वर्ष संपत आलंय...आणि आता जगभर भरात आलीय जुगलबंदीची तयारी! जुगलबंदी...कान्स, क्लिओ, वन शो ह्या आंतरराष्ट्रीय जाहिरातक्षेत्रातील अवॉर्डससाठी!
रोजच्या कामासाठी, क्रिएटिव्ह+सर्विसिंग असे ग्रुप पाडलेले असतात आणि त्या ग्रुपकडे दिलेले असतात वेगवेगळे ब्रॅन्ड. आपल्या ब्रॅन्डवर चांगले काम करण्याची जबाबदारी प्रत्येकाची. सिनियर असो वा जुनियर. अधिक बिझनेस मिळवण्याची जबाबदारी देखील प्रत्येकाची. त्यावर अवलंबून इन्क्रिमेंट आणि अर्थात त्यामागोमाग प्रमोशन! अगदी लक्ष्मी येते घरा!
प्रत्येकाला कान्स हवं असतं. क्लिओ तर घरी घेऊन जायचंच असतं. तर 'एक 'वन शो' मिल जाये यार, लाइफ बन जायेगी' हा कोणासाठी श्लोक असतो!
मग मेहेनत. रात्रंदिवस डोके खाजवणे. जाडजूड पुस्तके चाळणे. हजारो साइट्सचा रोज दरवाजा ठोठावणे. जुन्या विनिंग एन्ट्रीज मन लावून अभ्यासणे. मग असेल नशीब साथीला तर पेटेल तो बल्ब. नाहीतर कितीही वेळा बटण खालीवर करा. नाही म्हणजे नाहीच पेटणार तो! लागला का बल्ब? चला तर मग. लागा कामाला. मारा स्क्रिबल्स. कॉपी लिहा, इमेजेस शोधा. फोटोशॉप उघडा. कापाकापी, खोडाखोडी, चिकटवाचिकटवी! काय झालं? गरमागरम तय्यार झाल्यावर रद्दी वाटतेय का आयडीया? हरकत नाही! खेचा ती फाईल...द्या फेकून ट्रॅशमध्ये! ढोर मेहेनत घ्यावी...लाल झणझणीत कालवण करावं...आणि चव घ्यावी तेव्हा कळावं...पापलेटातच दम नाही राव! चालायचंच! सगळ्याच स्पर्मसचं गुटगुटीत बाळ नाही होत! अहोsss, घड्याळाकडे नका बघू! नाइट मारायला लागणारच आहे! त्याशिवाय ती सोनेरी, चंदेरी, रुपेरी पारितोषिकं कशी येणार तुमच्या शेल्फवर? एक लक्षात घ्या, अख्ख्या जगभरातले मेंदू लागलेत कामाला. ऐरेगैरे नाहीत! जगभरातील कल्पक लोकांचं रँकिंग ठरवलं जातं. आणि त्यात वर नंबर लागण्यासाठी सगळेच मेंदू दर वर्षी, मोठ्या हिरीरीने कामाला लागलेले असतात. अचंबित करणाऱ्या त्या एकेक जाहिराती म्हणजे जसा एकेक कोहिनूर हिरा! डोळे दिपवणारा!
तेंव्हा हारजीत...सगळंच दुय्यम. उलट 'हम भी कम नही!' हाच अॅटिटयूड कामास येतो. दर वर्षी तितक्याच उत्साहाने...आपल्या कामाची पातळी अधिकाधिक वरच्या प्रतीला नेण्याची प्रबळ इच्छाच तारून नेते ह्या वादळात. जसा तो कोळी...पुन्हा पुन्हा कोसळून पडणारा...अपयशामुळे निराश न होणारा...सावजासाठी जाळं विणणारा!
रोज ऑफिसच्या मेलबॉक्स मध्ये वरिष्ठांच्या धमक्या येऊन पडतायत! म्हणजे अगदी गन पॉइंटवर चाललंय युध्द! "अवॉर्ड मिळवा! नाही तर याद राखा!"
विचार करा...हे तुंबळ युद्ध हजारो, लाखो कल्पनांमध्ये दर वर्षी सुरु होतं. आणि जाहिराती म्हणजे फक्त वर्तमानपत्र वा टीव्ही वर ज्या दिसतात तितक्याच, इतकं हे रूप सीमित नव्हे.
त्या उलट ह्या धरतीवरील प्रत्येक मनुष्यप्राणी हा जर माझा 'टारगेट ऑडीयन्स' असेल तर मग त्याच्या रोजच्या वावरण्याच्या जागा, सवयी...ह्या बारीकसारीक गोष्टी देखील लक्षात घेऊन केल्या गेलेल्या प्रत्येक जाहिराती ह्या स्पर्धेत भाग घेतात. म्हणजेच...विविध कॅटॅगरीज. उदाहरणार्थ...प्रिंट, फिल्म, डिजीटल, डिरेक्ट मार्केटिंग, आउटडोर, मिडीया...
हे एव्हढं सगळं लक्षात घेऊन, मेंदूचं कुरुक्षेत्र करून समजा सुचलीच काही आयडेची कल्पना...तरी पुढचा प्रवास काही सोप्पा नाही राव! लगेच येत नाही ती सोनेरी झळाळी तुमच्या CV ला! आधी मुंबई ऑफिस, नंतर इंडिया हेड...चर्चा झाडणार, विचार विनिमय होणार...मग ठरणार त्या आयडियेचं भवितव्य. तुम्ही जन्म दिलात...तुमचं बाळ तुम्हांला साजरं वाटलं...गोजिरं वाटलं...पण सगळ्या बाळांमध्ये सोडलंत तर दिसतंय का ते उठून? आणतंय का ते इतरांच्या मेंदूला झिणझिण्या? हे मला का नाही सुचलं...हा असा निरुत्तर प्रश्न उभा करतंय का ते इतरांच्या मनात? म्हणजे अगदी..'kickass' आहे का तुमची idea? लावेल का त्यावर तुमचं ऑफिस पैसे? आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या प्रवेश फीचे हजारो रुपडे लावले जातील का त्यावर?
...हे आणि असे दर वर्षी मोहोळ उठवणारे प्रश्न. आत्मविश्वास भरीला घालणारे. सगळ्यांचा एकच मंत्र. गेल्या वर्षी नाही तर नाही...You never know ...कदाचित हे वर्ष माझं असेल...आणि धातू प्रसन्न होतील!
...मंडळी ही अशी रस्सीखेच.
शिरजोरी.
मगजमारी...
बारबार. लगातार.
अथक धडपड.
लॉटरी ती. लागली तर लागली. नाही तर नाही.
गेल्या काही वर्षांतील मला आवडलेल्या काही भारतीय/जागतिक जाहिराती...मन लोभून टाकणाऱ्या...जळवणाऱ्या...हे असं मला कधी सुचणार असे निराशेचे झटके देणाऱ्या...आपण 'कान्स' न मारताच इतिहासजमा होणार का, असा अनुत्तरीत प्रश्न दर वर्षी उठवणाऱ्या...
(कृपया ह्या जाहिराती मोठ्या करून बघण्यात याव्यात. प्रेक्षकाच्या/वाचकाच्या बुद्धीक्षमतेचा मान राखून त्या केलेल्या आहेत...अगदी A for Apple न देता.)
रेनोल्ड्सचा व्हिडिओ आणि त्यानंतरचे काम (क्रमांक ४ नंतर) म्हणजे गेल्या काही वर्षांतील 'सावजाची वाट पहात जाळं विणण्याचे माझे प्रयत्न!'

18 comments:
कसल्या भारी जाहिराती...एक से एक...
तुम्हाला शुभेच्छा! :)
विद्याधर, आभार! खूप गरज असते बुवा शुभेच्छांची!! दरवर्षी!! :p :D
मला शेवटच्या ५च आवडल्या. खास करुन Recyclable Eyes!!!
आणि श्री गुलजार साहेब >> बारिश आपको छुती है.
वाह वाह वाह!!!! gr8 thought!!!
अनघा, हे असं 'हुकमी' सृजनशीलता दाखवणं कर्मकठीण वाटतं गं !!! आणि तू व तुझे कलाकार मित्र ते जमावाताय यातच तुमचं मोठेपण आहे...तुला माझ्याकडून या सर्व स्पर्धांसाठी खास खास शुभेच्छा!!!
जब्बरदस्त !!! त्या नेत्रदानाच्या जाहिरातीतली (फोल्डिंगच्या) अपिलिंग कन्सेप्ट मला जाआआआम आवडली. खुपच सही..
आणि नाईकेचा व्हिडीओ बघितल्यावर तुझ्या ब्लॉगच्या नावाचं कोडंही उलगडलं :)
पार्टीला कुठे भेटायचं? कारण तुला बक्षीस मिळणार हे तर नक्की !!! :D
menduche kurukshetra :) that's an expression that totally defines the state of ones mind as they battle not only for awards but also trying to do regular bread n butter work along side. it's like the dance of the droplets on a garam garam tava :) but once the award is in ur hands....all that mehnat seems so much worth it :)
of course u know...u won so many ;)
भन्नाट जाहिराती.. काय डोके लढवले आहे. मलातर बुवा सगळ्याच आवडल्या.. स्पर्धेसाठी शुभेच्छा !!!
गुलजार ग्रेटच ना सौरभ! किती सुंदर बोलतात ते! मला त्यांची सॅमसंग गुरु फोनची ओळ सुद्धा खूप आवडते..'दिल को जेब में रखा है!' सॉलिड आहेत बुवा ते!
आणि तू पुढे लिहिलेलं वाचून मला माझ्या छोट्या बहिणीची आठवण झाली! लहानपणी मी कसलं चित्र काढलं कि ही जाऊन हॉलमध्ये टेबलावर नेऊन ठेवायची! म्हणजे मग येणारे पाहुणे बिचारे जबरदस्तीने म्हणायचे,"व्वा व्वा! छानच आहे! कोणी काढलं?"
खी खी!! :p
आभार रे श्रीराज! गरज आहे खूप!! :)
बोडकं माझं वंदू! नुसतं घाम गाळणं चाललंय!! आणि आता तू पण नाहीस ना! मग कुठे उगाच काही मोठ्या आयडिया काढू? ज्याला एव्ही ची गरज असेल!! ते रेनॉल्ड्स, नायकी तू होतीस म्हणून ठीक होतं! :) :)
संकेत, आभार रे! दुनियाभर लोकं डोकी लढवतायत!! वेडीच आहेत! :p
सिंप्ली ग्रेट..खूप खूप शुभेच्छा
हेहे! हेरंब, कळलं ना तुला ब्लॉगच्या नावाचं गुपित!? :) अरे, सगळ्या जगात मोठमोठी लोकं, ही अवॉर्ड्स खेचून आणायच्या कामाला लागलेली असतात! मी 'किस झाड की पत्ती' आहे! :D
धन्यवाद रे सुहास! :)
Just Realized !
Brain Dose Matter too !!
he he he !!
Nice Ads !
Simply Superb!!
All the best !!
जबरदस्तच......सर्व जाहिराती सुंदर आहेत.....Nike आणि recyclable eye ची जाहिरात मला फारच आवडली...."मेंदूचं कुरुक्षेत्र" ची कल्पना फारच आवडली....स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा !!!
पांडा, धन्यवाद! :)
धन्यवाद रे दीपक! भेजा फ्राय चालू असते आमचे सातत्याने! :)
Post a Comment