नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 26 September 2011

पाषाणफुले...

कासचे पठार. सातारा.
रंगीबेरंगी. जसा एखादा कॅनव्हास असावा. व चित्रकाराचा आत्मविश्वास कसा भरभरून रंगाच्या प्रत्येक फटकाऱ्यातून त्यावर अवतरावा. पेलिकन व्हाईट, लेमन येलो, मॅजेंटा, वर्मिलियन...रंगांचे ठिपके. कुठेही नजर टाका....विखुरलेले. व त्यावर निळा पडदा. वर उचललेला. सुंदर. अप्रतिम. अजब. काळ्या कुळकुळीत पाषाणावर मूठ मूठ माती. व त्यावर हे असे रंगांचे साम्राज्य. कसे असे असू शकते ? मनी प्रश्र्न उभा रहातोच. फुलायचे मनात धरले तर कुठेही फुलता येते...का असे सांगणे होते...त्या निसर्गाचे ? ते पाषाण, आयुष्यभर रखरखीत देखील पडून राहिले असते...नाही का ? पण नाही. असे काळे नशीब त्यांचे नव्हते...त्यांच्या नशिबी फुलायचे होते. आणि म्हणून तर मुठभर लाल माती त्यांचे आयुष्य फुलवून गेली...त्यावर कधी हिरवे तर कधी मोरपंखी रांगोळीचे रंग शिंपडून गेली. लाल कुंकू...पिवळी हळद...भरभरून देऊन गेली. 










किती ती नाजूकता...सगळंच अलगद...हलकेच....कुठेही उग्र असे काहीही नाही...दूरदूर काळ्या शिल्पांवर...मखमली रंगीत शाल अंथरलेली...असे निजून राहावयास कोण नको म्हणेल ? ते काळे पाषाण तर त्या स्पर्शाने अगदी फुलून निघाल्यासारखेच तर दिसत होते. फुलांवरचे नक्षीकाम...त्यांचे विविध आकार...तोंडात बोटे जावीत इतकी कल्पकता...निर्मितीत कुठेही तोचतोचपणा नाही. अजब. तो चित्रकारच दैवी.

एक वेडे फूल...म्हणे त्यावर फुलपाखरू येऊन क्षणभर विसावते...त्या फुलपाखराचे त्या नाजूक पाकळीला ओझे होते...हलकेच द्वार उघडते...आणि आश्चर्य बाहेर डोकावते....पिवळे परागकण...एका अवसारात ते फुलपाखरू उडून जाते...द्वार पुन्हा बंद होते...पुढल्या फुलपाखराची मनी आस धरत...

एकदा तरी नक्की जा...एखादी नाजूक गोष्ट आयुष्यात कधीतरी मन फुलवून गेलीच असेल ना...आणि आयुष्यातील ह्या रोजच्या धकाधकीत त्याचा विसर पडला...होय ना...?...मग तर नक्की जा...बघा...मन किती हलके होईल...तिथून निघून जाल...आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रोजच्या रुक्ष आयुषात शिराल. त्या समोरच्या सपाट भगभगीत कम्पुटरच्या स्क्रीनकडे बघून डोळे मिटाल तर ते रंगीत ठिबकेच दिसत रहातील...डोळ्यांसमोर नाचत रहातील. डोळे शांत होतील. कुठे तो नजरेत न मावणारा, मैलोंमैल पसरलेला रंगीत आसमंत आणि कुठे ती इनमीन दीड फुटावर जाऊन स्क्रिनवर आपटणारी नजर. काय तुलना ह्या दोघांत ? 
थकलेले डोळे...आणि भागलेले मन...त्यांचा हक्कच नाही का ह्या सुखावर ?
:)

26 comments:

हेरंब said...

सुंदर सुंदर... !! गेले दोन दिवस ब्लॉग्ज, बझ, फेबु जिथे बघावं तिथे कास, कास कास चालू आहे (आणि मी आपला मनातल्या मनात काश काश म्हणतोय :( )

>> पेलिकन व्हाईट, लेमन येलो, मॅजेंटा, वर्मिलियन..

यातलं व्हाईट आणि यलो सोडून मला काहीही कळलं नाही ;)

Pankaj - भटकंती Unlimited said...

आणि लोक परत जाताना फोनही करत नाहीत !

Suhas Diwakar Zele said...

पेलिकन व्हाईट, लेमन येलो, मॅजेंटा, वर्मिलियन.. +१ ;-)

तशी ह्या फुलांबद्दल फार कमी माहिती आहे, आज अजुन भर त्यात. धन्स गं :) :)

अपर्णा said...

कासचे तुम्हा सर्वांचे फोटोपाहून काश म्हणतेय...मस्त ग....आता पाहूया आमचा नंबर कवा लागतो ते....

Anand Kale said...

तरी मी सांगितलं होतं... दिपक श्रोतींच "कास" हे पुस्तक घेऊन जा... त्यात या सगळ्या फुलांची मराठी आणि ईंग्रजी नावे माहीती सह दिली आहेत..

बाकी वर्णन सुंदर...

Mahendra Kulkarni said...

माझं जमलं नाही, पण फोटो पाहून बरं वाटलं.. नेक्स्ट टाइम!!

Gouri said...

मस्त!

आ. का, पुस्तक नेलं होतं ... आणि त्याचा भरपूर उपयोगही केला तिथे.

आता बाकी सगळ्यांनी पण पटापट पोस्टा टाका बरं ... म्हणजे मी सगळ्यांच्या फक्त लिंक्स देईन माझ्या ब्लॉगवर ;)

Anagha said...

हेरंबा, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दिलेयत की नाही ? विसरलात वाटतं पोस्टर कलरच्या बाटल्या, वॉटर कलरच्या ट्युबा ?! :)
आणि...या आता परतून ! म्हणजे मग आम्ही पण कायम तुम्हांला मिस नाही करत रहाणार ! :)

Anagha said...

पंकज महाराज. राहिलं खरं...सगळेच दमून गेले होते आणि बऱ्याच जणांना लांबचा पल्ला मारायचा होता...त्यामुळे... :)
रुसू नका...थोडं समजून घ्या राव ! :):)

Anagha said...

सुहास, मला तिथपर्यंत पोचवल्याबद्द्ल तुझेच आभार ! :) :)

Anagha said...

ह्म्म्म...अपर्णा, अगं माझं आता तुझ्याशी भेटणं राहून गेलंय...माहितेय का तुला ? ह्या खेपेला गौरी पण भेटली...खूप छान वाटलं ! 'या चिमण्यांनो...परत फिरा'....गातेय हा मी इथे बसून ! :p :)

Anagha said...

आ का, अरे अगदी खास माहितगार होता ना बरोबर पुस्तक हातात घेऊन ! गौरी बाई ! फक्त ज्ञान देणारा कितीही देईल पण घेणाऱ्याची ती कुवत तर असायला हवी ! :) माझे डोळे आपले ते सुंदर सुंदर आकार आणि सुरेख रंग बघूनच दिपले होते ! :)
धन्यवाद रे ! :)

Anagha said...

महेंद्र, खरंच का बरं नाही आलात तुम्ही ? :)
कधीतरी नक्की भेट द्या मात्र ह्या अनोख्या फूलप्रदेशाला ! :)
आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

Anagha said...

हेहे ! गौरी, अजिबात चालणार नाही ! तू काढलेले छान छान फोटो आणि त्यांची नावे...ह्याची वाट बघतेय मी ! :)

विनायक पंडित said...

जबरा!!! सगळीकडे कास कास आणि आम्ही न गेलेल्यांच्या मनात काश काश हे अगदी खरं! अ प्र ति म फोटो! (हे ऍक्च्यूअली आमचा एक मित्र श्री राजीव नाईक याच्या स्टाईलमधे म्हणायचंय एकदा! :)) खरंच! आणि त्यावर तुमचं तरल लिहिणं.सॉलिड मोठी ट्रीट अनघा! आभार! नक्की जाणार कासला!

Anonymous said...

ए मी दिलीये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट आणि पासही झालेय ;) आणि तरिही मला हे सगळे रंग पटापट आठवत नाहीत (हे महत्त्वाचे ;) ) .... अगं नुसते हळहळतेय मी हे फोटो पाहून, ते नसे थोडके की तुम्ही सगळे एकत्र गेलात ती धमालही मिस केल्याचे दु:ख :( ....

पण हे फोटो पाहून अक्षरश: तृप्त व्हायला होतेय!! मस्त मस्त आणि मस्त!!!!

Shriraj said...

"फुलायचे मनात धरले तर कुठेही फुलता येते..." क्या बात है!! सही सही. फोटो तर भारीच!!!

सौरभ said...

लै भारी... btw माझ्या असं कानावर आलं की तिकडच्या काही फुलांना सीतेचे अश्रु असं काहीसं नाव आहे!!! :P ;)

Raindrop said...

looks like u had a lovely weekend :)

अपर्णा said...

अनघा आता फक्त मीच राहिली असं म्हणूया हव तर....बघूया कधी नंबर लागतो ते...
काश.......

Anagha said...

विनायक, नक्की जाच कासला. कॅमेरा घेऊन जा मात्र. फक्त आता परत फुलं कधी फुलतील ते मात्र चौकशी करून घ्या. :)

Anagha said...

तन्वी, तू पुन्हा आलीस की जाऊया आपण दुसरीकडे कुठेतरी ! ह्यावेळी इतके दिवस होतीस पण भेट काही नाहीच झाली ! :(
आभार गं... :)

Anagha said...

श्रीराज, माझी एक चूक झाली आहे खरी...ह्यावेळी ! तुला फोन करायचा राहून गेला ! आणि मग मला इतकी चुटपूट लागली ना ! माफी ! सपशेल माफी ! खूप काम होतं त्यात राहून गेलंय ! :(

Anagha said...

ह्म्म्म...हो रे सौरभा....सीतेच्या दु:खाची नाजूक फुलं ! सीतेची आसवं... :)

Anagha said...

हो वंदू, खूप मजा आली ! मला तू काढलेल्या फुलांच्या फोटोंची खूप आठवण आली !:)

Anagha said...

हम्म्म्म...अपर्णा बाई... या लवकर...म्हणजे भेट होईल ! कधी फुलांच्या प्रदेशात तर कधी एखाद्या हिरव्यागार डोंगरावर !