नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 12 November 2010

भटकते आत्मे!

अकरा वाजून गेले होते.
दोघी झोपायच्या तयारीत होतो. आपापल्या जगात हरवून जाण्याआधीच्या गप्पा चालू होत्या.

"आई, तू मेलीस ना की मी तुला अशीच ठेवून देईन माझ्या बाजूला!"
"अगं, नको! उगाच सायको २ होईल ते!"
"असं म्हणतेस? मग काय करू मी?"
"तू ना, अगं, ते देहदान करून टाक. उगाच जळल्लं मेलं ते, करून जाळून नको टाकूस!"
"हम्म्म्म. ते लिहून ठेव हा आई कुठेतरी!"
"अगं, लिहून कशाला ठेवायला पाहिजे? सांगितलं न मी तुला!"
"असं चालतं?"
"हो!"
"पण मग, मला काय उरणार?"
"अगं आपल्यात एक बरं असतं!"
"काय?"
"आपले आत्मे ना, भटकत रहातात!"
"मग त्याचं काय?"
"अगं, मी अजिबात तुला सोडून जाणार नाही कुठ्ठे! इथेच राहीन वर कपाटावर बसून!"
"हां! चालेल! पण मग आजोबा, बाबा, सगळे तुम्ही वर असणार का बसून?"
"हो! झोप आता!"

I just hope, आत्म्यांना कळतं की कधी आपल्या माणसांच्या आयुष्यात भटकायचं आणि कधी निघून जायचं! नाही तर बसलेत आपले कायम कपाटावर पाय हलवत!
नाही का?

19 comments:

Raindrop said...

exactly my thoughts....bedroom madhe nako haan please. atma la ticket lagat naahi...tar magh paris...japan...vienna firayala za na...kashala te eka kapatawar basun paay halwayache diwas bhar???? world tour is a better idea!

Anagha said...

hehe!! Vandu, that's a good idea!! Paris raahilay ajun maaz!! :D

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अगं हो! माझ्याही मनात असा विचार येतो की समजा आत्मे खरंच भटकत असतील, तर आपल्या प्रायव्हसीवर गदाच की!

बाकी तू ब्लॉगच्या नावाशी प्रामाणिक राहून न कंटाळता रोज एक पोस्ट टाकते आहेस, हे मी पहातेय. Keep it up. अभिनंदन!

Anagha said...

कांचन, आदाब आदाब! :)

Deepak Parulekar said...

मम आत्मा गमला !!
सही आहे !!

Anagha said...

दीपक, अगदी बाल गंधर्व स्टाईल का? आभार! :)

THEPROPHET said...

ह्या पोस्टचं ज्यॉनर ओळखणार्‍याला अनघातर्फे १०० रू. बक्षीस! :)
बाय द वे, लहानपणी मुंबई-भुवनेश्वर ट्रेनमध्ये वाचलेलं 'सुपर कमांडो ध्रुव' चं 'आत्मा के चोर' हे कॉमिक आठवलं! (मला हे कळत नाही की ह्या सगळ्या ऍक्शन स्टोरीज असून ह्यांना कॉमिक बुक्स का म्हणतात?)

Anagha said...

विद्याधर, simple! Black humour! :) :)

Raindrop said...

arrey re re mjahe bakshish che 100 rupaye kuthe aahet????

Anagha said...

Vandu!!!!! :p

Shriraj said...

:P

तुम्ही माय-लेकी म्हणजे भयंकरच आहात बुवा!!! :D

Anagha said...

:) हो ना श्रीराज? घटनांमध्ये विनोदच शोधलेला बरा असतो! नाही का?

Shriraj said...

खरं आहे अनघा! :)

सौरभ said...

:P भुतांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळा कपाटावर बसून.

मला दोन भुतोळी सुचल्या >>
अटक मटक चवळी चटक
पिंपळाच्या झाडावर जाऊन लटक :D :D :)

Anagha said...

हेहे! सौरभ, मी तुझ्या बॉलची वाटच बघत होते!!! भुतोळी(!!) छानच आहे!!! :D :D :D

Shriraj said...

Saurabh Murlidharan!!!! :D:D

Anagha said...

रोज एक नवीन नाव मिळतंय ह्या सौरभला! बाबा बोंगाळे, सौरभ मुरलीधरन!! हेहे!! छान! :D

रोहन... said...

माणसांना नसले कळत तरी आत्म्यांना नक्की कळत असणार कधी आपल्या माणसांच्या आयुष्यात भटकायचं आणि कधी निघून जायचं.. शेवटी ते पुढचे आयुष्य... पुढचे व्हर्जन म्हणजे सुधारित असणारच की.. :D

Anagha said...

hehe! That's a good one Rohan!:D