काल रात्री गादीवर पडल्यापडल्या काही ऐकू आलं. कोणी जोडपं प्रेमाने, अतिशय पोटतिडीकेने काही सांगण्याचा प्रयत्न करत होतं. मी त्यांचे विचार ऐकले. मनात आलं समाजाची एक जागरूक नागरिक ह्या नात्याने हे विचार जगभर पोचवण्याची माझी जबाबदारी आहे. आणि ती मी पार पाडायलाच हवी. (जबाबदाऱ्या टाळण्याचा माझा अजिबात स्वभाव नाही)
हे तरुण जोडपं सुरात, राष्ट्रीय भाषेत जगाला आपल्या अनुभव सांगायचा प्रयत्न करित आहे...विचार करण्यासारखेच त्यांचे अनुभव आहेत..आणि महत्वाचे म्हणजे ह्यावेळी स्त्री आणि पुरुष ह्यांचे एकमत झालेले दिसून येते...आपला असा चुकीचा समज आहे की स्त्री आणि पुरुष ह्यांचे अगदी उंदीर आणि मुंगुसासारखे नाते असते. (एकमेकांवर शिरजोर होण्याचे त्यांचे प्रयत्न तसे लपून नाही रहात...) त्या विचारधारेला इथे सपशेल तोडून टाकलेले दिसते. आणि नेहेमीच बघा, अतिशय गंभीर विचार संगीताच्या माध्यमातून पोचवले गेले की जनजागृती लवकर व मोठ्या प्रमाणात होण्याची संभावना असते. एखादा विचार सुचला की तो पसरवण्यासाठी कुठले माध्यम अधिक परिणामकारक ठरेल हा विचार अतिशय महत्वाचा असतो.
वाचा...विचार करा...
जोर का झटका हाये जोरों से लागा, हां लगा.
शादी बन गयी उमर कैद की सजा. हां सजा. (२)
ये ही उदासी, जान की प्यासी
शादी से अच्छा तुम ले लो फासी
लाखों दुखों की होती ये वजह, हां वजह
जोर का झटका हाये जोरों से लागा, हां लगा.
शादी बन गयी उमरकैद की सजा. हां सजा.
पुढील कडवे म्हणजे ह्यात आपले काय कर्तव्य आहे त्याची समज दिलेली आहे. म्हणजे ह्या जोडप्याचे विचार आपल्याला पटले तर त्या विचारांना हवेत सोडून न देता, नजीकच्या काळात जे आपले सगेसोयरे, मित्रमंडळी धोक्याची पाऊले उचलण्याची शक्यता आहे त्यांना सावध करण्याची त्यांनी आपल्याला विनंती केलेली दिसून येते.
जिसकी शादी पर जाना, उसको इतना समझाना
ना कर शादी, ये बरबादी, फिर ना पछताना.
हा मौका है पगले, शादी से बचले
समझा ले दिल को, ये शादी को मचले,
शादी के मंडप से तू खुद को भगा, हा भगा
जोर का झटका हाये जोरों से लगा, हां लगा.
शादी बन गयी उमरकैद की सजा. हां सजा. (२)
ह्या जोडप्यामध्ये अधून मधून वाद होताना आपल्याला दिसून येतात. परंतु तरी देखील सामाजिक जबाबदारी त्यांनी टाळलेली दिसत नाही.
पुढील विचार थोडे हिंसक वाटू शकतात. परंतु मग त्यातील भावना विचारात घेण्याची गरज आहे... त्या पसरवण्याची ओढ लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
सबसे पहले शादी थी, यारों जहाँ में जिसने की
उसको धुंडो, पकडो पीटो, गलती उसने की
वो था सौदाइ, बनके कसाई
उसने तो सबकी लुटीयां डुबायी,
पानी मिले ना मारो ऐसी जगाह,
जोर का झटका हाये जोरों से लगा, हां लगा.
शादी बन गयी उमरकैद की सजा. हां सजा. (२)
कधीकधी हे कवी, गीतकार फार मनच बोलून जातात नाही?
आजूबाजूला बघा जरा. सहचारी/सहचर बसलेले असतील आणि उगाच दाद द्यायला जाल आणि गोत्यात याल! भांडणाला कारणीभूत व्ह्यायला मला विषेशसं आवडत नाही!
मी खाली लिंक दिलेलीच आहे. तेव्हा तुम्ही हे गाणे ऐकालच पण सौरभच्या मदतीने मी बोल शोधून काढलेच होते म्हणून तुम्हांला अभ्यासासाठी आयते उपलब्ध करून दिलेले आहेत!
व्हिडिओ काही मला विशेष आवडला नाही. हे सल्लागार गीतकार आहेत इर्शाद कामिल आणि आपल्या ते कानावर पडून डोक्यात शिरावं ह्याची जबाबदारी उचलली आहे संगीतकार प्रीतम ह्यांनी. हे समाजकार्य केलेले आहे चित्रपट 'अॅक्शन रिप्ले' ने!

:p
21 comments:
मूल्यशिक्षण म्हणुन हे गाणं सर्व वधू-वर मेळावे भरवणाऱ्या संस्थांमधे वाजवले गेले पाहिजे. शिवाय लग्नात सप्तपदीच्या आधीदेखिल वाजवले गेले पाहिजे.
hehe!! सौरभ, मला दिसलंच लग्नात वाजवलेलं! परवाच एक लग्न attend केलंय! :p
खरे तर ७वी पासूनच्या बालभारतीमध्ये या गाण्याचा अंतर्भाव व्हायला हवा ...!
आणि `मुंजी'त पण हे गाणे वाजवायला हवेय... भिक्षावळीमध्ये मिरवणुकीत ...!!
माझ्या मित्रांना हे गाणे पटलेले दिसते! :p
but as u only say....log sirf khud ki galati se hi shiksha lena pasand karte hain....so i feel everyone mussssst make this mistake at least once :)
hmmmm Vandu,that is also true... and after making this mistake spread the message! Hai na? :)
:D किती ती मूल्यशिक्षणाची आस सगळ्यांना!
मस्त मस्त.. लग्नांचा सीझन सुरु झालाच आहे...मोबाईल मध्ये गाणं लोड करून घेतो आणि सगळ्या होतकरू मित्रांना ऐकवतो..
गौरी, public service campaign चाललंय! :p
श्री.खरे, बरोबर आहे तुमचे! म्हणजे आपण धोक्याची घंटा वाजवली होती असे तुम्ही नंतर म्हणू शकता! भेटीबद्दल आभार. :)
आम्ही लग्न करणार नाही!!!!!!!
सौरभ+११११
हेहे! संकेत घाबरला! संकेत घाबरला! :p
लग्न करू का नको ?????????
विचारात पडलो आहे ...
:) बायनरी बंड्या, सगळेजण ना स्वतः अनुभव घेऊन मग सल्ले देत फिरतात! तू पण तेच कर! म्हणजे मग 'अनुभवाचे बोल' असं जरा वजन पण येतं बोलण्याला! :)
हा हा हा... कैच्याकै !!
हे गाणं लग्नात वाजावं यासारखी दुसरी irony नाही ;)
हेरंब, अरे वाजेल बघ! हे पण वाजेल बँडवर! ;)
हे गाणं ह.भ.प. स्वामी अक्षयकुमार ह्यांच्या एका ग्रंथचित्रपटातलं असल्याकारणानं माझ्यासाठी आधीच श्लोकासमान आहे. त्यात संप्रदायाबाहेरच्या लोकांनाही त्यातल्या संदेशाचं व्यवस्थित आकलन होऊन त्यांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहून माझे डोळे भरून आलेत. :P
एक राहिलंच..
स्वामींचं ह्यापूर्वीचं एक पद, जे मध्यंतरी अनेक लग्नं गाजवत होतं, ते ही ऐका कधी 'तेणु घोडी किन्ने चड्डाया भूतनीके'..
विद्याधर, जगभर अनेक लोकांपर्यंत सुविचार पोचलेले बघून माझेही मन भरूनच आलंय! ब्लॉगमाध्यमाचा सदूपयोग! दुसरं काय?! ;)
आणि बरोब्बर! सिंग इस किंग! :D
जीवनविषयक तत्त्वज्ञान थोडक्यात सांगितलेलं आहे या गाण्यात. पण आम्ही रजनी आणि मिथुन संप्रदायातले असल्याकारणाने अक्षयकुमार महाराजांची जास्त स्तुती करू शकत नाही. त्यामुळे इत्यलम्... ;-)
हेहे! संकेत, असं नाही हा चालणार! कित्ती मोठा संदेश दिलाय अक्षय बुवांनी! ;)
Post a Comment