"Madam, have you seen his face? He is your husband, right?" हिरव्या गणवेषातील अरबी पोलिसाने मोडक्या इंग्रजीत तिला विचारले. स्ट्रेचरकडे नजर टाकली. झाकलेल्या शरीराची उंची परिचयाची होती. त्या निश्चल शरीराने दुरूनच तिला खोल गर्तेत ढकलून दिले.
"Madam, sign please."
"Does this document say accidental death?"
"Yes Madam."
"Does this document say accidental death?"
"Yes Madam."
सविताने अरबी कागदांवर सही केली. प्रेतालयातून ती बाहेर पडली. सुन्न मनाला ते पळतं शहर दिसत होतं, जसं काही पांढऱ्या पडद्यावरील हलतं चित्रं. फक्त घडलेली गोष्ट कुठल्या सिनेमाची रंजक कथा नव्हती. कुठल्याही एडिटरने त्या कथेला कातर लावली नव्हती. सेन्सॉर बोर्डाचे काहीही आक्षेप नव्हते. सगळं कसं उपरवाल्याने लिहिले आणि पृथ्वीवर बाहुल्यांनी जसेच्या तसे पूर्णत्वास नेले. लिहिणाऱ्याच्या मनात सरसरली तशीच ती कथा सत्यात उतरली. बिभत्स, करूण...अगदी 'कहानी में ट्विस्ट' सहित.
नवऱ्याच्या मित्राने सवितासाठी गाडीचं दार उघडलं.
शून्य...
तरंगता झुला.
18 comments:
hmmmmm
.
आज खूप दिवसांनी तुझ्याकडे आले, आणि हे वाचलं ... कळतच नाहीये कार प्रतिक्रिया देऊ ते. तो अनुभव थेट पोहोचवलास इतकच म्हणते.
गौरी, इतक्या दिवसांनी आलीस, आणि मी हे असं तुझ्यापुढे वाचायला ठेवलं. :(
kai ga Anagha shunyatun baher padayla evdhe mitra maitrini astana , shunyacha seemaresha olandun ek paul pudhe tak na, bagh sagle jan adhar denare ahet tula, cheer up Anagha
शुन्य को निहारती
अबोध सी खड़ी थी मैं
एकाग्रता का स्वांग कर
सोच में पड़ी थी मैं
श्वास की ध्वनि का बस
एकटक वो गीत है
सुन्न से ये साज़ हैं
शुन्य का संगीत है
it takes time to come out of it. the black hole of nothingness that savita is in is what will give her the lightness to fly later.
Vandu, that's beautiful! On the spot ka ga?? :)
सौमित्र, अरे मी ना सारखी आतबाहेर करत असते!!! म्हणजे अगदी तळ्यात मळ्यात! :( :)
no ya...had written it longtime back...I just thought it belonged here.
:) मला वाटलं, मी तुला स्फूर्ती दिली!! :D
शून्य!!! ज्यातून एक जग निर्माण झालं. एक असा शून्य जिकडे अथांग पसरलेली negativity संपुष्टात येते... आणि जेथे positivity चालू होते... पुढे कधीही थोपवता नं येणारी. :)
हो ना सौरभ! आणि आपणच जगाला दिलं हे शून्य! :)
:( शून्य. तिथून स्वत:चा शोध मात्र तू खूप छान चालू केला आहेस अनघा.
अलका, खरंय...खरंच स्वतःचा शोध चालू केलाय...तुम्हां सगळ्यांच्या सोबतीने...बरोबर ओळखलंस तू... :)
निशब्द ..
:(
I was in same state as "THE PROPHET"
जखमेवरची खपली परत परत काढू नकोस अनघा. काळच याच औषध आहे. आणि हो शुन्यातुनाच नवी निर्मिती होंत असते आणि तू तर ती कधीच सुरु केली आहेस. रोज तू लिहिलेल वाचल्या शिवाय मी कामाची सुरुवात करतच नाही. तुला मनापासून खुप खुप शुभेच्छा. खुप छान लिही.
धन्यवाद गं जुई. :)
काय गं हे... :( तुझे हे सारखे तळ्यात मळ्यात करणे थांबव आता.
Post a Comment