं सेम नाही राहिलं राव प्रेम...आमचं वेगळं...तुमचं वेगळं...
आता ह्या प्रेमाची भीती वाटते...एका नाण्याच्या जश्या दोन बाजू...तश्या ह्या प्रेमाला दोनच बाजू. प्रेम आणि सूड.
हे काही सुखावणारं प्रकरण नाही राहिलेलं राव...
ही प्रेमभावना म्हणजे एका वेगळ्याच सुडभावनेचे बाह्यस्वरूप. थोडा कालावधी गेला...फळ थोडं जून झालं....वरील साल सुकून पडलं तर आत काही विद्रूपच...रक्ताळलेलं...
त्यावेळी समोरच उभे राहून बघ्यांची भूमिका करणारे हे...तिच्या मदतीला कोणी नाही पुढे आलं...एका सटक्यात तिचा न्याय करून टाकला गेला होता...अफेअर...she deserved that hard slap...
दिवस गेला....
तिची ती थोडी वाकलेली पाठ...थरथरणारं शरीर...रस्त्यावर पाय खेचताना येणारा तो चपलांचा आवाज..आणि... "अरे, काहीतरी अफेअर असणार रे!"
...हे काहीतरी वेगळंच आहे...
कधी शरीरात जंत होऊ लागतात...आणि शरीराला पत्ता नाही लागत....ते असेच पोसले जातात...वस्ती वस्ती वाढवतात...आणि मग वेदनांचा कल्लोळ.
...समाजाचे हे असेच काहीसे जंताळलेले रूप...

21 comments:
ह्याला "अफेअर" ऐसेच नाव आहे. आकर्षण आणि प्रेम ह्यातला फरक नाही समजला की हे असे किस्से होतात.
आताच काही दिवसांपूर्वी नागपूरला भरदिवसा एका अभियांत्रिकीच्या मुलीला ४ तरुणांनी भोसकले,कॉलेजसमोर, लोकांच्या डोळ्यांदेखत.पण ना बचावाला कोणी पुढे आले ना ती पाणी मगत असताना तिला पाणी पाजायला.गेली ती जागेवरच. त्या मुलांविरुद्ध साक्ष द्यायलाही कुणी पुढे येत नाहीये.परवा कँडल मार्च निघाला ३००० चा नागपूरात, पण ते करुन काय फ़ायदा? सोंगं नुसती!!! साक्ष द्यायला पुढे या की!! तुझ्या विहीर लेखावर कमेंटलेली माझी विहीर ती ही; संवेदनांची विहीर
ओहह्ह.. अशी प्रकरण खुपच वाढली आहेत हल्लीच्या पिढीत :(
'sameach nahi rahilay atta'...asa vatatay na tula pan??? kitti true aahe tuzha observation. mala pan ithe asach vatata jenvha me baghte eka muli la ticha rejected lover divasa dhavalya goli marun zato...ithe dillit. ani baghnaare mhantaat ,' asel kahitari affair ticha...hi tar dilli aahe, kalayala nako ka tila aslya prasangaat padayachya aadhi' :(
सौरभ, किस्से वाढले आहेत. हे आणि अश्या प्रकारचे इतर हिंसक प्रकार डोळ्यांसमोर घडत असता मढ्यासारखे तिथे पडून रहाणे देखील वाढले आहे.
त्या त्या क्षणी तिथे धाऊन जाणे गरजेचे असते...ह्यात त्याची चूक किती व तिची चूक किती ह्याची चर्चा, हा खूप नंतरचा भाग झाला.
प्रेम ही गोष्ट अजिबात सुंदर राहिलेली नाही...मोहक असेल...परंतु, मोह हा बऱ्याचदा घातकच ठरतो.
ही फार चिंतेची बाब झालेली आहे संकेत...
...समाज हे एक फक्त प्रेतघर झालेले आहे काय...असे मनात येते.
सुहास, काळजी वाटते...काही खरं नाही हे सर्व...
सोपं आहे. आपलं असतं ते प्रेम. दुसर्याचं ते लफडं. लफड्यात पडल्यावर असलं काहीतरी होणारच. त्यात आपण कशाला लक्ष घालायचं? :(
वंदू, मला देखील त्या मुलीकडे बघताना तीच दिल्लीतील नुकतीच घडलेली केस आठवत होती...हे सर्वच भीतीदायक आहे...
ह्म्म्म... गौरी, कधीतरी दूर कुठेतरी घडणाऱ्या ह्या अश्या प्रकारच्या घटना आता अगदी दरवाजापर्यंत, सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजात, वारंवार घडू लागलेल्या आहेत.
ताई, तू कथन केलेली ही घटना म्हणजे भयंकरच आहे गं
भयानक.... जिच्यावर प्रेम केलंय ती व्यक्ती योग्य असणं दुर्मिळ होत चाललंय......
प्यार के साईड इफेक्ट्स!
सगळंच विचित्र आहे श्रीराज...लोकं वेगवेगळ्या ठिकाणचे नैराश्य वेगवेगळ्या ठिकाणी काढताना दिसतायत...एकूणच नैराश्य आता परिसीमेला गेलंय..असं काहीसं वाटतंय....
इंद्रधनू, खरं आहे...'स्वत:साठीची योग्य व्यक्ती' हा एक दुर्मिळ प्रकार होत चालला आहे...
...की ह्या स्पर्धेच्या युगात अपेक्षा व निराशा वाढल्या आहेत?
विद्याधर, भीतीदायक आहे सगळं...
भयानक आहे गं सगळं....
हे सर्वच भयानक आहे. पण प्रेम करण्यासाठी "योग्य" व्यक्ती म्हणजे नेमके काय? प्रेमात व्यक्ती, नकळतच "पडते". अशा वेळी दोषी कोण? विचार करून प्रेम......मग ते "प्यार" ऐवजी "व्यापार" नाही का? मात्र काही अविचारक लोकांमुळे प्रेम "बदनाम" झालेय.
पंकज! किती खरं आहे हे! प्रेमात व्यक्ती नकळत पडते ना?! विचार करून प्रेमात कसं पडायचं?!
पण हे सध्या जे काही आजूबाजूला प्रेमाच्या नावाखाली चाललंय ते फार भीतीदायक आहे!
सारिका, हे खरोखर भयानक आहे....प्रेमाबद्द्लच्या सर्व कल्पनाच बदललेल्या आहेत!
डोळ्यांसमोर घडलेली घटना अशीच होती आनंद, खिन्न करणारी...
Post a Comment