रात्री कधीतरी फोन वाजू लागला. माझ्या लेकीच्या मैत्रिणीचा फोन होता. "Where are you?" "At home!." "okay " थोड्या वेळाने दुसरा मग तिसरा आणि मग चवथा. मध्ये माझ्या लेकीचा. युके वरून. "तू कुठे आहेस?" "अगं, तुम्ही काय चालवलंय काय? सगळे तुझे मित्र मैत्रिणी मला असं का विचारतायत? रात्री एक वाजता कुठे असते मी?" झोप शेवटी उडालेली होती. "आई, उठ आणि टीव्ही लाव!" तिने फोन ठेवून दिला. मी टीव्ही लावला. ती रात्र २६ नोव्हेंबर २००८ ची होती.
मग पुढचे दिवस जसे इतर भारतीयांचे गेले तसेच माझे गेले.
मग?
मग काही नाही.
मी कधी तक्रार केली नाही.
मी कधी शिव्या घातल्या नाही.
मी लाच कधी दिली नाही.
मी सिग्नल कधी तोडला नाही.
मी डोळ्यादेखत अन्याय कधी होऊ दिला नाही.
मी फेरीवाल्यांकडून कधी खरेदी केली नाही.
मी निर्माल्य कधी समुद्रात टाकलं नाही.
मी रस्त्यात कधी थुंकले नाही.
मी रस्त्यात कधी कचरा केला नाही.
मी काळ्या बाजारात तिकीट कधी खरेदी केले नाही.
मी सणांच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण केले नाही.
मी धर्माच्या नावाखाली आपपर कधी केले नाही.
मी राष्ट्रध्वजाचा अपमान कधी केला नाही.
मी जबाबदारी नाकारली नाही.
मी जिद्द सोडली नाही.
मी हार मानलेली नाही.
मग?
मग काही नाही.
बस्स! 'मी' हे एव्हढंच केलं.
18 comments:
हेरंब, हा देश ही प्रत्येकाची जबाबदारी आहे...बस्स..इतकंच मला म्हणायचंय...
अग मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. तुला माझी कमेंट चुकीची वाटली असेल तर सॉरी..
आता वाचल्यावर मलाही असं वाटतंय की उगाच उलटा अर्थ निघतोय !!
नाही रे हेरंब, सगळंच खिन्न करणारं आहे नं? कळतं ते मला.... :'(
ते तीन दिवस रडत होतो मी,अक्षरशः .. संसदेवर हल्ला झाला तेव्हादेखील मी रडलो नव्हतो.. पण याखेपेला रडलो, कारण आपल्या "समाजसेवी" न्यूज चॅलेल्सनी जे काही राष्ट्रद्रोह केले होते, ते बघून मी हादरलोच! आणि मग मी न्य़ुज बघणे बंद केले.हा देश आपलीदेखील जबाबदारी आहे..म्हणून मी आज कोरड्या श्रद्धांजली वाहिल्या नाहीत.. :(
संकेत, मला सुरेश भटांचं गाणं आठवतं...उष:काल होता होता...
दहशतवादी घुसले!!! पोलिस काय करत होती??? राजकारणी काय करत होते??? गुप्तचर यंत्रणा काय करत होती??? इतर सगळे काय करत होते???
आपण स्वतः काय करत होतो?? हा प्रश्न कधीच पडला नाही!!! नेहमीच दुसऱ्यांकडुन अपेक्षा करत होतो. कधी सजग नागरीक बनण्याचा प्रयत्न केलाच नाही.
ह्या लेखाने वेगळा विचार करायला लावला... आणि हे विचार कृतीत येण्याच्या प्रक्रियेला चालनापण मिळाली...
hey sagla man khinna karanar asle tari apan netane jagat rahto, aplya deshat honarya goshtinkade ughadya dolyane shandhsarkhe fakt apan baghat rahto kahi karu shakto ka??? lokanchi mansikta badlu shakto ka?? apna fakt jagat rahto marta yet nahi mhanun.anagha atyant thodkya shabdad apla saglyancha bhavana aaj tu blog var post kelyas tya baddal abhar.
सौरभ, आपण प्रत्येकजण एक जबाबदार नागरिक म्हणून जगायला लागलो, तरी देखील आपण बरंच काही साध्य करू शकू. असं मला वाटतं.
आभार, सौमित्र.
gist of the post is quite clear - be the change that you want to see in others....isn't it? har adami apna chal aur apne bacchon ka chalan dekh le...utna hi bahut hai....in case they can't pick up a jhanda and take up a crusade.
Yes Vandu....I have put it as it came to my mind....otherwise we always try to find a 'catchy line'...in our beloved advertising... :)
yes the world of catchy lines....headlines...baselines....taglines....even sidelines ;) where we sit n watch the whole political scenario of the workplace ;)
hehe! Vandu, your 2nd comment captures everything!! :) ऑफिस गर्रकन फिरलंच माझ्याभोवती! ;)
झालेल्या हल्ल्यांनी आणि त्यानंतरच्या आजवर चालू असलेल्या घटनाक्रमानं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना संयमाचा धडा दिलाय. :(.
खरंय विद्याधर.
त्यादिवशी खरंतर मीही खूप रडलो. मी तसा कधीच रडत नाही. अमेरिकेला शिक्षणासाठी येतानाही मी कधी रडलो नाही. पण २६ नोव्हेंबर हा एक वेगळाच दिवस होता. अजूनही मन खिन्न होतं आठवणीने. काय दोष होता मेलेल्यांचा?
मेलेल्यांचा काहीही दोष नाही. जिवंत असलेल्यांच्या भयानक चुका आणि मृत्यूची शिक्षा जनतेला.
मी मोर्चा नेला नाही... संपही केला नाही.. मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही... :)
Post a Comment