कोणाच्या ब्लॉगवरील प्रोफाइलमध्ये डोकावलं तर प्रत्येकाने स्वत:बद्दल काही ना काही लिहिलेलं सापडतं. प्रत्येकाला माहिती असतं...तो किंवा ती कशी आहे, कोण आहे...वगैरे वगैरे!
पण मला नाही ना माहित! तेच तर मी शोधतेय! ब्लॉग लिखाणातून!
म्हणजे जसं, रोज मी अथांग पसरलेल्या जलाशयासमोर बसलेली असते...एका खडकावर...हनुवटी तळहातावर घेऊन...चंद्र विरघळत गेलेला असतो...सूर्य डोकावू लागलेला असतो...तो गूढ जलाशय हळूहळू नजरेसमोर येऊ लागतो...मग हलकेच माझं प्रतिबिंब मला दिसू लागतं. पण मग वाऱ्याची झुळूक येते...पाणी थरारतं...जुनं पाणी क्षणात पुढे सरकतं...नवीन पाणी माझ्यासमोर येतं.
तेव्हा मला मीच नवीन नाही का दिसत?
तसंच काहीसं...
म्हणून मग माझं प्रोफाइल पान रोज कोरंच रहातं!
पण मला नाही ना माहित! तेच तर मी शोधतेय! ब्लॉग लिखाणातून!
म्हणजे जसं, रोज मी अथांग पसरलेल्या जलाशयासमोर बसलेली असते...एका खडकावर...हनुवटी तळहातावर घेऊन...चंद्र विरघळत गेलेला असतो...सूर्य डोकावू लागलेला असतो...तो गूढ जलाशय हळूहळू नजरेसमोर येऊ लागतो...मग हलकेच माझं प्रतिबिंब मला दिसू लागतं. पण मग वाऱ्याची झुळूक येते...पाणी थरारतं...जुनं पाणी क्षणात पुढे सरकतं...नवीन पाणी माझ्यासमोर येतं.
तेव्हा मला मीच नवीन नाही का दिसत?
तसंच काहीसं...
म्हणून मग माझं प्रोफाइल पान रोज कोरंच रहातं!
32 comments:
मस्त!
बाकी, माझं ब्लॉगर प्रोफाईलचं पान, सीव्ही, ऑफिसमधल्या इन्ट्रानेटवरचं प्रोफाईल असं काहीही बघितलं म्हणजे मला दर वेळी प्रश्न पडातो ... हे आपल्याविषयीच लिहिलंय? कोणी? कधी? मला कसं माहित नाही?
सुंदर...पोस्ट...
हेहे!! गौरी! :D
उमा, आभार गं. :)
तेच प्रतिबिंब आम्हाला कधी कधी इकडे ब्लॉग वर दिसते ..
छान झाली आहे पोस्ट..
खरंय... तसं प्रत्येकालाच आपण कसे आहोत हे माहिती असतही आणि नसतही....
:D स्वतःबद्दल आपण स्वतःच काय लिहणार?? कठिण काम आहे हे.
अप्रतिम ..असंच होत, आपली पाटी कोरीच असते नेहमी :)
स्वतःबद्दल लिहिण्यात काय अर्थ आहे... असं म्हणून मी बरेचदा काहीही कितीही लिहितो... :D:D:D
chhottushi post ani kitti god...ani mala samazli pan full on...kitti chhan zhala he sagla :)
:D बायनरी बंड्या, म्हणजे कधीतरी रडकं आणि अधूनमधून हसरं! हो न? :)
इंद्रधनू, अधिकतर वेळा आपलं आपल्यालाच माहीत नसतं! :)
आभार गं.
हो ना सौरभ? म्हणजे मग ही जी लोक आत्मचरित्र लिहितात ते कसं बरं लिहितात?! :p म्हणजे मी नाही जातेय लिहायला! :p
प्रोफाईल लिह्ताना खरंच काही सुचत नाही....आता स्वतःच्या तोंडाने म्हणजेच स्वतःच्याच हाताने स्वतःची स्तुती कशी लिहायची बरं....
हेहे!! विद्याधरबुवा, मग सगळ्यांना तू तुझ्याबद्दल लिहिलेलं पटतं की नाही? :)
वंदू, छोटुशी म्हणून सोप्पी गेली ना समजायला? :)
:D सुहास, कोरी पाटीच बरी! म्हणजे मग रोज बिनधास्त लिहिता येतं! :p
हेहे सारिका! :) हो ना! आणि दोष माहिती असले तरी जगजाहीर तरी कसे करायचे?! :D
नाही ना... मी लिहिलेलं कुणालाच पटत नाही...
"पाटी माझी पटत नाही" :(
तिसरा परिच्छेद प्रचंड प्रचंड आवडला... कविता आहे नुसती.
प्रोफ़ाईलवर ९०% लोक काहीतरी टाकायचे आहे म्हणून टाकतात गं ..(मलासुद्धा काय लिहावे कळत नव्हते, मग एका ओळीत माझ्याबद्दलचे जे जगजाहिर सत्य आहे तेच टाकले, काहीतरी टाकावे या उद्देशाने. पहिल्यांदा जे टाकले तेच कायम आहे; नवे काय लिहावे? )
बाकी प्रोफ़ाइलपेक्षा पोस्टवरुन माणूस कळतो बराच !
तुझी कोरी पाटी पटते आम्हाला !
>>> बाकी, माझं ब्लॉगर प्रोफाईलचं पान, सीव्ही, ऑफिसमधल्या इन्ट्रानेटवरचं प्रोफाईल असं काहीही बघितलं म्हणजे मला दर वेळी प्रश्न पडातो ... हे आपल्याविषयीच लिहिलंय? कोणी? कधी? मला कसं माहित नाही?
अगदी असचं काहिसं वाटतं ते about वाचताना... मीच कधी काळी खरडलेलं about आता nakki whom ??? असा प्रश्न भेडसावतो :)
पोस्ट पटलं :)
स्वामी संकेतानंद, आभार आभार... :)
तन्वी बाई, किती दिवसांनी दिसताय इथे! :) आभार गं! :)
:) बाकी काही ही असो... तुझी पाटी मात्र 'पटतेच' ;)
धन्यवाद श्रीराज, ह्या पाठिंब्याबद्दल.
:)
हो. "कधीतरी रडकं आणि अधूनमधून हसरं!"
:)
छान लिहिलंयस....
खरच आपण दिवसागणिक बदलत असतो अस मला वाटत..
मला तर खरच मी कशी आहे हे अजूनही कळत नाही...
अबाऊट मी मध्ये लिहिणार्यांबद्दल मला कौतूक होतं.. कारण मला कधीही सुचलं नाही... पण आता बरं वाटतंय.. I am not alone :)
हा तर शोधच आहे...नाही का श्वेता? :)
अजिबात नाही आनंद! हम साथ साथ है! :)
आभार, प्रतिक्रियेबद्दल. :)
कोरे कसे?? तुझे रूप घेऊन येतेस ना दररोज ह्या ब्लॉगमधून आमच्यासमोर... :)
...तेही आहेच रोहणा...
Post a Comment