हल्ली रडूबिडू येत नाही असं एक क्षण वाटतं…
आणि स्वत:बद्दल तशी खात्री होताहोता एखादा चित्रपट समोर येतो आणि अख्खं थेटर जिथे खदखदुन हसत असतं तेव्हा हमसाहमशी रडताना माझी मीच मला सापडते…
आणि मग काही कळेनासं होतं.
दुसऱ्यांना ओळखायचं राहिलं बाजूला, आपण स्वत:ला ओळखत नाही हेच खरं.
समोरच्याला ओळखणं थोडंफार जमू शकतं कारण आपल्या समोर ती व्यक्ती असते.
त्याचा/तिचा चेहरा, त्याचे/ तिचे शब्द आपल्या समोर कानात रुंजी घालत असतात.

आपण त्याचं विश्लेषण करण्याचा निदान प्रयत्न करू शकतो.
पण आपला चेहरा हा नेहेमीच आपल्यापासून लपून बसलेला असतो.
आपले डोळे आपल्याशी तर कधी बोलत नाहीत.
आपणच आपला मेंदू कापून, चिरफाड वगैरे करून आपल्या समोर मांडला तर काही हाती लागण्याची शक्यता कमी आहे. तठस्थ रहाता आलं पाहिजे.
हे सगळं अर्थहीन विचारमंथन का बरं ?
सगळीकडे बांडगुळासारख्या फुटलेल्या झोपड्या बघून मी उद्गारले, "गरिबांबद्दलचा माझा कळवळा वगैरे आटला आहे !"
आणि मग ?
मग काल तमिळ सिनेमा बघितला.
काका मुत्ताय ( उच्चार चुकला असण्याची शक्यता मोठी )
सिनेमागृह हसत होतं.
टाळ्या वाजवत होतं.
मी हमसाहमशी रडत होते.
हुंदके मला आवरत नव्हते.
ते काय ते काजळ वगैरे लावलं होतं ते बहुधा काळ्या ढगातून पाणी कोसळल्यावर ढग जसे विस्कटून जातात…तसंच झालं असणार.
त्या पिल्लुच्या थोबाडीत लगावली गेली...

...आणि माझी खुर्ची हादरली.
त्याचा तो एक अश्रू मला कोसळवून गेला.
वाटलं…. वाटलं ते पिल्लू माझ्या कुशीत हवं…
आता माझ्या घशाखाली कधीही पिझ्झा जाऊ शकत नाही.
मी मला ओळखत नाही...

3 comments:
स्वतः स्वतःबद्दल अनभिज्ञ असणं बरच असतं. आपणच आपल्याला सरप्राईझ देऊ शकतो. :)
I read about the movie and it was enough for me. Tevdhya var radu ala mala. Ithe me pardeshat basun aple organic, wholesome, vagaire khanyacha gappa kartiye ani tithe majhya deshat lokana don velcha jevayla nahi. Phaar laaz vatli majhi mala. :'(
निरुत्तर.
Post a Comment