रोजच्या आयुष्यात पानंफुलं, इंद्रधनुष्य, फुलपाखरं वगैरे लिहिणं फार कठीण. खरं तर मागे वळून पाहिलं असता स्वत:ची ओळख स्वत:ला पटत नाही. अर्थात ह्या सर्व त्यात्या वयातील गोष्टी असतात. निदान सोळाव्या वर्षात तरी मला जग सुंदर दिसू शकलं हे माझं भाग्यच म्हणायचं. परंतु, सध्या लिहायला सुरवात केल्यावर मला मार्गावर दवबिंदू दिसत नाहीत. सामान्य माणसाने सामान्य जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या वाट्यास कुठले दवबिंदू ?
तत्वांना धरून जगायचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मित्र मंडळींचा रोष ओढवून घेणे.
मजल्यावर तीन लिफ्ट्स. आमचा मजला तिसरा. फारफार तर पन्नास सेकंद तिष्ठत उभं राहावं लागतं. अशाच एके दिवशी आम्ही दोघी वाट बघत उभ्या होतो. मुंबईतील लोकलमधील लोकं रोज चेहेरा दिसतो म्हणून नाही का नजरभेट झाली की हसून निदान मान तरी डोलावत ? मला तिचं नाव नाही माहित…चेहेरा मात्र खात्रीदायक ओळखीचा. मनातील चढउतार चेहेऱ्यावर दिसावेत त्याप्रमाणे लिफ्टच्या डोक्यावरील दिवा आतील हालचाल दर्शवित होता. एक लिफ्ट उघडली. दोनतीन माणसे बाहेर पडली.
माझी बिननावाची मैत्रीण चापल्याने आत शिरली. तिने बटण दाबून धरलं. लिफ्ट आ वासून स्तब्ध.
"Come!" मला तिने इशारा केला.
"But that one is going up." मी म्हटलं.
"That's okay ! We will take it down !" आत्मविश्वासाने ती उद्गारली. एकदा मिळालेल्या आदेशानुसार वर निघालेल्या लिफ्टला अधोमार्गावर नेणे तसे फारसे कठीण कुठे ? फक्त एक लाल बटण दाबावे. आणि तिला खाली जाण्याचा आदेश द्यावा.
"But…people must be waiting upstairs."
"That doesn't matter!"
"No…I can't do that."
वरच्या मजल्यावरची माणसं काही माझी मित्र नव्हती. पण मित्र असण्याचा संबंध आलाच कुठे ?
तिने खांदे उडवले. कुठून मी या बाईला विचारलं असं काहीसं. तिच्यासाठी बाब फार शुल्लक होती. दार बंद करून घेतले. वर आकडा दोन पेटला. लिफ्ट मान खाली घालून निघाली. तिच्या हातात तसेही काही नसतेच.
एखाद्या लहानश्या गोष्टीत आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवू शकत नाही. मग आयुष्यात कधी एखादा मोठा लाभ समोर आला तर आपण कसे घट्ट उभे रहाणार ?
नाही म्हणणे कठीण असते काय ? वाल्याच्या बायकापोरांनी वाल्याला नकार नव्हता का दिला ? दुसऱ्याच्या ताटातले आपल्या ताटात ओढून घेणे ही एक वृत्ती नव्हे काय ? कधी छोट्या तर कधी मोठ्या प्रसंगातून ती बाहेर डोकावते. आपल्या डोक्यात हे असले कृमी अंडी घालीत तर नाहीत ना ह्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर डोके भ्रष्ट व्हायला फार काळ नाही लागायचा. आपण जगात एकटेच आहोत व ह्या जगाचा जन्मच मुळात माझ्यासाठी झालेला आहे असा भ्रम करून घेण्याचे आपण बंद करावयास हवे.
आपली कृती, ही येणाऱ्या पुढल्या क्षणाची जबाबदारी पेलत असते.
Trying to see a bigger picture….असं काहीसं.
तत्त्व म्हणजे गुळाची ढेप...
आपण…

5 comments:
short term gains and long term losses is all I can see here :( and I am sure that their parents didn't teach them this. This is a very survival driven self centered approach.
'रेनड्राप' शी सहमत ! 'मरणाची भीती नाही पण काळ सोकावतो'…. ह्या म्हणीप्रमाणे आता खरेच 'स्वार्थ'रुपी 'काळ' सोकावला आहे. रस्त्यावरील वाहतूक सिग्नल प्रमाणे 'तत्व' हे एक आयुष्याच्या रस्त्यावरील एका बाजूला उभा करून ठेवलेला खांब झालाय फक्त . स्वत:च्या सोयीसाठी दुसर्याने ते पाळावे, पण स्वत: मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सदा घाईत……
Superb....छोटया छोटया प्रसंगातून जीवनाकडे सकारात्मकपणे पहायचा दृष्टीकोन आवडला!
फक्त स्वत:पुरतेच पाहण्याची वृत्ती अगदी साध्या साध्या गोष्टीतही बोकाळली आहे झालं.
तत्त्व म्हणजे गुळाची ढेप... ज्याला मोजक्याच मुंग्या लागतात...
Post a Comment