नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 24 November 2010

काटा

काटा रुते कुणाला...
आक्रंदतात कोणी....

रुतणारा काटा...
आक्रंदणारे कोणी...

काटा...
वजनाचा हो!

एका शोधाबद्दल वाचनात आले! वजनाचा काटा आणि स्त्रिया ह्यांच्या नात्याबद्दल.
मित्रांनो, लगेच हसू नका!
बायका वजन करण्याआधी कोणत्या मनस्थितीत असतात वा काट्यावर उभे रहाण्याआधी त्या कोणती काळजी घेतात ह्याविषयी आता संशोधन झाले आहे. आणि निकाल बाहेर आलेले आहेत.

असे लक्षात आले आहे की काही स्त्रिया काट्यावर एकच पाय ठेऊन उभ्या रहातात. त्यांच्या मते त्यामुळे आकडा कमी दिसू शकतो. काहींच्या मते अंगावरचे कपडे विनाकारण त्यांचे वजन अधिक दाखवतात. काहींचे सांगणे आहे की जेवणापूर्वी वजन करणे ह्यातच भले आहे. दहातील चार स्त्रिया काट्यावर उभे रहाण्यापुर्वी एकदा पोट रिकामे करून येतात. त्यांचे सांगणे असे आहे की त्यामुळे तो काटा, तुमचे वजन थोडे कमीच दाखवतो. श्वास रोधून धरा आणि मगच चढा त्या क्रूर काट्यावर. अशाने त्याला तुमचे वजन कमी दाखवणे भागच पडते! काही ३ टक्के स्त्रियांनी मात्र त्यांचा काही वर्षांचा अभ्यास आपल्यासमोर उघड केलेला आहे. तो असा की जेव्हा काळ्या काळ्या आभाळात गोल गोल चंद्र झळाळत असतो त्यावेळी त्या काट्यावर ठामपणे जरी उभ्या राहिल्या तरी देखील त्यांचे वजन कमीच भरते.
९०% स्त्रियांना वजन कमी करण्याची तीव्र इच्छा असते व ८५% स्त्रियांचे मानसिक संतुलन वजन वाढल्याकारणाने बिघडते.
आता स्त्रियांचे असे मानसिक संतुलन बिघडण्यामागे हात कोणाचा? प्रबंध दर्शवतो की ही जबाबदारी आहे 'डाएट इंडस्ट्री' ची! ही लोकं रोज उठून स्त्रियांना त्यांच्या वजनाबद्दल काळजी करण्यास भरीस घालतात. स्वतःचे खाद्य पदार्थ किंवा व्यायामाची साधने ह्याविषयी ठीकठिकाणी जाहिराती करून! (म्हणजे आमच्याच पोटावर पाय! :))
आता ह्या सर्व संशोधानानंतर चिंताजनक एक बाब पुढे आली आहे ती म्हणजे जगभर ह्या वजनाच्या काट्यामुळे अनेक स्त्रिया आपले मानसिक संतुलन हरवून बसत आहेत! ८५% स्त्रियांचा दिवस काट्यावरचा तो आकडा बघितला की अतिशय खराब मनस्थितीत जात आहे! कारण अतिशय निरुपयोगी माहिती त्यांनी सकाळी सकाळीच आपल्या मेंदूत टाकली आहे!

हम्म्म्म! मला हे मात्र कळत नाही की ह्यात स्त्रीपुरुष हा भेदभाव का केला गेला आहे? ऑफिसमध्ये बायकांपेक्षा रडके पुरुषच तर जास्ती दिसून येत असतात! अगदी मस्त गुटगुटीत बाळ, येतं आपलं रडकं तोंड घेऊन हापिसात! रोज! आणि कारणे असतात बऱ्याचदा क्षुल्लक! स्त्रियांना त्या डोंबाऱ्याच्या खेळातल्या दोरीवरचा तोल प्रत्येक क्षणाला सांभाळायचा असतो...आणि किती कौशल्यपूर्णरित्या स्त्रिया तो सांभाळतात!

तर मैत्रिणींनो, माझ्या आता लक्षात आलंय! आणि तेच खरं आहे! शरीराचं जाऊ द्या गं! समाजात आपलं वजन वाढतंय ना? मग वाढू द्या ते! अगदी वाढता वाढता वाढे...भेदिले सूर्य मंडळा!

काढूया तो काटा!
रुतणारा....
आक्रंदवणारा!
:)

21 comments:

हेरंब said...

मी तर म्हणतो सरळ काट्याने काटा काढावा.. वजनाचा काटा चढताना दिसला की सरळ चापायचं आईसक्रीम आणि चीज पिझ्झा.. ;)

Anagha said...

hehe! Yes! अगदी CCDत जाऊन सर्वात जास्ती ज्यात कॅलरीझ आहेत ना तेच खावं! मी त्यादिवशी जाऊन हेच विचारलं तिथल्या मुलाला! "सांग पाहू, ह्या मेन्यू कार्डात सगळ्यात जास्त वजनदार काय आहे? तेच आण तू मला!" :)

Raindrop said...

kaanntaaa lagaaa....ti chaddi out of jeans wali mulgi athavtey ka??? taslya bayka yetaat TV var ani panchayat aamchi hote na!

jasta wazan dakhvlya war bechara kaata amhanna baghun kaay mhanat asel....'wo dekho mujh se rooth kar meri jaan ja rahi hai'....

Anagha said...

वंदू! That's funny! दिसलाच मला तो काटा टिपं गाळताना!! :p

Soumitra said...

tuja post ni aaj vajan kata nakki modlas kasle bhari lihile ahes tu bichara kata, tyala kalpanahi nasel ki itke oze tyacha angavar padnar ahe mhanun, mast zali ahe post, by the u r have written MAITRININO kai ga mitransathi nahi ahe ka aajchi post ka government sarkhe reserved post sarkhe ahe???

सौरभ said...

समाजात आपलं वजन वाढतंय ना? मग वाढू द्या ते! << वाह वाह... ह्यावर जोरदार टाळ्या... वजन घटवण्याचं सोडा.. वजन वाढवण्याचे काही मार्ग आहेत का?? आपलं वजन वाढतच नाही राव... :-S

Anagha said...

बारकुट्या! सौरभ, कुठलं वजन वाढत नाहीये? समाजातलं की अंगावरचं?? ;)

सौरभ said...

:P hehe... दोन्हीकडल वजन नाही वाढत्ये.

Anagha said...

सौमित्र, तेच तर! मला पण कळलं नाही की ते संशोधन फक्त बायकांसाठीच का होते!! ;)

sanket said...

उगाचच स्त्रियांवरचे संशोधन करतात हे.. मीसुद्धा वजनाचा काटा बघतो आणि झोप उडते. एक अनुभवाने सांगतो, वजनाचा काटा बघून डाएटिंगच्या काटेरी मार्गाने जाऊ नये.माझा वाढतच नव्हता. वजनाची चिंता करणे बंद केले आणि वाढला :) आता जरा सामाजिक वजन वाढवायचा विचार आहे, म्हणून त्याचीदेखील चिंता करणे बंद केले :P

पुलंचे वाक्य आठवले, "छे छे ! वजनाचा मार्ग भलत्याच काट्यावरून जातो !"

Anagha said...

संकेत, म्हणजे 'आपण चिंता केली कि हवा तो end result मिळत नाही. उलटेच घडते! आणि चिंता सोडून दिली कि आपोआप आपल्याला हवे असेल तेच घडते!'
ब्येस ना? पहाटे उगाच गजर लावून उठा. झोपेत पण तरीही तरातरा मैदानाला फेऱ्या मारा...त्यापेक्षा चिंता सोडून मस्त दुलईत झोपलेले बरे! नाही का? काटा न रुतवून घेतलेलाच बरा! :)

THEPROPHET said...

सरळ काट्याने काटा काढावा +१

शर्मिला said...

हेहे..मस्त पोस्ट!काटेकोरपणे वाचून काढलं अगदी. आवडलंच.
आधीची सुद्धा छानच आहेत.

Anagha said...

आभार शर्मिला! :)

Anagha said...

विद्याधर, काटा लगा...हाय लगा... :)

भानस said...

हा हा... काटा लगाSSS... आयमीन चढा की लगेच कावरेबावरे चेहरे अन संकल्पांचे नेम... पण हाय! येती समोर तो बटाटेवडा अन वाकुल्या दाखवी वजनाचा तो दुष्ट काटा.... जाऊ दे. मस्त तल्लीनतेने वडा खाऊनच काटा काढावा म्हणतेय... :P

भारी गो!! :)

Anagha said...

आली गsssssss माझी बाय! भाग्यश्री! मस्त खा गं तू वडे! त्या दिवशी आपला 'आमचा गल्लीतला फेमस अशोकाचा वडा पाव' पण खायचा राहिला बघ! कधी येतेयस बोल?! :)

रोहन... said...

तुला कसली त्याची चिंता.. तुझे वजन जन्मात वाढणार नाही आहे... :D

Anagha said...

रोहन, हे वजनाचे आक्रमण ना अगदी गपचूप होतं! पत्ता लागत नाही! आणि काही सांगता येत नाही! कोणावरही होऊ शकतं! आभार प्रतिक्रियेबद्दल.:)

Shriraj said...

"रडके पुरुष" काय!!! असू दे , असू दे!!! :D

वाचायला सुरुवात करताना मी कल्पना देखील केली नव्हती "काटा रुते कुणाला"चा संबंध तू वजनाच्या काट्याशी लावशील :) यू आर ग्रेट!!!

Anagha said...

हीही! "रडके पुरुष" - श्रीराज, तुला बरं तेच दिसलं बरोब्बर! हल्लीच लग्न झाल्यामुळे काय? ;)